अर्ध्यावरच डाव मोडला म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका; दानवेंचा ठाकरे सरकारला खोचक सल्ला

”तुमचा अमर, अकबर,अँथनीचा संसार चांगला चालवा. अन्यथा अर्ध्यावरच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका” असा कोचक सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला दिला. राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला त्यावेळी दानवेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषणातून फटकेबाजी केली.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव यांच्यासमोर असणार ‘हे’ मोठं आव्हान

महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. बहुमत सिद्ध करू न शकल्याकारणाने भाजपा सरकार कोसळले आणि महाविकासआघाडीला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे.

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली !’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आता दिसत आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बंडखोरांवर सुटला शिवसेनेचा बाण; १४ बंडखोरांची एकाच दिवशी हकालपट्टी

शिवसेनेने सोमवारी तब्बल १४ लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.

शरद पवार राजकारणातील सोंगाड्या, उध्दव ठाकरेंचा पवारांवर घणाघात

शरद पवारांची राष्ट्रवादी आता भ्रष्टवादी झाली असून शरद पवार हे राजकारणातील सोंगाड्या आहेत. अशी घणाघाती टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज करमाळा येथे जाहीर सभेत बोलताना केली.

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उमेदवारी जाहीर करण्याबाबत इतर सर्व पक्षांना मागे टाकत मंगळवारी सकाळी भाजपने आपल्या १२५ उमेदवारांची यादी जाहीर केली. विद्यमान १२ आमदारांचा यातून पत्ता कट करण्यात आला असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बहुतांश जणांना उमेदवारी मिळाली आहे.

युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल

युती फिस्कटणार ?? शिवसेनेचे २८८ इच्छुक उमेदवार मुंबईत दाखल