कोरोनाच्या नावाखाली भारत आणि चीनमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन – UN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युनायटेड नेशन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, चीन आणि भारत यांच्यासह अनेक आशियाई देश कोरोनाव्हायरसच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवत आहेत तसेच कडक निर्बंध लादत आहेत आणि लोकांना जबरदस्तीने अटकही केली जात आहे. लोकांना ताब्यात घेणे आहे हे एक अत्यंत चुकीचे पाऊल आहे. हे मानवी हक्कांच्या विरोधात आहे. सरकारने याकडे लक्ष … Read more

पाकिस्तान भारतापेक्षा दुप्पट आनंदी देश? वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये भारताची मोठी घसरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी जागतिक आनंदी अहवाल सादर केला आहे. सर्वेक्षण केलेल्या एकूण १५६ देशांमध्येभारताचा क्रमांक १४४ स्थानी घसरला आहे.  लेसोथो आणि मालवी या देशांच्या मध्ये भारताने ३.५७३ मिळविले आहेत.  दुसरीकडे पाकिस्तान ने ५.६९३ गुणांनी ६६ वे स्थान मिळविले आहे. तुलनेत भारताचे स्थान खूपच खाली घसरले आहे. फिनलँड ने सलग तिसऱ्यांदा ७.८०९ गुणांनी प्रथम स्थान … Read more

अभिमानास्पद! मेजर सुमन गवानी बनली UN कडून सन्मानित होणारी पहिली आर्मी अधिकारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सैन्यात मेजर असलेल्या सुमन गवानी यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यूएन) वतीने प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. यूएनचे महासंचालक अँटोनिया गुतारेशे यांनी त्यांना हा पुरस्कार दिला आहे. मेजर सुमन यांना हा पुरस्कार इंटरनेशनल डे ऑफ यूनाइटेड नेशंस पीसकीपर्स निमित्त देण्यात आला. लष्कराकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. २०१८ … Read more

भारत-चीन सीमा प्रश्नावर UN घेतली ‘ही’ भूमिका

वृत्तसंस्था । भारत आणि चीनमध्ये सीमा प्रश्नावर तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती. अमेरिकेच्या या प्रस्तावावर संयुक्त राष्ट्र संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी सांगितले की, सीमा प्रश्नाबाबत मध्यस्थाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आमचा नसून त्या संबंधित दोन देशांना याचा निर्णय घ्यायचा आहे. आम्ही सध्याच्या … Read more

संयुक्त राष्ट्रांचे १८९ कर्मचारी कोरोनाव्हायरसने संक्रमित,तर तीन जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संयुक्त राष्ट्रसंघही सुटू शकलेला नाही. रविवारी संध्याकाळपर्यंत, कोविड -१९ च्या संक्रमणाने संयुक्‍त राष्ट्रांचे १८९ कर्मचारी बाधीत झाले आणि संपूर्ण यूएन सिस्टममध्ये आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे एका प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेसचे उप-प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले, “साथीला सुरूवात झाल्यापासून ते रविवारी … Read more

कोरोनामुळे भारतातील ४० करोड लोक होणार गरीब – संयुक्त राष्ट्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संयुक्त राष्ट्रांच्या कामगार संघटनेने असा इशारा दिला आहे की कोरोना विषाणूच्या संकटामुळे भारतातील अनौपचारिक क्षेत्रात काम करणारे सुमारे ४०० दशलक्ष लोक गरीबीच्या जाळ्यात अडकले जातील आणि असा अंदाज आहे की यावर्षी जगभरातील १९.५ दशलक्ष लोकांना पूर्णवेळ नोकरी गमवावी लागेल. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (आयएलओ) आपल्या अहवालात कोरोना विषाणूचे हे संकट दुसर्‍या महायुद्धानंतरचे … Read more

मासे किंवा अन्य सीफूड खात असाल तर सावधान! UN ची चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस जगभरातील २०४ देशांमध्ये पसरला आहे आणि आतापर्यंत १.४ दशलक्षाहून अधिक लोक त्याचा बळी ठरले आहेत. जगभरात या संसर्गामुळे ८२,००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हे संक्रमण वुहानमधील सीफूड मार्केटमधून पसरले होते. संयुक्त राष्ट्रांने मंगळवारी जगातील सर्व देशांना असा इशारा दिला आहे की अशी बाजारपेठ अन्य देशांमध्येही … Read more

जगभर साजरा होतोय योग दिवस

आंतरराष्ट्रीय|गेल्या पाच वर्षांपासून, प्राचीन भारतीय प्रथांच्या फायद्यांबद्दल जागतिक जागरूकता वाढवण्यासाठी २१ जून रोजी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. ११ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हि कल्पना प्रस्तावित केल्याच्या काही महिन्यांनंतर युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने २१  जूनला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केले. ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ या संकल्पनेचा असोक मुखर्जी भारताच्या राजदूतांनी … Read more

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाक सोबत चर्चा कशी करणार ? सुषमा स्वराज यांचा संयुक्त राष्ट्रसंघात सवाल

Sushma Swaraj

न्युयाॅर्क | पाकिस्तान दहशतवाद पोसण्यात आणि तो पसरवण्यात जसा पटाईत आहे तसाच ‘तो मी नव्हेच’ असे सांगण्यातही चांगलाच पटाईत आहे, अशी तोफ सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्टसंघात डागली. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या, निष्पापांचे बळी घेणाऱ्यांचा गौरव करणाऱ्या पाकशी चर्चा कशी करणार, असा थेट सवालही स्वराज यांनी केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७३ व्या आमसभेत त्या बोलत होत्या. यावेळी … Read more