भाजपचा जाहिरनामा नव्हे तर जुमलानामा आहे- काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपला जाहीरनामा संकल्पपत्र नावाने प्रसिध्द केला आहे. मात्र हा प्रसिध्द करण्यापूर्वी त्यांनी सन २०१४ च्या निवडणुकीचा जाहिरनामा पहायला हवा होता. २०१९ मध्ये प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील अनेक आश्वासने ही २०१४ च्या निवडणुकीत दिलेली होती. मग ही आश्वासने पाच वर्षात का पूर्ण केली नाहीत? त्यांचे हे अपयश आहे, यावर्षीचा त्यांचा जाहिरमाना म्हणजे ‘जुमनलानामा’ असल्याचा टोला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार बैठकीत लगावला.

सावरकरांना भारतरत्न देणे हा भगतसिंगचा अपमान आहे – कन्हैय्या कुमार

नगर शहर मतदारसंघातील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारार्थ दिल्ली येथील जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि भाकपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कन्हैय्या कुमार यांची गुरुवारी नगरमध्ये सभा पार पडली. नगर शहर मतदारसंघातून भाकप कडून बहिरनाथ वाकळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता वाकळे यांच्या प्रचारार्थ कन्हैय्या कुमार यांची सभा आयोजित करण्यात आली होती . यावेळी कन्हैया कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मी सिंधिया नाही तर ‘शिंदे’च आहे तेव्हा बहीण प्रणितीला विजयी करा – ज्योतिरादित्य सिंधिया

भारताच्या राजकारणात जरी मी सिंधिया असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मी शिंदेच आहे. असं मत मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केलं. आज सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बहीण प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलं.
 

साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

‘साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.

धुळ्यात युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफुसच, सेनेच्या बॅनर वरून भाजप कार्यकर्त्यांचे फोटो गायब  

धुळ्यात शिवसेनेचे उमेदवार हिलाल माळी यांच्या प्रचारासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली आहे. परंतु या सभे दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वावडे असल्याच उघड झालं आहे. आदित्य ठाकरे ज्या मंचावरून मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्या मंचावर लावलेल्या बॅनरवर भाजपचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांचा फोटो शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावण्याच टाळलं.

अखेर अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊतवर गुन्हा दाखल, महिलांबद्दल केले होते अश्लील भाष्य  

सोलापुरातल्या बार्शीचे माजी आमदार आणि भाजपचे बंडखोर राजेंद्र राऊत यांनी भाजपचे स्थानिक नेते राजेंद्र मिरगणे यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली होती. मिरगणे हे युतीधर्म पाळून दिलीप सोपल यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे राऊत संतापले आणि मिरगणेंवर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. आणि या सर्वांमध्ये स्वतःला छत्रपती म्हणून ही उल्लेख केला होता, त्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या होत्या.

कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षिरसागर कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांकडून ट्रोल

प्रचाराच्या वेगात शिवसेनेचे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षिरसागर यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात झालेल्या चुकांमुळे कोल्हापूरच्या नेटकाऱ्यांमधून चांगलेच ट्रोल होत आहेत. आज दिवसभर या जहिरनाम्यातील चुकीमुळे सोशल मिडिया मध्ये चांगलीच चर्चा रंगत आहे.

गडकिल्यांवर लग्न सोहळ्याप्रकरणी उदयनराजेंचा खुलासा

‘मला काय वेड लागले आहे का गड किल्यावर डांन्सबार सुरु करा असं सांगायला. असा विचार करण्यापेक्षा मला मेलेले परवडले. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे आणि यातून माझे चारित्र्यहनन केले’ असा आरोप सातारा लोकसभा पोटनिवडणूकीच्या रिंगणात उभे असलेले उदयनराजे भोसले यांनी केला.

भाजपच्या काळात विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागील सरकारच्या काळात उद्योगांसाठी वीजदर जास्त होती. मात्र आपल्या सरकारने विदर्भाच्या प्रगतीसाठी महाराष्ट्रापेक्षा वीजदर ३ रुपयांनी कमी दिली याचाच परिणाम म्हणून त्यांनी विदर्भाकडे उद्योगधंदे वळत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अमरावती मधील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते.

रविकांत तुपकर परतले ‘स्वगृही’

‘स्वाभिमानी शेतकरी संघटना’ सोडून ‘रयत क्रांती संघटने’त गेलेल्या रविकांत तुपकर यांनी अवघ्या १९ दिवसात यु टर्न घेत पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी केली. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यांच्या छातीवर बिल्ला लावून त्यांना पुन्हा प्रवेश दिला. ‘स्वभिमानी संघटने’त असलेल्या अंतर्गत मतभेदातून संघटना सोडल्या’चं रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.