धनंजय मुंडेंनी ‘हटके ट्वीट’ करत दिल्या मोदींना शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या परळीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि परळीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी मोदींचे हटके स्वरुपात स्वागत करणारे ट्विट केले आहे. धनंजय मुंडे ट्वीटमध्ये म्हणतात, “मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत!, पण एकच इच्छा आहे. परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल. चंद्रयान-२ मोहिमेदरम्यान तुम्ही ४ तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!”

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ नाऱ्याचा आदित्य ठाकरेंना विसर, विडिओ वायरल

निवडणुकीच्या काळात मतदारांची मने जिकंण्यासाठी उमेदवार वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. मात्र, असाच काहीसा प्रयन्त करत असताना नातवाला आजोबांच्या विचारांचा विसर पडावा हे आश्चर्यच आहे. मुंबई स्थित दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी चक्क लुंगी घातल्याचा विडिओ वायरल झाला आहे. ७० च्या दशकात मराठी माणसांच्या हितासाठी दाक्षिणात्य विरोधी भूमिका घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ‘बजाव पुंगी, हटाव लुंगी’ अशी ऐतिहासिक घोषणा दिली होती. परंतु आता वरळीतून निवडणूक लढवणारे लुंगीधारी आदित्य ठाकरे बहुभाषिक राजकारणाचा नारा देताना दिसत आहे.

मुख्यमंत्र्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागणं म्हणजे जनतेत भाजपबद्दल नाराजी आहे- शरद पवार

जनतेची भाजपाबद्दलची नाराजी मुख्यामंत्र्यांना कळाली आहे. त्यामुळं तर त्यांना प्रत्येक तालुक्यात सभा घ्यावी लागत आहे. असा टोला राष्ट्रवादीचे सेर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस लगावला. पवार राहुरी मतदारसंघात प्रचार सभेसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केल.

‘तुबची-बबलेश्वर’चे पाणी देणारच अन्यथा जतमध्ये पाऊल देखील ठेवणार – विश्वजीत कदम

काँग्रेस  ही संकल्पना काँग्रेस उमेदवार विक्रम सावंत यांची असून या योजनेमुळे जतला पाणी मिळणार आहे. जतकरांना जर का हे पाणी मिळाले नाही तर मी जतमध्ये पाऊल देखील ठेवणार नसल्याचा निर्वाळा पलूस-कडेगाव मतदारसंघाचे आमदार विश्वजीत कदम यांनी केला. येत्या जानेवारीत आम्ही दोन कारखान्यांचे काम सुरू करणार असल्याचे हे त्यांनी यावेळी सांगितले. ते काँग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रचारार्थ बनाळी, शेगाव व कुंभारी येथील जाहीर सभेत बोलत होते.

जिरवा-जिरवीचे राजकारण करणे हा विरोधकांचा उद्योग – सदाशिव पाटील

खानापूर मतदारसंघात विकासाचा माइलस्टोन ठरणारे एकतरी काम विद्यमान आमदारांनी केलेले दाखवावे. अवैधधंद्यांना संरक्षण द्यायचे, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालून नकारात्मक राजकारण मतदारसंघात करत फक्त आडवा-आडवी जिरवा-जिरवीचे उद्योग करायचे, हा विरोधकांचा उद्योग आहे, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी केली.

मुख्यमंत्र्यांच्या ‘पैलवान’ वक्तव्यावरून जयंत पाटलांना हसू आवरेना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार प्रचार सभेत आपण तेल लावून लढाईसाठी तयार आहोत असे सांगत आहेत, मग त्यांनी त्यांचा तेल लावलेला फोटो प्रसिद्ध करावा. महाराष्ट्राला कळूदेत कि तेल लावलेला मुख्यमंत्री कसा दिसतो. अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

आज ताकद दाखविली तरच पुढच्या निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

काँग्रेस-राष्ट्रवादीने आता एकत्र काम करून भाजपचा पाडाव करणे आवश्यक आहे. आज राजकीय ताकद दाखविली तरच पुढच्या महापालिका निवडणुकीपर्यंत तुमचे अस्तित्व टिकेल, त्यासाठी आता कामाला लागावे व काँग्रेसला विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी आघाडी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आ.पाटील बोलत होते. बैठकीला उमेदवार पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, मनिषा रोटे, उत्तम साखळकर, नामदेवराव मोहिते, संजय बजाज, कमलाकर पाटील, मैनुद्दीन बागवान, महेश खराडे आदी उपस्थित होते.

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”- प्रकाश आंबेडकर

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी घनसांगवीत बोलतांना केला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालना जिल्ह्यातील घनसावंगी मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.