समृद्धी महामार्गावरील बोगद्याचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करा; ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांना सूचना

औरंगाबाद | समृद्धी महामार्गावर पोखरी शिवारातील डोंगरात बोगद्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून १५ एप्रिलपर्यंत एका बाजूच्या बोगद्याचे काम पूर्ण करून त्यातून १ मेपासून वाहतूक सुरू करण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) प्रयत्न आहेत. सध्या डोंगराच्या दोन्ही बाजूंनी बोगद्याचे काम सुरू असून १३० मीटर लांबीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. या संदर्भात ‘एमएसआरडीसी’चे अधीक्षक अभियंता … Read more

नागरिकांनी ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जिल्हाधिकारी चव्हाण यांनी साधला फेसबूक लाइव्हद्वारे संवाद

औरंगाबाद | मागील दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबाद जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यांच्या यादीत पहिल्या दहामध्ये आहे, ही जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनावर कसा अटकाव आणता येईल, काय उपाययोजना कराव्या लागतील, नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, अशा अनेक मुद्द्यावर आज फेसबूक लाइव्हमध्ये माहिती दिली. … Read more

शहरातील रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा -पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद | शासन अनुदानीत शहरी सडक योजनअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महानगरपालिकेच्या विकास कामांच्या … Read more

घाटीत आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी

औरंगाबाद | घाटी रुग्णालयात आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे घाटी रुग्णालयाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा एकीकडे वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी दहा रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला … Read more

यंदाही होळीवर कोरोनाचे सावट; रंग, पिचकाऱ्या विक्रेत्यांना आर्थिक फटका

औरंगाबाद | होळी सण हा अत्यंत महत्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. अनेकजण मोठ्या उत्साहात होळी सण सामूहिकरित्या साजरा करतात. मोठ्या प्रमाणावर शहरात रंगांची उधळण करत विविध गाण्यांवर तरुणाई थिरकताना देखील दिसते. परंतु त्यावर देखील आता मयार्दा आल्या आहेत. मागील वर्षी कोरोनाचे आगमन झाले आणि होळीवर कोरोनाचे सावट पसरले. तेच सावट यंदाही कायम असून रंग विक्रेते, … Read more

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 26 मार्च रोजी कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत खालावला

औरंगाबाद |  जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प 26 मार्चला सादर होणार असून कोरोना काळात उत्पन्नाचा स्रोत आणि अनुदानावर झालेल्या परिणामाचा फटका यावर्षी जिल्हा परिषदेला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. 2020 आणि 2021 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा शुक्रवारी 26 मार्च रोजी होणार आहे. या सभेत 2021 आणि 2022 चा अर्थसंकल्प सादर होणार असल्याची माहिती … Read more

कोट्यवधींची फसवणूक करणारी, आंतरराज्य टोळी पुणे सायबर पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद | बँकेमध्ये असलेल्या निष्क्रिय खात्यांचा डेटा मिळवून त्याद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पुण्याच्या सायबर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत सायबर पोलिसांनी एका महिलेसह आठ जणांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात परमजितसिंग संधू (४२, रा. औरंगाबाद) व राजेश मुन्नालाल शर्मा (४२, रा. औरंगाबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर … Read more

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, २१ मार्चला मतदान; २२ रोजी मतमोजणी

औरंगाबाद | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २१ मार्चला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून अदालत रोडवरील जिल्हा बँकेच्या सभागृहात मतमोजणी होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी दिली. शेतकी मतदारसंघाच्या औरंगाबाद तालुक्याचे व प्रोसेसिंग मतदारसंघाचे मतदान क्रांती चौकातील विभागीय … Read more

नागरिकांनो सावधान! व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण….

औरंगाबाद | मनपा आरोग्य विभाग व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकायार्ने शहरात सहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून 61 व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एसएसएस शाळेत 119 पैकी 12 पॉझिटिव्ह, पैठण गेट 125 मधून आठ पॉझिटिव्ह, महावीर भवनात 77 पैकी 9 पॉझिटिव, शहागंज मध्ये 143 पैकी 13, अग्रसेन भवनात 150 पैकी … Read more

रुग्णांना कुठलीही असुविधा होता कामा नये, विभागीय आयुक्तांनी टोचले मनपा अधिकाऱ्यांचे कान

औरंगाबाद | औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमधील असुविधा संबंधी सातत्याने वृत्त प्रकाशित होत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मेल्ट्रोन व एम आय टी येथे सुरू केलेल्या कोविड सेंटर ला सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी सर्व सुविधांचा आढावा घेऊन, रुग्णांना कुठल्याही असुविधा होता कामा नये. अशा शब्दात त्यांनी मनपा डॉक्टर व अधिकाऱ्यांचे कान टोचले असल्याचे … Read more