जिल्ह्यात आणखी नऊ कोविड केअर सेंटर सुरू, जिल्हा परिषद आरोग्य विभागाची माहिती …

औरंगाबाद | शहरात दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हा परिषद विभाग सतर्क झाला असून जिल्ह्यात आणखीन नवीन कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत दोन हजार 400 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दर दिवशी तीनशेहून अधिक रुग्ण सापडत आहेत. यात … Read more

केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसलेलेही रूग्णालयात, तपासणीसाठी आता समिती गठीत

औरंगाबाद | शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना काही रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसतानाही रूग्णालयात भरती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकाराने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रूग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. … Read more

सौम्य लक्षणे असलेले ४० रुग्ण इतरत्र हलविले, मिनी घाटीतील प्रकार

औरंगाबाद | मिनी घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत अशा रुग्णांना होम आयसोलेशन किंवा इतरत्र कोव्हीड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या ४० रुग्णांना काल इतरत्र कोव्हीड केअर सेंटरमध्ये आणि काही रुग्णांना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. कोरोनामुक्त झालेली मिनी घाटी पुन्हा कोरोनाच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रतिदिन जिल्ह्यातील कोरोनाच्या … Read more

कोरोनाचे नियम पायदळी; बजाज कंपनी प्रशासनाचा हलगर्जीपणा

औरंगाबाद | वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कंपनीमध्ये कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. बसमध्ये मोठ्या संख्येने कामगारांना कोंबून ने-आण केली जात आहे. हा सर्व प्रकार गावातील तरुणांनी समोर आणला. एक व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्टपणे बसमध्ये क्षमते पेक्षा अधिक कामगार दिसत असून हा प्रकार त्वरित थांबविण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला. वाळूज … Read more

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांच्या कन्सलटिंगसाठी 10 नाही तर 2 हजार रुपये फी; मनपा प्रशासकांचे आदेश

औरंगाबाद | शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. शहरातील बहुतांश रूग्णांना खासगी रूग्णालयांतून उपचार घ्यावे लागत आहे. रूग्णांंना बाहेरून तपासण्या कराव्या लागत आहे, अशावेळी खासगी लॅबमधून चुकीचे अहवाल दिले जात असून रुग्णांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नावाने होणारी रूग्णांची लूट थांबवा, असे आदेश मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय … Read more

५ पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण, पोलीस आयुक्तालयातील नियोजित बैठक रद्द

औरंगाबाद | शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील पाच  निरीक्षक कोरोनाबधित असल्याचे सोमवारी पोलीस आयुक्तांनी नियोजित केलेल्या क्राईम आढावा  बैठकीदरम्यान समोर आले. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी नियोजित बैठक रद्द केली. शहरातील १७ पोलीस निरीक्षकांची कोरोना अँटीजन चाचणी सोमवारी करण्यात आली. त्यापैकी ५  पोलीस निरीक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. दरम्यान, शहर पोलीस दलात आतापर्यंत ३९ अधिकारी आणि ३०२ … Read more

आव्हानात्मक परिस्थितीत उद्योगांची वाटचाल, योग्य काळजीसह कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू

औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. प्रशासनाने अंशत: लॉकडाउनसह गर्दी व प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक निर्बंध घातले आहेत. उद्योगांना आवश्यक त्या उपाययोजना, तपासणी, चाचणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करत उद्योगांमध्ये उत्पादन सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला, सध्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रशासनाने अंशत: … Read more

विभागीय क्रीडा संकूल, देवगिरीत जम्बो कोवीड सेंटर; महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासण्या

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील १५ दिवसांमध्ये सुरू केलेले सर्व कोवीड सेंटर हाउसफुल्ल झाले आहेत. शहरात ९ हजारांपेक्षा अधिक सक्रि य रूग्ण आहेत. नवीन रूग्णांसाठी विभागीय क्रीडा संकुल आणि देवगिरी बॉईज होस्टेलमध्ये कोवीड सेंटर उभारण्याची प्रक्रि या मनपाने सुरू केली आहे. महापालिकेकडून दररोज ३ ते ४ हजार तपासणी … Read more

नागरिकांनो सावधान! व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण….

औरंगाबाद | मनपा आरोग्य विभाग व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकायार्ने शहरात सहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून 61 व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एसएसएस शाळेत 119 पैकी 12 पॉझिटिव्ह, पैठण गेट 125 मधून आठ पॉझिटिव्ह, महावीर भवनात 77 पैकी 9 पॉझिटिव, शहागंज मध्ये 143 पैकी 13, अग्रसेन भवनात 150 पैकी … Read more

विना मास्कविरोधात आता मनपासोबतच पोलिसांची कारवाई, विना मास्क फिरणाऱ्या 165 जणांना दंड

औरंगाबाद | महापालिकेसोबतच आता पोलिसांनाही विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांनी केल्यानंतर मागील पाच दिवसांपासून कारवाई केली जात आहे. कारवाईतील हा संथपणा पाहता मंगळवारी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी याबाबत सूचना केल्या. कारवाया वाढवा, जनजागृती करा, कारवाई करताना मास्कचेही वाटप करा असेही त्यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना सांगितले. दरम्यान सोमवारी विना मास्क … Read more