खेळणी विक्रेत्याला दुकानातील नोकरानेच ४६ लाखांला  गंडवले…

औरंगाबाद प्रतिनिधी | घाऊक व्यापा-याशी हातमिळवणी करुन नोकराने मालकालाच ४५ लाख ६८ हजारांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दोनवर्षा पासून सुरू होता. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर दुकानदाराने पोलिसात धाव घेतली. त्यावरुन नोकर दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया, घाऊक विक्रेता पंकज कैलाशचंद खंडेलवाल आणि त्याचा नोकर रवि शिवाजी पानखेडे यांच्याविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

रेहाना फातिमाने अर्धनग्न होऊन लहान मुलांकडून अंगावर काढून घेतले पेंटिंग; गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वादग्रस्त कार्यकर्ती रेहाना फाति माहिने तिच्या अल्पवयीन मुलांकडून आपल्या अर्धनग्न अवस्थेत अंगावर पेंटिंग करतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महत्त्वाचे म्हणजे फातिमा यांनी 2018 मध्ये सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्नही केला होता. भाजपचे ओबीसी मोर्चाचे नेते ए.व्ही. अरुण प्रकाश … Read more

धक्कादायक ! परभणीत दोन दिवसाचे स्त्री अर्भक झाडाझुडपात फेकले; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे पाथरी तालुक्यातील देवेगाव येथे गावच्या बाहेर असणाऱ्या झाडाझुडुपांमध्ये सोमवारी सायंकाळी दोन दिवसाचे स्त्री अर्भक मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी अज्ञाता विरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेगाव येथील गाव शेजारी असणाऱ्या पांदण रस्त्याच्या परिसरात सोमवार १८ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास मोकळ्या … Read more

मुंबईत लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडला म्हणून सख्ख्या भावाची हत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. करोनापासून लोकांचा जीव वाचवण्यासाठी गरजेचा असलेला लॉकडाउनमध्ये लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. लोकांनी लॉकडाउनचे पाळावा म्हणून पोलिस रस्त्यावर पहारा देत आहेत. मात्र, एकीकडे लोकांचा जीव वाचण्यासाठी लागू करण्यात आलेला हा लॉकडाउन एकाच्या हत्येचे कारण बनलं. लॉकडाउनमध्ये घराबाहेर … Read more

वादग्रस्त वक्तव्यासाठी वारीस पठाण यांच्यावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस … Read more

बिट काॅईनच्या माध्यमातून दुप्पट रक्कम करण्याचे आमीष दाखवून लाखोंची फसवणूक, डाॅक्टर विरोधात गुन्हा दाखल

बिट काॅईन आभासी चलनातून पंढरपुरातील काही प्रतिष्ठीत लोकांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पंढरपुरातील एका डाॅक्टर विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेचे लैंगिक शोषण,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल  

 शहरातील रेल्वस्टेशन परिसरातील पतीपासून विभक्त राहणाऱ्या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लॉजमध्ये नेऊन लैगिंक शोषण करणाऱ्या नराधमाविरोधात वेदांतनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदविला. व्यवसायात दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवून या महिलेचे २ लाख रुपये घेऊन फसवणूकही केल्याचेही समोर आले आहे. शेख जुबेर शेख अब्दुल अजीज असे या आरोपीचे नाव आहे.

अल्पवयीन मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इसमावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एका मतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्हयात जुन्या वादातून तरुणानं केली ६० वर्षीय वृद्धाची हत्या

जुन्या वादातून युवकाने एका ६० वर्षीय वृद्धावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली भिवापूर वॉर्डातील माता नगरात रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. जोगिंदरसिंग टाक असे मृतकाचे नाव असून अक्षय मुळे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

प्रदीप शर्मांवर गुन्हा दाखल; निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप

माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरार पूर्व चंदनसार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.