नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत; चर्चेसाठी सहा तासांचा अवधी

राज्यसभेत बहुमत नसले तरी हे विधेयक मंजूर होईल असा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त होत आहे. तसेच राज्यसभेत या विधेयकाची कसोटी लागणार असली तरी भाजपाला मात्र हे विधेयक राज्यसभेत पारित होईल अशी आशा आहे.

आर्थिक आघाडीवर मोदी सरकारला आणखी एक धक्का, जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील

सर्वसामान्यांना धक्का देणाऱ्या रिझर्व बँकेने मोदी सरकारलाही धक्के दिले आहेत. या आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवणाऱ्या रिझर्व बँकेन आता त्यात १.१ टक्क्याची कपात केली आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज रिझर्व बँकेने व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारवरच आर्थिक मंदीचं संकट आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सरकारने नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे ४५८ कोटी रुपये थकवले !

सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलच नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे, लहान बंधू राष्ट्रपती गोताबाय राजपक्षे यांनी दिली शपथ

हॅलो महाराष्ट्र,  प्रतिनिधी । श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे यांनी शपथ घेतली. वयाने लहान असलेले त्यांचे लहान भाऊ गोताबाय राजपक्षे यांनी त्यांना पंतप्रधान पदाची शपथ दिली.  ७४  वर्षीय राजपक्षे ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीपर्यंत  काळजीवाहू  पंतप्रधान म्हणून काम पाहतील. लहान बंधू गोताबाय यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसानंतरच  महिंदा यांनी राष्ट्रपती सचिवालयात नवीन पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी माजी … Read more

शरद पवारांना भाजपकडून खरोखर राष्ट्रपती पदाची आॅफर आहे का?

मुंबई | राज्यातील सत्तासमीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तास्थापनेबाबत बैठकांवर बैठका घेत असताना भाजपने मास्टरस्ट्रोक ठोकला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपकडून राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं बोललं जात आहे. एनडीटीव्हीने पवारांना राष्ट्रपती पदाची आॅफर असल्याचं वृत्त दिले आहे. शरद पवार आज दिल्ली येथे पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. … Read more

नोबेल विजेते मुखर्जींनी घेतली मोदींची भेट, विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जिंकणारे भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी या भेटीची माहिती दिली. तसेच अभिजीत मुखर्जी यांच्यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचेही पंतप्रधानांनी म्हटलं.

महाराष्ट्रात मोदी-शहांच्या सभांचा धुराळा ! सोनिया गांधी, प्रियांका गांधी आहेत तरी कुठे?

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. एकीकडे भाजप – शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे ‘आघाडी’साठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सोनिया गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

मोदी-शहांच्या सभांचा चांगला परिणाम होतोय – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची आज सातारा येथे प्रचार सभा पार पडली. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आलेल्या मोदी यांनी यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून टीका केलीय. मात्र आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मोदी, शहा यांच्या प्रचार सभांचा चागला परिणाम होत असल्याचं म्हणालेत. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी आणि अमित शहा जितक्या सभा घेतील … Read more

नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीची आत्महत्या

नरेंद्र मोदी साताऱ्यात येण्याच्या अवघ्या काही वेळापुर्वी विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या साताव्या मजल्यावरून उडी टाकून आत्महात्या केल्याची घटना घडली आहे. शहरालगत असलेल्या गौरीशंकर फार्मसी महाविद्यालयातील कोमल लोखंडे ही फार्मसी विभागाच्या तीस-या वर्षात शिक्षण घेत होती. तीने काही वेळा पुर्वी महाविद्यालयाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महात्या केली.

मोदींची ऐतिहासिक घोषणा !

शेतमजूर, रस्तेकाम करणारे मजूर, घरकाम करणाऱ्यांना ३ हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळणार असल्याचे मोदींनी जाहीर केले. राज्यातील निवडणुका पाहता मोदींनी केलेली घोषणा राजकीय दृष्टया ऐतिहासिक आहे. ही घोषणा सत्यात आल्यास राज्यातील शेतमजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या घोषणेचा परिणाम राज्यात भाजपाला मताधिक्य मिळवून देण्यासाठी होतो का हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.