बाळासाहेब थोरातां विरोधात नवलेंना उमेदवारी; विखेंनी केली मोर्चे बांधणी

अहमदनगर प्रतिनिधी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी युतीने श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांना मैदानात उतरले आहे. नवलेंना सेनेकडून बुधवारी सायंकाळी संगमनेर विधानसभा जागेसाठी एबी फॉर्म दिला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष थोरात यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून युतीकडून सक्षम उमेदवारासाठी चाचपणी सुरू होती. अनेक नावांवर चर्चा झाली … Read more

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर प्रतिनिधी | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज संगमनेर मतदारसंघातून दाखल केला आहे. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सेना भाजप युतीवर टीका देखील केली आहे. शिवसेना भाजप युती मध्ये सर्व काही आलबेल … Read more

काँग्रेसची पहिली यादी झाली लीक ; यादीत आहेत या बड्या नेत्यांची नावे

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली यासाठी पार पडली. या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात नवी दिल्लीला गेले होते. त्यांनी आमची ४५ जागांवर चर्चा झाल्याचे म्हणले आहे. त्याच प्रमाणे एकूण ८५ जागांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्याच प्रमाणे १५० जागी निवडणूक लढण्यास आमचा पक्ष सक्षम आहे. मात्र काही जागा आमच्या … Read more

थोरतांच्या बालकिल्यात विखेंचा सुरुंग

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सतत याना त्या कारणाने चर्तेत असतेच. त्यात विखे अन थोरातांचा वाद तर उभा महाराष्ट्राला माहित आहे. दोघेही एकाच पक्षात होते तोपर्यंत पक्षांतर्गत राजकारण चांगलेच रंगत होते. परंतु आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नुकतेच भाजपात दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुन्हा कॉग्रेस राष्ट्रवादीला धक्का देत बाळासाहेब थोरतांच्या बालकिल्यात विखेंनी सुरुंग लावला … Read more

कॉंग्रेसला धक्का ; राजेंद्र दर्डा यांचा प्रसार माध्यम कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा

मुंबई प्रतिनिधी |  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील दिग्गज नेते कॉंग्रेसला सोडून भाजप-शिवसेनेत प्रवेश करत आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राजेंद्र दर्डा यांनीही काँग्रेसच्या प्रसार माध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राजेंद्र दर्डा सलग १५ वर्षे आमदार राहिले आहेत. तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदेही भूषवली आहेत. ते दैनिक ‘लोकमत’ … Read more

कॉंग्रेसची पहिली यादी आज जाहीर होणार !

मुंबई प्रतिनिधी | भाजपच्या दैदिप्यमान अश्वमेधाला रोखण्यासाठी काँग्रेसने चांगलीच कंबर कसली आहे. काँग्रेसचे नेते आता निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहेत. बाळासाहेब थोरात यांनी मागे सांगितल्या प्रमाणे छाननी समिती काँग्रेसची पहिली यादी २० सप्टेंबर रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता असून यात अशोक … Read more

थोरातांनी आत्मपरीक्षण करावं; विखेंचा थोरातांना सल्ला

अहमदनगर प्रतिनिधी। अहमदनगर जिल्ह्यातील उत्तर भागात विखे आणि थोरात वाद सर्वानाच माहिती आहे. त्यात बुधवारी निळवंडे धरणाच्या भूमिपूजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार होते. त्यामुळे बाळासाहेब थोरातांच्या बालेकिल्ल्यात विखेंच्या हस्ते भूमिपूजन ही बाब थोरात समर्थकांना खटकली. त्यामुळे त्यांनी विखे ज्या रस्त्याने जाणार होते त्या रस्त्याला आडवे होऊन थोरात यांच्या समर्थांनी घोषणा … Read more

कॉंग्रेसला धक्के बसत असताना बाळासाहेब थोरातांना मिळाला हा सुखद धक्का

संगमनेर प्रतिनिधी | कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि संगमनेर विधानसभेचे आमदार बाळासाहेब थोरात यांना सुखद धक्का मिळाला आहे. थोरात यांच्या नेतृत्वात सुरु असणाऱ्या सहकारी साखर कारखान्याला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा सहकार निष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या कारखान्याने साखर क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. खाकीवर काळा डाग ; २५ हजारांच्या लाचीसह पोलीसांनी … Read more

आमदार भालके भाजपच्या वाटेवर ; थोरातांनी घेतली भालकेंची फिरकी

मुंबई प्रतिनिधी | पूराच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल काँग्रेसचे शिष्टमंडळ गेले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार भारत भालके बराच वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. शिष्टमंडळ परतल्या नंतर देखील भारत भालके मुख्यमंत्र्यांजवळ काय बोलत होते. याबद्दल तपशील उघड झाला नाही. परंतु भालकेंची भाजप जवळकी कॉंग्रेस नेत्यांच्या देखील नजरेतून लपून राहिली नाही. म्हणूनच भालकेंची … Read more

महापूराचा राजकीय वणवा ; अमित शहांनी कोल्हापूरच्या सासुरवाडीला मदत करावी : बाळासाहेब थोरात

मुंबई प्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधकांची महापूराच्या मुद्दयांवरून चांगलीच जंग जुंपाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच धारेवर धरले आहे. अमित शहा यांची सासुरवाडी कोल्हापूर आहे याची त्यांनी जाणीव ठेवून तरी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करावी. फक्त हवाई पहाणी करून काहीच होणार नाही असा खोचक … Read more