आशिष शेलार यांच्या ‘त्या’ विधानाचा सेना-काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

‘राज्यात सत्तास्थापनेचं तीन अंकी नाटक सुरु असून त्यावर भाजप बारीक लक्ष ठेऊन आहे’ अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांच्या टीकेचा रोख अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे होता. हे तिन्ही पक्ष एकत्र येत सत्तास्थापनेसाठी बैठका घेत आहे. या तिन्ही पक्षात होणाऱ्या चर्चां म्हणजे तीन अंकी नाटक आहे. आशिष शेलार यांच्या नव्यानं सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या महासेनाआघाडीवर निशाणा साधल्यानंतर काँग्रेस-शिवसेनेकडून शेलार यांच्यावर पलटवार करण्यात आला आहे.

किल्ला जोरदार लढवला ! अशोक चव्हाणांनी केलं संजय राऊतांचे अभिनंदन

शिवसेना खासदार संजय राऊत प्रकृती अस्वस्थामुळे लीलावती रुग्णालयात सध्या भरती आहेत . राऊत यांच्यावर हृदयविकार शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्या तब्बेतीच्या चौकशीसाठी राजकीय नेते लिलावतीला दाखल झाले. आज काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात,अशोक चव्हाण, विश्वजित कदम आणि माणिकराव ठाकरे यांनी राऊत यांची भेट घेत त्यांच्या तब्बेतीची चौकशी केली.

काँग्रेसचे बडे नेते पवारांच्या दारी, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार?

वेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा अजूनही कोणत्याही पक्षाने केला नाही आहे. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आज उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेतबाबत एकमेकांवर खोटारडेपणाचे आरोप केले असतांना. तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे बडे नेते शरद पवार यांच्या घरी बैठकीला हजर आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; सत्तास्थापनेच्या दृष्टीने खलबत सुरु

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचले आहेत. आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने थोरात पवार भेटीला अधिक महत्व प्राप्त झालंय.

सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने ‘बाळासाहेब ठाकरे’ स्टाईलने विचार करावा- बाळासाहेब थोरात

‘आता शिवसेनेने ठरवायचे आहे की त्यांनी भाजपच्या किती दबावाखाली राहायचे, काँग्रेसकडे शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आल्यास आम्ही केंद्रीय नेतृत्वाची परवानगी घेऊ’ असं महत्त्वपूर्ण विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलं.

या ६ कार्यकर्त्यांनी हिरावला भाजप-सेना युतीचा महाजनादेश

विशेष प्रतिनिधी । साधारणतः लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नाराज कार्यकर्त्यांनी सेना-भाजपच्या वाटेवर जायला सुरुवात केली होती. आर्थिक घोळ केलेल्या नेत्यांना आपापल्या संस्था आणि जागा वाचवण्यासाठी हे पक्षांतर करावं लागल्याचं त्यांनी सांगितलं होतं. यामध्ये प्रामुख्याने गणेश नाईक, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल, मधुकर पिचड, वैभव पिचड, उदयनराजे भोसले, दिलीप सोपल, शेखर गोरे, गोपीचंद पडळकर, … Read more

ते थोरात आहेत, तर मी जोरात आहे – उध्दव ठाकरे

परभणी शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय परिसरात झालेल्या पहिल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्यासह शरद पवार यांच्यावर टीका केली.

फसणवीस सरकारला हद्दपार करा – बाळासाहेब थोरात

सध्याची निवडणूक ही राज्यातील उमेदवारांची असून मोदींच्या नावावर मतं मागण्याचं काय कारण असा सवाल खर्गे यांनी विचारला. राज्यातील सिंचन व्यवस्था, शेतकऱ्यांचा पीक विमा, तरुणाईचा रोजगार प्रश्न याबाबत सरकार बोलणं टाळत असून घोषणांच्या जाहिरातबाजीत वास्तवाकडे दुर्लक्ष करण्याचं काम सरकार करत असल्याची टीकाही खर्गे यांनी केली.

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले.

खिंडीत सापडलेल्या काँग्रेसचा मी बाजीप्रभू; बाळासाहेब थोरातांचा कार्यकर्त्यांना दिलासा

अडचणीत सापडलेल्या काँग्रेससाठी मी बाजीप्रभू आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं.