जे पी नड्डा होणार भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

दिल्ली | जेपी नड्डा यांचा १ फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक होणार आहे. १ फेब्रुवारीपर्यंत भाजपच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रदेश अध्यक्षांच्या निवडणुका पूर्ण होतील आणि त्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक होईल. सूत्रांच्या माहितीनुसार जेपी नड्डा हे पक्षाचे अकरावे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. सध्या भाजपमध्ये संघटना निवडणुका सुरू आहेत. भाजपच्या राज्यघटनेनुसार, 50 टक्के … Read more

भाजपला दिलेलं प्रत्येक मत हे मोफत वीज-शिक्षण-आरोग्यसेवेच्या विरोधात असेल : मनीष सिसोदयांचा घणाघात

“आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळणारे प्रत्येक मत मोफत वीज, शिक्षण आणि आरोग्य सेवांच्या विरोधात असेल”, असा घणाघात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला.

पुण्यातील मनसे कार्यालय भगव्या रंगात रंगले; मनसे हिंदुत्वाकडे वळणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लवकरच आपल्या पक्षाची भूमिका बदलणार असल्याचे सूचक संकेत आता मिळत आहेत. येत्या २३ जानेवारी रोजी मनसेचं पहिलचं अधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी आयोजित केल आहे. या अधिवेशनात मनसे आपल्या पक्षाची भूमिका आणि झेंड्याची घोषणा केली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मनसेने विचारपद्धती बदलल्यास भाजप मनसे युती शक्य; राज ठाकरेंच्या भेटीनंतर फडणवीसांचे प्रथमच भाष्य

मुंबई : मनसेने विचार आणि कार्यपद्धती बदलली तर भविष्यात मनसेसोबतच्या युतीबाबत विचार करु”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दैनिक लोकमतच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मनसे भाजप युतीवर भाष्य केले. मनसे आणि भाजप एकत्र येणार का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला, त्याबाबत फडणवीस म्हणाले, “मनसे आणि भाजप एकत्र येण्याची आज तरी कोणतीही चिन्हं नाहीत. मनसे … Read more

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजप शिवसेना एकत्र; महाविकास आघाडीत फूट

उस्मानाबाद | उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीसाठी सेना भाजप एकत्र येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. भाजप नेते आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. परंतु राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने … Read more

CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील … Read more

मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी माझी नाराजी कायम – एकनाथ खडसे

टीम हॅलो महाराष्ट्र : भाजप नेते एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाली. पण ही भेट फक्त जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीपुरती मर्यादित होती असे स्पष्ट करत मला आमदारकीच किंवा मंत्रिपदाच आमिष दाखवलं तरी हा विषय मी सोडून देणार नाही, माझी नाराजी कायम आहे असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना … Read more

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले … Read more

पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आवाज उठवा; पंतप्रधान मोदींचे आंदोलन कर्त्यांना आवाहन

तुमकुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. तुमकुरु येथे श्री शिवकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी भाषण केले. ते म्हणाले की, जे लोक आज भारतीय संसदेविरोधात आंदोलन करीत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ही कारवाई उघडकीस आणण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर … Read more

ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यासाठी अमित शहा शिकत आहेत ‘बंगाली’ भाषा

नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 ची तयारी सुरू केली आहे. त्याअंतर्गत ते बंगाली (बांगला) भाषा शिकत आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती तयार करताना भाषा हा अडथळा आणू इच्छित नाही. बंगालमध्ये निवडणूक अभियान सुरू होईल तेव्हा अमित शहा बंगाली भाषेत आपले भाषण देतील आणि भाषेच्या अडथळ्याशिवाय … Read more