अखेर फिरोदिया करंडक साठी विषय निवडीचे निर्बंध मागे
स्पर्धेच्या आयोजकांकडून जात, धर्म व्यवस्था, काश्मीर ३७०, भारत-पाक, हिंदू-मुस्लीम, राम मंदिर-बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते.
स्पर्धेच्या आयोजकांकडून जात, धर्म व्यवस्था, काश्मीर ३७०, भारत-पाक, हिंदू-मुस्लीम, राम मंदिर-बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते.
केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण पक्षात तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल
उन्नाव आणि हैद्राबाद मध्ये घडलेल्या अमानुष घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्याला धरून आज संसदेत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर भाष्य करताना रेप इन इंडिया असे वाक्य वापरले आहे.
ज्याला मोठं केलं त्याच्याकडून ही अपेक्षा नव्हती असे म्हणत भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढला आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त परळीमधील गोपीनाथ गडावर भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खडसे बोलत होते.
दिल्ली दरबारी गेलेल्या खडसेंना पक्ष नेतृत्वाने भेट नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी अधिकच वाढली आहे. त्यानंतर त्यांनी लगेचच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांच्या लागोपाठ भेटी घेतल्या आहेत. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे याचा पत्ता कुणालाही लागत नाही.
नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त इत्तर कुणाकडे जाण्याचा पायंडा पडणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदे याना गृह आणि नगरविकास खाते देऊन मोठा विश्वास दाखवला आहे. परंतु मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदेंकडून गृह खाते हे राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार आहे.
हे विधेयक लोकसभेत मांडल्यापासूनच ईशान्य भारत धुमसत आहे. मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरून या विधेयकाचा विरोध करत आहेत. तसेच मुस्लिम समाजामधून देखील नाराजी व्यक्त होत असल्याने, या विधेयकाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजप सरकार हा प्रयत्न करत आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहेत.
१२ डिसेंबर ला होणाऱ्या या मेळाव्यात पंकजा यांनी सर्व समर्थकांना मेळाव्याला येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या भाजपच्या काही नेत्यांवर नाराज आहेत का? आणि तीच खदखद गोपीनाथ गडावर बाहेर पडणार का
व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका.