विश्वजीत कदमांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट ; काँग्रेस नेत्यांनी भोवया उंचावल्या

सांगली प्रतिनिधी | अकस्मात आलेल्या महापूराने कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार विश्वजीत कदम यांचा मतदारसंघ असलेल्या पलूस कडेगावालाही चांगला फटका बसला आहे. ही पूरस्थिती वर्णन करण्यासाठी कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असल्याचे कदम यांनी फेसबूक पोस्टमधून सांगीतले आहे. मात्र, कॉंग्रेसची राजकीय अस्मिता आणि अवस्था पाहता कदम यांची फडणवीसांसोबतची भेट चर्चेचा … Read more

म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत केली वाढ

नागपूर प्रतिनिधी |  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जम्मू कश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्या नंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाच्या राष्ट्रीय मुख्यालयात अर्थात रेशीम बाग या या ठिकाणी राहतात. त्यांच्या राहत्या ठिकाणी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अंगरक्षणांच्या संख्येमध्ये … Read more

माढ्याच्या शिंदे बंधूनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

मुंबई प्रतिनिधी | माढा विधानसभेचे विद्यमान आमदार बबन शिंदे आणि त्यांचे बंधू सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीने राजकीय विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत संजय शिंदे यांचा दारुण पराभव झाल्याने त्यांच्या राजकीय अस्तित्वाला मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे स्वतःचे राजकीय पुनर्वसन व्य्वस्थितीत केले … Read more

वंचित खेळतंय काँग्रेस आघाडीसोबत पाठशिवणीचा खेळ ; आघाडीची मोठी ऑफर वंचितने धुडकावली

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला वंचित आघाडीने काँग्रेसचे चांगलेच कंबरडे मोडले असताना आता काँग्रेस वंचितला आपल्यात सामावून घ्यायला शर्थीचे प्रयत्न करत आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईमधील निवासस्थळी काँग्रेसचे नेते आणि वंचितचे नेते यांच्यात परवा महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. त्या बैठकीत देखील आघाडीचा तोडगा निघाला नाही असे सूत्रांनी सांगितले आहे. नवरा कामावर गेला की … Read more

या तारखेला पुन्हा सुरु होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा

मुंबई प्रतिनिधी |  देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपची महाजनादेश यात्रा काढण्यात आली होती. त्या यात्रेला मधेच थांबवण्याची नामुष्की भाजपवर आली. कारण महाराष्ट्रातील पूर परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा महाजनादेश यात्रेला निघणार आहेत. या यात्रेची सुरुवात २१ ऑगस्ट रोजी नंदुरबार शहरातून होणार आहे. तर ३१ ऑगस्टला सोलापूरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या यात्रेचा … Read more

भाजप नगरसेविकेची पुरग्रस्तांना जबर मारहाण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी विविध स्वरूपात मदतीसह इतर काही जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जात आहे. पण भाजपच्या नगरसेविका गीता सुतार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी यावेळी समोर आली. गीता सुतार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मराठा सेवा संघ येथील पूरग्रस्त निवारा केंद्र बंद पाडत निवारा केंद्रातील कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये एक … Read more

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारची तिजोरी रिकामी झाली तर कर्जही काढू : चंद्रकांत पाटील

पुणे प्रतिनिधी  : सांगली आणि कोल्हापुरात आलेल्या भीषण महापुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे. अनेक नागरिकांचे घर पडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शहरी आणि ग्रामीण भागाला पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. प्रत्येक पूरग्रस्ताचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी गरज भासल्यास कर्जही काढू अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पुण्यात शासकीय … Read more

आमदार भालके भाजपच्या वाटेवर ; थोरातांनी घेतली भालकेंची फिरकी

मुंबई प्रतिनिधी | पूराच्या समस्येवर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल काँग्रेसचे शिष्टमंडळ गेले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार भारत भालके बराच वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. शिष्टमंडळ परतल्या नंतर देखील भारत भालके मुख्यमंत्र्यांजवळ काय बोलत होते. याबद्दल तपशील उघड झाला नाही. परंतु भालकेंची भाजप जवळकी कॉंग्रेस नेत्यांच्या देखील नजरेतून लपून राहिली नाही. म्हणूनच भालकेंची … Read more

महापूराचा राजकीय वणवा ; अमित शहांनी कोल्हापूरच्या सासुरवाडीला मदत करावी : बाळासाहेब थोरात

मुंबई प्रतिनिधी सत्ताधारी आणि विरोधकांची महापूराच्या मुद्दयांवरून चांगलीच जंग जुंपाण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाच धारेवर धरले आहे. अमित शहा यांची सासुरवाडी कोल्हापूर आहे याची त्यांनी जाणीव ठेवून तरी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करावी. फक्त हवाई पहाणी करून काहीच होणार नाही असा खोचक … Read more

महाराष्ट्र भाजपच्या लोकप्रतिनिधींनी १ महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना द्यावे : चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या खासदार, आमदार, नगरसेवक , जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी आपले एका महिन्याचे वेतन सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्याचे निर्देश दिले आहे. या आदेशानुसार प्रत्येक लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टीच्या नावे आफत निधी असा आपल्या एक महिन्याच्या वेतनाच्या मूल्याचा चेक लिहून जमा करायचा आहे. … Read more