करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण नक्की जिंकू- नितीन गडकरी

नवी दिल्ली । जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाच्या लढाईत पुढे आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरं सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जातं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ तसंच करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू असा विश्वास … Read more

नवी मुंबईतील आयटी कंपनीत १९ जणांना कोरोनाचा संसर्ग

नवी मुंबई । नवी मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज आणखी २० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात महापे येथील टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका आयटी कंपनीच्या १९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेने एमआयडीसीतील विशेष करून आयटी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. महापे येथील एका आयटी कंपनीत लॉकडाउन असूनही काम सुरू … Read more

उद्धव-देवेंद्र यांच्या शासकीय निवासात कोरोनाचा शिरकाव; पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर तैनात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि महिला कॉन्स्टेबल कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या दोन्ही शासकीय निवास्थानावरील तैनात असलेल्या सर्व पोलिसांना क्वारंटाइनमध्ये राहण्यास … Read more

पती पत्नीने लाॅकडाउनमध्ये खोदली २५ फुट खोल विहीर, २१ व्या दिवशी लागले पाणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान घरात बसून काहीतरी नवीन करण्याचा विचार महाराष्ट्रातील एका जोडप्याने केला. गजानन पाकमोडे आणि त्यांच्या पत्नीने वाशिम जिल्ह्यातील कारखेडा गावात आपल्या घराच्या अंगणात २५ फूट खोल विहीर खोदली आहे. ही विहीर खोदण्यासाठी त्या दोघांना २१ दिवस लागले. यासंदर्भात गजानन म्हणाले की कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये आम्हाला घरातच राहावे लागेल, म्हणून … Read more

धक्कादायक! चीनमधून आयात केलेले कोरोना टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे; राजस्थान सरकारचा दावा

जयपूर । चीनमधून आयात केलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे येत असल्याचा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीननं पाठवलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवलं आहे. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्टही चीनमधून आयात … Read more

ट्रम्प, मोदींची रणनिती फेल? ‘या’ ३९ वर्षांच्या तरुण महिला पंतप्रधानाने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरं तर, न्यूझीलंडच्या ३९ वर्षीय पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतले,आणि त्याचेच परिणाम आज संपूर्ण जगासमोर आले आहेत.भारत आणि न्यूझीलंडमध्ये जवळपास दोन दिवसांच्या अंतराने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.२३ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती, जेव्हा जवळजवळ ३६३ कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली होती … Read more

देशातील कोरोनाबाधीतांची संख्या १८ हजार ६०१ वर, ५९० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना बळींची एकूण संख्या आता १८,६०१ वर पोहोचली आहे.शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यातील १४,७५९ अद्यापही कोविड -१९ विषाणूमुळे पीडित आहेत. उपचारानंतर सुमारे ३२५१ रुग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे,परंतु मृतांचा आकडा मात्र ५९० वर पोहोचला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अंदमान आणि निकोबारमधील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या आता १६ … Read more

चिंता कायम! राज्यात नव्या 472 रुग्णांची नोंद, एकूण संख्या 4 हजार 676 वर

मुंबई । राज्यात करोनाबाधितांची रुग्ण संख्या अद्यापही वाढतच आहे. आज सकाळी १० वाजेपर्यंत राज्यात 472 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आणखी ९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. आज नवीन रुग्ण आढळल्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या 4 हजार 676 वर पोहचली आहे. याबरोबरच आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 232 वर … Read more

कोरोनाव्हायरस पोहोचला न्यूक्लियर लाँचपॅडवर,यूएस-फ्रान्स कमांडवर प्रश्न उपस्थित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत दररोज दोन हजाराहून अधिक लोकांचा बळी जात आहे आणि दररोज सुमारे २५ ते ३० हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत. अमेरिकेसाठी हा विषाणू केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही एक आव्हान बनला आहे. त्याच वेळी, जगातील दोन न्यूक्लियर पॉवरचे लॉन्च पॅड कोरोनाला पॉझिटिव्ह आले आहे. हे लॉन्च पॅड आहेत … Read more

लहान मुलांना कोरोनापासून कसं दूर ठेवावं? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाव्हायरस संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या सातत्याने वाढतच आहे.शनिवारी या आजाराने देशातील सर्वात तरुण कोरोना संक्रमित मुलाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील कलावती शरण मुलांच्या रूग्णालयात कोरोना संक्रमणामुळे केवळ ४५ दिवसांच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला.या मुलाला आयसीयूमध्ये दाखल केले गेले होते. मुलाचे वडीलही कोरोना पॉझिटिव्ह आहेत.आता रुग्णालय प्रशासन तपासणी करीत आहे की … Read more