धक्कादायक! मुंबईमधील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातील ७२ कैदी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुरुंगातील एका स्वयंपाकीच्या माध्यमातून एकाच बॅरेकमधील या ७२ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व कोरोनाबाधित कैद्यांना मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तुरुंगाबाहेर क्वारंटाइन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. तुरुंगात असलेल्या … Read more

कोरोनाचा थेट मंत्रालयावर हल्ला; एका प्रधान सचिवाला कोरोनाची बाधा

मुंबई । मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. अशा गंभीर स्थितीत सरकारतर्फे मोठ्या उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. मात्र जिथून या उपाययोजनांची सूत्र हलवली जातात त्या मंत्रालयात आता कोरोनानाने शिरकाव केला आहे. मंत्रालयात एका विभागाच्या प्रधान सचिवांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे परराज्यातील मजूर आणि राज्यात अडकलेल्या नागरिकांच्या व्यवस्थेसाठी मंत्रालयात स्थापन … Read more

गुड न्यूज! राज्यात २ दिवसांत ७०० कोरोनाबाधित झाले बरे- राजेश टोपे

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी मिळत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांत जवळपास ७०० पेक्षा अधिक रुग्ण कोरोना आजारातून पूर्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे ३५० … Read more

कोरोनाच्या लढाईत योगदान द्या, अन्यथा..; राज्य सरकारची खासगी डॉक्टरांना नोटीस

मुंबई । राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भावमुळे सरकारी आरोग्य विभागावर ताण वाढला आहे.सरकारी आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांना एक नोटीस बजावली आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी खासगी तत्त्वांवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी सेवाभावाने पुढे येत आपलं योगदान द्यावं असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे. सर्वच खासगी डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयांमध्ये सेवेत रुजु व्हावं असं … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंनी रेल्वे, लष्कर व पोर्ट ट्रस्टला दिली मदतीची साद; केली ‘ही’ मागणी

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या चाचण्यांबरोबरच रुग्णांची संख्याही वाढत असल्यानं राज्य सरकारनं उपचाराच्या सुविधा वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.  त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विविध संस्थांकडं आयसीयू बेड्ससाठी जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत म्हणून रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये व संस्थांनी … Read more

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात अधिकाधिक ICU बेड्स उपलब्ध – मुख्यमंत्री

मुंबई ।  ”गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोरोना … Read more

कहर कोरोनाचा; देशभरात २४ तासांत १२६ जणांचा मृत्यू; 2 हजार 958 नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहे. गंभीर बाब म्हणजे देशात कोरोनाबाधितांची आकडा 50 हजारांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. देशातील सतत वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या देशाची चिंता वाढवणारी आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 49 हजार 391 वर पोहचली आहे. आतापर्यंत देशाभरात 1 हजार 694 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 हजार 183 लोक … Read more

कोरोना संदर्भात रशियन सरकारवर टीका करणारे तीन डॉक्टर पडले रहस्यमय अपघातांना बळी जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियामध्ये अचानक कोरोना विषाणूची प्रकरणे वाढली आहेत, ज्यामुळे वैद्यकीय कर्मचार्‍यांची अवस्था आणखी बिकट झालेली आहे.इथे रूग्णांची तपासणी करण्यासाठीही वैद्यकीय उपकरणे उपलब्ध नाहीत. यानिमित्ताने डॉक्टर सतत सरकारवर टीका करीत असून या टीकेच्या बदल्यात त्यांना मृत्यूचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन आठवड्यांत रशियातील ३ डॉक्टर हे रुग्णालयाच्या खिडकीतून खाली पडले आहेत, त्यातील … Read more

दारुची दुकाने सुरु झाल्यानिमित्त ठेवली पार्टी अन् मित्राचा चाकू घुपसून केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये कोविड -१९मुळे लॉकडाउन सुरु करण्यात आला होता. यावेळी लावण्यात आलेल्या निर्बंधांवरील शिथिलतेमुळे दारूची विक्री सुरू झाल्यानंतर दारूमुले झालेल्या भांडणात दोन जण ठार झालेत.तर दुसर्‍या एका घटनेत एक महिला आरोग्य कर्मचारी आणि तिचा नवरा हे या हल्ल्यात जखमी झालले आहेत. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दारूची दुकाने उघडल्याच्या आनंदात पार्टी दिली … Read more

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी ‘युवा स्पंदन’चा पुढाकार

पुण्यातील रिक्षाचालकांच्या मदतीसाठी युवा स्पंदनने पुढाकार घेतला आहे.