‘IFSC केंद्राबाबतचा तुमचा वकिली बाणा गेला खड्यात’; संजय राऊतांनी फडणवीसांवर डागली तोफ

मुंबई । मोदी सरकानं मुंबईत प्रस्तावित असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र अर्थात IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या निर्णयावरून राज्यातील राजकारणही बरंच तापलं आहे. एकीकडे भाजपा IFSC केंद्र गांधीनगर हलवण्याच्या निर्णयाला काँग्रेसचं जबाबदार असल्याचं सांगत केंद्राचा बचाव करण्याचा प्रयन्त करत आहे. तर राज्यातील इतर नेते केंद्रानं मुंबईवर अन्याय केल्याची भावना … Read more

अखेर देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी, म्हणाले..

मुंबई । छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करताना त्यांचा सामाजिक कार्यकर्ते असा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर भाजपा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनीदेखील आक्षेप घेत ट्विट करून देवेंद्र फडणवीस यांनी शिव-शाहू भक्तांची माफी मागावी, असं जाहीर केलं अखेर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटसंबंधी माफी मागितली आहे. शाहू … Read more

‘त्या’ ट्विटमधून फडणवीसांची मनातील भावना बाहेर आली बस..एवढंच- काँग्रेस

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वादाला निमंत्रण दिले आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांच्या स्मृतीदिन. यानिमित्तानं फडणवीस यांनी राजर्षि शाहू महाराज यांना ट्विट करून अभिवादन केलं. मात्र, या ट्विट मध्ये फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराजांचा उल्लेख ‘सामाजिक कार्यकर्ते’ असा केला. त्यावरून नवा वाद सुरू झाला … Read more

फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील ‘त्या’ पोस्टवर सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया

मुंबई । राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका नव्या वादाला निमंत्रण दिले आहे. आज छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा यांचा स्मृतीदिन. यानिमित्तानं फडणवीस यांनी सोशल मीडियावर शाहू महाराजांना अभिवादन करताना त्यांच्या उल्लेख ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ असा केल्यानं नेटकरी चांगलेच संतापले आहेत. या प्रकारानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले … Read more

अमृता फडणवीसांनी कोरोना योध्यांसाठी हातात घेतला माईक; म्हटलं आभार गीत

मुंबई । कोरोनाच्या लढाईत जिवाजी पर्वा न करता डॉक्टर, नर्स,पोलीस, सफाई कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाची लढाई ते संपूर्ण समर्पण देऊन लढत आहेत. अशा निडर कोरोना योद्धांचे मनोधर्य आणि आभार मानण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक गाणं गायलं आहे. ‘तू मंदिर, तू शिवाला’ असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या … Read more

बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की…! – वरुण सरदेसाई यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की हा ‘लॉकडाउन लूक’ आहे ?”, असं ट्विट करत युवासेनेचे नेते आणि सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत टोला लगावला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडावा वाढत असतानाचा दुसरीकडे राजभवन आणि मंत्रालयातील संघर्ष वाढतानाचा दिसत आहे. यावरुनच सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more

फडणवीस-राज्यपाल भेट; म्हणाले राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती

मुंबई । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकावर टीका करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारीची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिलं आहे. यावेळी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आपल्या वाहिनीवर सोनिया गांधींवर आक्षेपार्ह्य विधान केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होत. ही घटना म्हणजे मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण … Read more

फडणवीस साहेब, ही वेळ राजकारणाची नाही एकत्र येऊन लढण्याची आहे – अशोक चव्हाण

मुंबई । ”मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की, ही ब्लेमगेमची वेळ नाही. आपल्याला राजकारण करायला खूप वेळ आहे. करोनाचं संकट संपल्यावर ते करू. विधानसभा निवडणुका लागल्यावर ते करू. त्यावेळी आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ.” असं आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य … Read more

देश संकटात असताना विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा – रोहित पवार

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रीय संकटात विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आताचे विरोधक थोडे विचलित झाल्यासारखे वाटतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. थोडे सॅनिटायझर राखून ठेवा लाॅकडाउन संपल्यानंतर १०५ डोकी साफ करण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली होती. मिटकरी यांच्या सदर … Read more

लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ, टीका करणे हा एकमेव धंदा शिल्लक – अमोल मिटकरी

अकोला प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केले आहे. वाधवान कुटुंबियांच्या पाचगणी प्रवासावरुन भाजप समर्थक महाविकास आघाडीवर टिका करत आहेत. यावर आता मिटकरी यांनी आपले मत व्यक्त केले … Read more