धनंजय मुंडेंची मोठी घोषणा ; ‘या’ दिवशी होणार बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं लोकार्पण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी इंदू मिलमधील आंबेडकर स्मारकाबाबत मोठी घोषणा केली आहे. 14 एप्रिल 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण होईल, अशी घोषणा मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन ; मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांनी केलं अभिवादन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर किशोरी पेडणेकर, धनंजय मुंडे, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. तर आरपीआयचे नेते रामदास आठवले हे देखील चैत्यभूमीवर येत अभिवादन … Read more

तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करतोय ; जयंत पाटलांचे बाबासाहेब आंबेडकरांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 व्या महापरिनिर्वाण दिन (BR Ambedkar 64th Death Anniversary ). महाराष्ट्रासह देशभरातील अनुयायी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते  जयंत पाटील यांनीही  #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे विनम्र अभिवादन केले आहे. यंदा कोरोनाच्या … Read more

देशाला कायदा देणाऱ्यांच्या वारसदारांनी कायदे भंगाची भाषा करणं योग्य नाही; प्रकाश आंबेडकरांवर संजय राऊतांची टीका

मुंबई । प्रकाश आंबेडकरांनी मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज पंढरपुरात आंदोलन केलं. यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थकांनी गर्दी केली. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिराकडे जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद केले आहेत. दरम्यान, लोकांकडून बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला गेला. याबाबत प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता. आपण नियम मोडण्यासाठीच आलो असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत … Read more

तोडफोड प्रकरणानंतर राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृहा’ला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर … Read more

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही- मुख्यमंत्री

मुंबई । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी राजगृहाच्या काचांवर दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली होती. या अनुचित घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत असून पोलीसदेखील याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान, राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

बाबा आढाव हे एक चिवट आणि निडर चळवळ्या नेते – शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झोपड्पट्टीधारक, हमाल, कष्टकरी यासारख्या असंघटीत कामगारांसाठी आयुष्य वेचणारे बाबा अशी ओळख असणारे नेते बाबा आढाव यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट ‘हमालांच्या कल्याणासाठी हिमालायाइतके कष्ट उपसणाऱ्या हिम्मतवाल्या बाबा आढावांना निरोगी दीर्घायू मिळावे म्हणून वाढदिवसानिमित्त माझ्या मनपूर्वक शुभेच्छा!’ अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. पवार … Read more

जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste) – हिंदूंना आपल्या धर्माबद्दल जागरुक करणारं चिंतन

भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी ‘तत्व’ (principles) आणि ‘नियम’ (rules) यांच्यातला फरक स्पष्ट केला आहे. धर्म हा तत्वांचा भाग असला पाहिजे. त्याने सर्व गोष्टींचे नियम ठरवून देता कामा नये. शास्त्र आणि स्मृतींमधे अडकलेला हिंदु धर्म हा एक नियमांचं गाठोडं बनला आहे त्यामुळे त्याला या स्वरूपातून मुक्त करणं गरजेचं आहे असं ते म्हणतात.

यंदाची आंबेडकर जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. दरम्यान, त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. … Read more

आंबेडकर जयंती साजरी करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं ‘हे’ आवाहन

मुंबई । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. सरकारकडून लोकांना घरातच बसण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंबेडकर जयंती आणि फुले जयंती साजरी करण्याबाबत एक महत्वाचं आवाहन राज्यातील जनतेला केला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदा आंबेडकर आणि फुले … Read more