विजेच्या तुटवड्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; ‘या’ राज्याकडून घेणार वीज विकत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यावर सध्या कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज टंचाई व निर्मितीचे संकट आहे. या अनुषंगाने आज पार पडलेल्या राज्यमंत्री मंडळाच्या विशेष बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये राज्यावरील लोडशेडिंग टाळण्यासाठी आधीच्या करारापेक्षा वाढीव दराने वीज खरेदी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला असून ती वीज गुजरात या राज्याकडून खरेदी करण्यात येणार आहे. … Read more

कर्नाटक, तेलंगणा व पंजाबच्या धर्तीवर मोफत वीज देण्याची मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा मोर्चा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कर्नाटक तेलंगणा व पंजाब या राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शेतीला मोफत वीजपुरवठा करावा इत्यादी प्रमुख मागण्यांसह जत तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दुपारी जत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रखरखत्या उन्हात या काढण्यात आलेल्या या धडक मोर्चाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार गुरूबसू शेट्टयापगोळ यांना निवेदन देण्यात आले. पंजाब, कर्नाटक, … Read more

“वसुली न करणे हे पाप असेल तर ती चूक मी पुन्हा करेन, माझी तत्काळ चौकशी करा” : चंद्रशेखर बावनकुळे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्याच्या काळात महावितरण कंपनीने राज्यभरात अनेक प्रकल्प उभारले होते. त्या प्रकल्पाची चौकशी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यासाठी कंपनीच्या तीन सदस्यांची समिती नेमली असून एका महिन्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. यावरून भाजप नेते … Read more

“महाविकास आघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए” ; चंद्रकांत पाटील यांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज वसुलीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केलयानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन महिन्यांसाठी वीज तोडणी तूर्तास थांबवण्यात येत आहे,” … Read more

“शेतकऱ्यांची वीज तोडणी तूर्तास थांबवणार”; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज वीज तोडणी तत्काळ बंद करावी या मागणीवरून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. त्यांनी सभात्यागही केला. त्यांच्या सभात्यागानंतर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा केली. “तूर्तास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या पुढील काळात शेतकऱ्यांची तीन … Read more

शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मागणीसाठी स्वाभिमानीचा “रास्ता रोको”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर येथे धरणे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा 10 वा दिवस आहे. अद्यापही या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने याचा साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. सातारा येथे राज्य सरकार आणि ऊर्जामंत्री यांचा निषेध करत … Read more

थकीत बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडले, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सब स्टेशनलाच टाळे ठोकले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील मसूर येथे महावितरण कंपनीच्यावतीने थकीत बिल वसुलीसाठी मसुर गावच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन बंद केल्याचा प्रकार केला. त्यामुळे मसूरच्या सुरळीत पाणीपुरवठा काहीकाळ बंद झाला. दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे सबस्टेशन टाळे केले. याबाबत अधिक माहिती अशी, मसूर येथील ग्रामपंचायतीचा 12 वर्षापासून  महावितरण कंपनीकडे लाखो रुपयांचा … Read more

बामणोलीमध्ये झाली सहा लाखांच्या विजेची चोरी, फॅब्रिकेटर्स चालकावर गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सांगलीतल्या बामणोली मध्ये असणार्‍या शिवराज फॅब्रिकेटर मध्ये मीटर मध्ये छेडछाड करून 15 हजार 846 युनिट वीज मोफत वापरून 5 लाख 96 हजारांच्या विजेची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ऑक्टोबर 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत वीज चोरीचा प्रकार सुरु होता. या प्रकरणी महावितरणचे अधिकारी महेशकुमार श्रीरंग राऊत यांनी सांगली शहर … Read more

महाराष्ट्रात वीज कापण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही; नितीन राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील वीज थकबाकीसंदर्भात वीज वित्रांकडून वसुलीची मोहीम राबविली जात आहे. दरम्यान महाराष्ट्रात अंधारात जाण्यापासून वाचविण्यासाठी काही पर्याय अवलंबवावे लागणार आहेत. या संदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कृषी वीजपंप ग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा व सार्वजनिक पथदिवे यांची वीज थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्याशिवाय … Read more

राज्यात कोणालाही वीज फुकट मिळणार नाही; ऊर्जा मंत्री नितीन राऊतांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्याना वीजबिल माफ करावे, अशी मागणी करन्याय आली होत. त्यावेळी या मागणीचा विचार करू असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता राज्यातील वीज बिलांसंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. राज्यात कुणालाही वीज फुकट मिळणार नाही, आम्ही कर्ज घेऊन पैसे भरतो, मग ग्राहकाला फुकट … Read more