औरंगाबाद मध्ये 24 ते 26 जून दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन; मुलाखतींद्वारे मिळणार थेट नोकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , औरंगाबाद यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 ते 26 जून 2020 दरम्यान करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम … Read more

लॉकडाउन काळात नोकरी गेली असेल तर चिंता करू नका; घरच्या घरी करा ‘हा’ उद्योग आणि कमवा लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकाना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आपण जिथे जिथे पहाल तिथे अशी एक तरी बातमी असते की मोठ्या कंपन्या आपल्या लोकांना नोकर्‍यावरून काढत आहेत. त्यामुळे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी घरातल्या घरातच बसून आपला व्यवसाय सुरु करण्याची … Read more

Lockdown Impact | स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा करत आहेत नाला सफाईचे काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सर्वत्र कोरोनामुळे संचारबंदी असल्याने तळहातावर पोट असणाऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांच्या रोजगारावर लॉकडाऊनमुळे गंभीर परिणाम झाला असून त्यांच्या हाताचे काम गेले आहे. शहरी भागात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांवर देखील यामुळे मोठी समस्या ओढवली असून कोरोना संसर्गाच्या भीतीने कोणीही कामावर बोलावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली … Read more

लॉकडाऊनमुळे तब्बल १२ कोटी लोक झाले बेरोजगार

नवी दिल्ली । कोरोनामुळे ओढवलेल्या लॉकडाउनचा जसा जागितक अर्थव्यस्थेवर परिणाम झाला आहे तसा भारतावर सुद्धा झाला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सुरु असलेल्या आतापर्यंतच्या दीर्घकालीन लॉकडाउनने देशातील १२ कोटींहून अधिक कामगारांना देशोधडीला लावले आहे. गेल्या महिनाभरात देशात १२ कोटी २० लाख बेरोजगार झाल्याची धक्कादायक आकडेवारी एका अहवालातून समोर आली आहे. ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात बेरोजगारीचा … Read more

उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलीय? विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या व नौकरीस इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करावे. असे आवाहन परभणीचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. नौकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या … Read more

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

नवी दिल्ली । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या लॉकडाउनमुळे देशातील बरेच व्यवहार ठप्प आहेत. याचा मोठा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउनचा सर्वात मोठा फटका हा देशाअंतर्गत रोजगाराला बसणार असल्याचं सीआयआय केलेल्या एका सर्व्हेक्षणात म्हटलं गेलं आहे. कोरोनामुळं लागू केलेल्या लॉकडाउनमुळे देशातील ५२ … Read more

नॉन-गजेटेड पदांकरिता सरकार नेशनल रिक्रूटमेंट एजेंसीची स्थापना करणार; सरकारी नोकरी मिळवण्याचा मार्ग बदलेल

नॉन-गजेटेड पदांच्या भरती प्रक्रियेत सरकार मोठे बदल करण्याची तयारी करत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२० च्या अर्थसंकल्प जाहीर करताना

RBI मध्ये ९२६ पदांसाठी भरती, मुंबईसाठी सर्वाधिक रिक्त पदे

पोटापाण्याची गोष्ट | रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक पदांच्या एकूण 926 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांना https://ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर अर्ज करता येणार आहेत. मुंबई आॅफिसकरता सर्वाधिक ४१९ तर न‍ागपूर आॅफिसकरता १३ जागा रिक्त आहेत. अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – सहाय्यक एकूण जागा – ९२६ जागा शैक्षणिक पात्रता … Read more

निराशाजनक! १६ लाख रोजगाराच्या संधी होणार कमी

मुंबई | देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना आता यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे समोर आले आहे. बेरोजगारांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण असून याचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाने केलेल्या एका पाहणीतून सदर माहिती समोर आली आहे. यंदाच्या वर्षी १६ लाख रोजगाराच्या संधी कमी होणार असल्याचे स्टेट … Read more