निसर्ग चक्रीवादळामुळे आतापर्यंत ५ जण जखमी, कोणतीही जीवितहानी नाही- उदय सामंत

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याना तडाखा बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले आहेत. मात्र जिवितहानी नाही. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानाबाबत 2 दिवसांत भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र … Read more

मुंबईवरील ‘निसर्गा’चं संकट टळलं; रेड अलर्ट अजूनही कायम

मुंबई । मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या निसर्ग वादळानं अचानक दिशा बदलल्यानं मुंबईवरील धोका आता टळला आहे. असं असलं तरी पुढील काही तास मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. निसर्ग वादळाने आता महाराष्ट्राची किनारपट्टी ओलांडली असून हे वादळ आता थोडे ईशान्येकडे सरकू लागले आहे. दुपारी १२.३३ ते २.३० च्या दरम्यान अलिबागला धडकलेल्या या वादळानं रौद्र रूप धारण केलं होतं. … Read more

जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला – संजय राऊत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  गेले अनेक दिवस देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्या, कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोना उपचार, कोरोनासंबंधी राजकीय लोकांचे आरोप-प्रत्यारोप, कोरोना बचावासाठीचे उपाय, दक्षता असे अनेक विषय माध्यमांमधून झळकत आहेत. टीव्ही लावला असता टीव्ही वर सतत कोरोनाचे अपडेट्स दिले जात आहेत. आज मात्र या बातम्यांची जागा ‘निसर्ग’ चक्रीवादळाने घेतली आहे. सकाळपासून टीव्हीवर … Read more

‘उद्धव ठाकरेजी मी आहे तुमच्या सोबत’; अरविंद केजरीवालांचे ट्विट

मुंबई । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राती जनतेला पाठिंबा दर्शवला आहे. या संकटाच्या काळात आपण मुख्यमंत्री ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत आहोत असे केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘प्रिय उद्धव ठाकरेजी, दिल्लीच्या जनतेच्या वतीने मी निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा हवाई वाहतुकीला फटका! मुंबई विमानतळ बंद

मुंबई । मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या निसर्ग वादळामुळं मुंबई आणि परिसरात सोसाट्याचे वारे आणि विमान घसरल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या निसर्ग वादळामुळं अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. याच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबई विमानतळावर आज उतरलेले फेडेक्स … Read more

रायगडमधील दिवेआगार, श्रीवर्धन किनाऱ्यावर ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकलं

रायगड । ‘निसर्ग’ चक्रीवादळ अखेर अलिबागच्या किनाऱ्यावर धडकलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतची माहिती दिली. रायगड जिल्ह्यात अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगार येथील किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकलं. या चक्रीवादळाचा केंद्रबिंदू परिघ ६० किलोमीटर असल्याची माहिती त्यांनी दिली. हे वादळ किनाऱ्यावर धडकत असतेवेळी लँडफॉल अर्थात वाऱ्याचा वेग हा प्रतितास १०० किलोमीटर इतका होता. सध्याच्या घडीला वादळाचा … Read more

मुंबईत वाऱ्याचा वेग वाढला, बांद्रा-वरळी सी लिंकवरील वाहतूक केली बंद

मुंबई । मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आधीच खबरदारी घेतली होती.मुंबईत वाऱ्याचा वेगही वाढल्याने नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबईत समुद्रातून जाणारा वरळी-बांद्रा सी लिंकवरची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच जितामाता उद्यानातील प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बुधवारी दुपारनंतर मुंबईत मोठा पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता … Read more

हुश्श! निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईवरील धोका आणखी कमी

मुंबई । दहशतीचं सावट घेऊन आलेलं निसर्ग चक्रीवादळ हे बुधवारी मुंबईत धडकण्यापूर्वीच ते ५० किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. परिणामी या चक्रीवादळाचा मुंबई शहराला असणारा धोका हा आणखी कमी झाला आहे अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना दिली. निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता ही सुपर सायक्लोन इतकी तीव्र नाही. मुळात हे वादळ … Read more

निसर्ग चक्रीवादळ: जवळपास ४० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले

मुंबई । निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असून काही तासात हे वादळ रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४० हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या दलाने या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तसेच मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील … Read more

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलल्या

मुंबई । अलिबागच्या किनारपट्टीवर धडकून मुंबईच्या दिशेनं घोंगावणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. रस्ते वाहतुकीपासून ते हवाई आणि आता रेल्वे वाहतुकीवरही निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. चक्रीवादळाचे अतिशय रौद्र स्वरुप धारण करण्याचा धोका पाहता वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या … Read more