नितेश राणे यांनी घेतली आघाडी, शिवसेनेचे कडवे आव्हान अजूनही कायम

सिंधुदूर्ग प्रतिनिधी । देशाला दिशा दाखवणाऱ्या या राज्यावर सत्ता कुणाची याचा फैसलाही मतमोजणीनंतर होणार आहे. कोकणात झालेल्या शिवसेना व राणे कुटुंबीयांतील लढतीत कोण बाजी मारणार? असा सवाल उपस्थित होत होता. निकाल जसे जसे समोर येत आहेत तसे चित्र आता स्पष्ट होत आहे. शिवसेनेने सतीश सावंत यांनी विरोधात उभे असतांना आता नितेश यांनी मतमोजणीत आघाडी घेतली … Read more

‘नितेश ५० हजार मतांनी निवडून येणार ‘- नारायण राणे

विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. निवडणूक निकालापूर्वी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये निकालाची धाकधूक आहे तर, दुसरीकडे आमदारकीच्या या परीक्षेमध्ये कोण पास होणार कोण नापास होणार,हे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे निवडून येणार असल्याचं भाकितं केलं.

नितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी; शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा आरोप

राज्यातील विविध भागांतील हद्दपार झालेले आरोपी नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी आहेत. आणि ते राजरोसपणे पैसे वाटण्याचे काम करत आहेत असा आरोप सतीश सावंत यांनी केला. सावंत यांच्या आरोपानंतर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

राणेंच्या पाठीमागं शिवसेना हात धुवून, कणकवलीत दिला ‘हा’ उमेदवार

सिंधुदुर्ग प्रतिनिधी। माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांना शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही भाजपने पक्षात प्रवेश दिला. त्यातच नितेश यांना भाजपने कणकवली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. भाजपच्या या निर्णयाला शिवसेनेने आपला उमेदवार कणकवली निवडणूक रिंगणात उतरवून आपला विरोध दर्शवला आहे. शिवसेनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेनेने … Read more

युती २८८ नव्हे २८७ जागीच : भाजपच्या या उमेदवारा विरोधात शिवसेनेने दिला उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | भाजप आणि शिवसेनेत टोकाचे मतभेद असताना देखील शिवसेना भाजप युती झाली. युती झाल्यानंतर देखील शिवसेनेचे ज्या कुटुंबा सोबत हाड वैर आहे. अशा राणे कुटुंबातील उमेदवाराच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार दिला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात पदाधिकारी असणाऱ्या सतीश सावंत यांनाच शिवसेनेने पक्षात घेत नितेश राणे यांच्या विरोधात निवडणुकीला उतरवले आहे. सतीश सांवत हे नारायण राणे … Read more

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाला दीपक केसरकारांचा अडथळा ; राणेंच्या मुलांवर शिवसैनिक नाराज

नारायण राणेंची मुलं ही अत्यंत तीव्र शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात. शिवसैनिकांना आधीच बाळासाहेबांविरोधी बोललेलं चालत नाही. अशा परिस्थितीत नारायण राणेंना भाजपमध्ये घेतलं तर शिवसैनिक नाराज होतील.

कणकवलीत नितेश राणे भाजपचे उमेदवार

सिंधुदूर्ग प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कणकवली मध्ये गेले असता स्वाभिमान पक्षाचे नेते  नारायण राणे यांनी त्यांचं स्वागत केले.  कणकवली मधील  महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष्याच्या कार्यालया समोर हे स्वागत करण्यात आल.  सोबतच नारायण राणे यांचे भाजप प्रवेश लवकर होणार असल्याचे नारायण राणे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघातील जागा देखील … Read more

हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा

मुंबई प्रतिनिधी | नितेश राणेंनी केलेला फिल्मी स्टंट त्यांच्या चांगलाच अंगलट येऊ लागला आहे. त्यांना त्या प्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांना फोन करून या प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा अशी याचना केली. त्याबद्दल स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग … Read more