शहरातील बेकायदा नळ लवकरच होणार बंद

Water supply

औरंगाबाद – गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील बेकायदा नळांचा विषय गाजत आहे शहरात बेकायदा नळांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते. पण अजूनही मनपाला हें शोधून बंद करता आलेले नाहीत. परंतु आता नव्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील अनेक भागातील बेकायदा नळ आपोआप बंद होणार आहे. नव्या पाणीपुरवठा योजनेत सुमारे 1 हजार 900 किलोमीटरची पाईपलाईन शहरात टाकली जाणार … Read more

शेतकऱ्यांना शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे- पालकमंत्री सुभाष देसाई

water

औरंगाबाद – जिल्ह्यातील धरण व कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतीसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन तसेच पाण्याचा वहनव्यय, कालव्याची देखभाल दुरस्ती व बांधकाम, पाणी आवर्तन, पाणीपट्टी वसुली बाबत उद्ष्टिसाध्य, याबाबतच आढावा आज सिंचन भवन येथे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी घेतला. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कालवा … Read more

पाण्याच्या प्रश्नाला घेऊन मनसे पुन्हा आक्रमक

mns

औरंगाबाद – शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून खुर्चीत बसल्याने आपले हिंदुत्व विसरली आहे. व आता हे ध्वज दिवाळी असे काही केविलवाणे प्रयत्न करून आम्ही हिंदू आहोत असा आव आणण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना मुबलक पाणी मिळायला हवे होते मात्र सत्ताधारी शहरात ध्वज लावण्यात व्यस्त आहेत. 50 हजार भगवे ध्वज … Read more

पाण्याचा हौदात पडून मेंढपाळाच्या मुलीचा मृत्यू

Water

औरंगाबाद | सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे इमारत बांधकामाच्या पाण्यासाठी बनवलेल्या पाण्याच्या हौदात पडून एका सात वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आशा चंद्रभान आहिरे, वय – 7 वर्षें (रा. बेलखेडा ता. कन्नड) असे मृत मुलीचे नाव आहे. कन्नड तालुक्यातील एक मेंढपाळ कुटुंब बेलखेडा येथील घाटमाथ्यावर काही दिवस मेंढ्या चराईसाठी आले होते. ती परतीच्या … Read more

एमआयडीसीने दिले चिकलठाणा विमानतळाला पाणी; तब्बल बारा वर्षांनंतर सुटला प्रश्न

aurangabad Airport

औरंगाबाद | मागील १२ वर्षापासून चिकलठाणा विमानतळाला भेडसावत असलेला पाणी प्रश्न अखेर संपूष्टात आला आहे. एमआयडीसीने चिकलठाणा विमानतळाला पाणी दिले असून गुरूवारी (दि.10) विमानतळावर जलपुजन सोहळा रंगला होता. तब्बल बारा वर्षानंतर पाणीप्रश्न सुटल्याने चिकलठाणा विमानतळाचे निर्देशक डी. जी. साळवे यांनी याप्रसंगी एमआयडीसीचे आभार व्यक्त केले. चिकलठाणा विमानतळावर झालेल्या जलपुजन सोहळ्यास विमानतळाचे निर्देशक डी. जी. साळवे, … Read more

रक्तरंजित लढाई लढू, पण उजनीचे पाणी जावू देणार नाही :- आ. शहाजी पाटील

सोलापूर | इंदापूर पाणी नेण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून घेतलेला आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारचा समन्वय हवा होता. उजनी धरण सोडल तर सोलापूर जिल्ह्याला सिंचनसाठी पाणी नाही. अचानक 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळविणे आणि अर्थमंत्र्यांनी 600 कोटी रूपये मंजूर करणे हे सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे. भरणे मामा हे पालकमंत्री आहेत, तेव्हा त्यांनी जिल्ह्याच्या … Read more

दुर्दैवी घटना ! बुडणाऱ्या भाच्यांना वाचवताना मामाचाही बुडून मृत्यू

Drawned

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे वाण नदीच्या पात्रातील पाणीच्या डोहामध्ये बुडणाऱ्या भाच्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा हि बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात घडली आहे. यात दोन सख्ख्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर सोनपेठ तालुक्यात शोककळा पसरली आहे. सोनपेठ तालुक्यातील निमगाव येथील एक महिला दसरा सणानिमित्त कपडे धुण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी … Read more

साधे पाणी करू शकते कोरोना विषाणूचा खात्मा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच कोरोना संक्रमणापासून साधे पाणी बचाव करू शकते या मुळे दिलासा मिळतो आहे. साध्या पाण्याने कोरोनाचा खात्मा करता येतो केवळ पाणी कसे प्यावे हे माहिती असणे आवश्यक आहे. रुस च्या व्हॅक्टर अँड रिसर्च बायोटेक्नॉलॉजी … Read more

पश्चिम विदर्भातील धरणांमध्ये ३५% जलसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत २०% वाढ

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती विभागातील ५ जिल्ह्यामध्ये असलेले मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या ५०९ पाणी प्रकल्पात केवळ १४.१५% फक्त जलसाठा हा शिल्लक होता. दरम्यान मागील वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने या वर्षी या प्रकल्पात मे महिन्यात ३५% जलसाठा शिल्लक असल्याने अमरावती विभागात पाणी टंचाई ची फार … Read more

मेळघाटात पिण्याचे पाणी पेटले…पहा स्पेशल रिपोर्ट (Video)

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई संपुर्ण भारत सध्या लाॅकडाऊन आहे. प्रखर ऊष्णता अंगाची लाही लाही करणारी ठरत आहे. घराबाहेर पडू नका असे शासनाचे आदेश सर्वत्र आहेत. मात्र अमरावती च्या मेळघाटात परीस्थिती वेगळीच आहे. करण येथे पाणीच नाही. होय ऐकून मन काहीस स्तब्ध झालय ना. मात्र हो आपण जे ऐकतोय ते खर आहे. मेळघाटातील भागामधील हे … Read more