कराड : कृष्णा घाटावर वाहतूक पोलिसास धक्काबुक्की

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील कृष्णा घाटावर शासकीय कामात अडथळा आणून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 9 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली याबाबत वाहतूक शाखेचे कर्मचारी संतोष बाळकृष्ण पाटणकर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. महेश नागाप्पा थोरात व 21 राहणार शाहू चौक … Read more

कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर खोतांना कळेल काय ते! हसन मुश्रीफांचा पलटवार

Hasan mushrif

मुंबई । रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. तुम्ही कधी क्रिकेट खेळला होता, तरीही तुम्ही क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होताच ना. मग सचिन तेंडुलकरने शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केली तर बिघडले कुठे? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना केला होता. यानंतर आता कडकनाथ कोंबड्या मागे लागल्यावर … Read more

सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीसोबत त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात; राजू शेट्टींची मागणी

सांगली । ”सेलिब्रिटींकडून देशभक्ती शिकण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. सरकारनं जरुर त्यांनी चौकशी करावी. त्याचबरोबर त्यांची आर्थिक चौकशीही करुन त्यांच्या आर्थिक भानगडी बाहेर काढाव्यात”, अशी मागणी माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. सेलिब्रिटींच्या ट्वीटवरुन जोरदार राजकारण रंगलेलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी आज इंदापूरात बोलत होते. ”सगळेच तथाकथित सेलिब्रिटी सरकारचं … Read more

… म्हणून ठाकरे सरकारला स्थगिती सरकार नाव पाडलं- नवनीत राणा

नवी दिल्ली । केंद्र सरकारची जी योजना आली, तिला आधी स्थगिती देण्याची परंपराच महाराष्ट्रातील विद्यमान सरकारने सुरु केली. त्यांना आम्ही स्थगिती सरकार असं नाव दिलं, असं खासदार नवनीत कौर राणा यांनी लोकसभेत म्हटलं. ठाकरे सरकारने मुंबई मेट्रो आरे कारशेड, बुलेट ट्रेन, ग्राम सडक योजना, मराठवाडा वॉटर ग्रील्ड, सीएम फेलोशिप, मुंबई पुणे हायपर लूप, नगरविकास आणि … Read more

‘आंदोलनजीवी’ शब्दाबद्दल मी पंतप्रधानांचा अतिशय आभारी! कारण.. खासदार अमोल कोल्हेंचा टोला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत तुफानी भाषण करत पंतप्रधानांच्या आंदोलनजीवी शब्दावर जोरदार निशाणा साधला आहे. आंदोलनजीवी शब्दाबद्दल कोल्हे यांनी मोदींचे आधार मानत जोरदार प्रहार केला. ”आज देशाला दोन नवे शब्द मिळाले आहेत. त्यातला … Read more

आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो; भुजबळांचा चिमटा

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. त्यावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यातही पंतप्रधान मोदींच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली आहे. प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर भाजप आजसुद्धा आंदोलन करत आहे त्यामुळे आंदोलनजीवी कोण हे ठरवायचं झालं तर काटा हा भाजपकडेच वळतो, असा टोला त्यांनी भाजपला … Read more

फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेची उलटी गिणती सुरू! प्रत्यक्ष चौकशीला सुरुवात

सोलापूर । राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारच्या काळात ‘जलयुक्त शिवार’ या योजनेचा मोठा गाजावाजा झाला. मात्र या योजनेत सोलापूरसह राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या योजनेवरील आक्षेपानंतर ठाकरे सरकारकडून चौकशीचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने राज्य सरकारने चौकशी समिती गठित केली आहे. या चौकशी … Read more

कपूर घराण्याला आणखी एक धक्का! ‘राम तेरी गंगा मैली’ फेम अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

मुंबई । बॉलीवूडमधील कपूर घराण्यावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील इंलॅक्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्याच वर्षी राजीव कपूर राजीव यांचे भाऊ ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. त्या दुःखातून सावरत असतानाच कपूर कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे. राजीव कपूर … Read more

माझ्या पराभवासाठी मोदी प्रचाराला आले तरी हरलो नाही, आता काँग्रेसला नंबर 1 करणार; पटोलेंची प्रतिज्ञा

नवी दिल्ली । महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर नाना पटोले यांनी आज दिल्लीत पहिल्यांदाच सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी नाना पटोले यांनी राहुल गांधींची  भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. महाराष्ट्रात काँग्रेसचं संघटन अधिक मजबूत कसं करता येईल, येणाऱ्या काळात कोणते धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील, यासंबंधीची चर्चा झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी … Read more

दिल्लीत उदयनराजे आणि नाना पटोले आले समोरासमोर आणि..

नवी दिल्ली । काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप खासदार उदयनराजे आज दिल्लीत अचानक समोरासमोर आले. 10 जनपथजवळ या दोघांची अचानक भेट झाली. यावेळी उदयनराजे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत दोघांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. भिन्न पक्षाचे असून सुद्धा महाराष्ट्रातील राजकीय संस्कृतीला साजेसा व्यवहार दोघांमध्ये यावेळी पाहायला मिळाला. दरम्यान, … Read more