सचिनला शेतीतलं काही कळत नाही म्हणणाऱ्या पवारांनी कधी बॅटिंग, बॉलिंग केली होती का? सदाभाऊ खोतांची टीका

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  शेतकरी आंदोलनाच्या संदर्भात केलेल्या ट्वीटवरून सचिन तेंडुलकरसह अन्य सेलिब्रिटींना सल्ला देणाऱ्या शरद पवारांवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. सचिनला शेतीमधलं काही कळत नाही ते ठीक आहे. पण कधी क्रिकेट खेळले होते? कधी बॅटिंग केली होती? कधी बॉलिंग केली होती? तरीही ते अध्यक्ष झाले ना,’ असा … Read more

मोदींच्या ‘आंदोलनजीवी जमात’ विधानाची राष्ट्रवादीने काढली हवा ; व्हिडिओतून उडवली टर

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना देशभरातील आंदोलनकर्त्यांना आंदोलनजीवी जमात म्हणून त्यांची खिल्ली उडवली. मोदींच्या या विधानावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादीनेही एक व्हिडीओ जारी करून मोदींच्या या विधानाची खिल्ली उडवली आहे. भाजपने आजवर केलेले आंदोलन आणि भाजप नेत्यांची आंदोलनावरील भूमिका याचा या व्हिडीओत समावेश आहे. या व्हिडिओतून भाजपचा चेहराच … Read more

जावयाचा एल्गार! पुढच्या निवडणुकीत दानवेंना घरी नाही बसवलं, तर माझ्या बापाची अवलाद नाही- हर्षवर्धन जाधव

पुणे । भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे विरुद्ध कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. “रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” अशी भीष्म प्रतिज्ञा करत हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे. रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाने आपल्यावर … Read more

सेलिब्रिटींना मेंदू आहे का? तुम्हाला कोण वापरून घेतंय हे लोकांना कळतंय पण तुम्हाला नाही; संजय राऊत भडकले

मुंबई । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७४ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हीने ट्विट केल्यानंतर देशभरातील अनेक कलाकार, खेळाडू अशा सेलिब्रिटिंनी सरकारच्या सुरत सूर मिसळत तिला प्रत्युत्तर दिले. भारतातील घडामोडींमध्ये नाक खुपसू नये, असा एका सुरात सर्वानी तिला सल्ला दिला. याच मुद्द्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत … Read more

सेलिब्रिटींच्या ‘त्या’ ट्वीटची आता चौकशी होणार; गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती

मुंबई । पॉपस्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं. ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी सरकारच्या पाठिंब्यात ट्वीट केले होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या दबावाखाली तर या सेलिब्रिटींनी ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली … Read more

India vs England, 1st Test: अश्विननं घडवला इतिहास; ११४ वर्षांत जे कुणाला जमले नाही ते करून दाखवलं

चेन्नई । चेन्नई टेस्टमधील इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिल्या डावात ३३७ धावा करता आल्या. त्यामुळे भारतावर पहिल्या डावात २४१ धावांची पिछाडी सहन करात फॉलोऑनची नामुष्की ओढवली. मात्र, टीम इंडियाला फॉलोऑन न देता इंग्लंडनं पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) दुसऱ्या डावाची पहिली ओव्हर रविचंद्रन अश्विनला … Read more

वॉशिंग्टनंची एकाकी झुंज; भारत पहिल्या डावात ३३७ वर गारद; फॉलोऑनबाबत इंग्लंडने घेतला ‘हा’ निर्णय

चेन्नई । भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावातील ५७८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला ३३७ धावा करता आल्या. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यानं दमदार खेळ करताना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर आव्हान उभं केलं होतं, परंतु आर अश्विन ( R Ashwin) वगळता तळाच्या अन्य फलंदाजांची त्यांना … Read more

‘आंदोलन पे चर्चा’; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदींचं भाषण LIVE

नवी दिल्ली । राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या शेतकरी आंदोलन आणि कृषी कायद्यांसंदर्भात राज्यसभेत बोलतील, अशी शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उत्तरानंतर केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांसंदर्भातील पुढील भूमिका स्पष्ट होईल. त्यामुळे, देशाचे लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागले आहे. #WATCH LIVE: PM Modi replies in Rajya Sabha … Read more

राणेंप्रमाणे आता फडणवीसांचीही 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्नं पाहण्यात जातील- नवाब मलिक

मुंबई । “राणेसाहेब 22 वर्ष फासे पलटवण्याचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मुख्यमंत्री बनण्याची स्वप्नं पडत आहेत. त्यांना फासे पलटवता आलेच नाहीत, तीच देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे. नारायण राणेंची 22 वर्ष मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पाहण्यात गेली, आता देवेंद्र यांचीही जातील” असा टोला नवाब मलिक यांनी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसांवर लगावला. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र … Read more