बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

बँक कर्मचाऱ्यांचा खासगीकरणाला विरोध, ५० कोटींचे बँक व्यवहार ठप्प

औरंगाबाद | बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून बँक अधिकारी, कर्मचारी दोन दिवसांपासून संपावर गेल्याने ५० कोटींचे बँक व्यवहार ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. शहर आणि ग्रामीण भागात संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, तब्बल तीन हजार बँक कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग घेतला. सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे. याविरोधात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनतर्फे … Read more

मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी; रोडरोमियोची भररस्त्यात दादागिरी

औरंगाबाद प्रतिनिधी | मुलीची छेड काढत तिच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शहारतील एमआयडीसी वाळूज परिसरात घडला. रोडरोमियोची भररस्त्यात सुरु असणारी दादागिरी पाहून नागरिकांनी मध्यस्ती करुन सदर वाद मिटवला. याप्रकरणी घटनेतील आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जेरबंद केले आहे. एमआयडीसी परिसरातील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास पायी जात असताना मुलीच्या … Read more

एकाच आरोपीकडून दिवसभरात सलग दोन चेन स्नॅचिंग; घटना CCTV कॅमऱ्यात कैद

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरात पुन्हा एकदा चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. या चोरट्यांना थांबवण्यासाठी औरंगाबाद मध्ये कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस प्रशासनाने दावा केला होता की यामुळे गुन्हेगारी कमी होईल. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काही वेगळीच आहे. आज शहरात 2 ठिकाणी राजाबाजार आणि सिडको परिसरामध्ये पुन्हा एकदा चैन स्नॅचिंग आणि गळ्यातील गंठण चोरीचा … Read more

चिंताजनक! औरंगाबाद जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ; जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या वाढली असून ही संख्या 4929 वर पोहोचली आहे. मात्र जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी कुपोषित बालकांची संख्या तीन हजाराच्या आसपास होती. मात्र यावर्षी या कुपोषित बालकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. ही संख्या का वाढत आहे? याला कारण … Read more