CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील … Read more

शेतकऱ्याने दिड लाख रुपये खर्चून बांधले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चाहते देशभरात आहेत. तमिळनाडूमध्ये एक शेतकरी मोदींचा जबरी चाहता आहे. तो मोदींच्या कामावर इतका प्रभावित झाला की त्याने शेतात मोदींचे मंदिरच बांधले आहे.

आरएसएसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत मातेशी खोटे बोलत आहेत – राहुल गांधी

कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशात ‘डिटेन्शन सेंटर’ नसल्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आणि ‘आरएसएसचे पंतप्रधान’ भारत मातेशी खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

गुजरात दंगली प्रकरणात नरेंद्र मोदी निर्दोष; नानावटी-मेहता आयोगाने दिली क्लीन चिट

गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर राज्यभर उसळलेल्या दगंली प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना क्लीन चीट देण्यात आली आहे. गुजरात दंगल प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या नानावटी-मेहता आयोगाचा अहवाल गुजरात विधानसभेत सादर करण्यात आहे. या अहवालात तत्कालीन नरेंद्र मोदीं प्रणित सरकारला या प्रकरणात दोषी म्हणून आढळलं नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. गोध्रा रेल्वे जळीतकांडानंतर झालेली दंगल पूर्वनियोजित नव्हती असं आयोगाने आपल्या अहवालात सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवासाचे भाडे सरकारने थकवले !

देश विदेशामध्ये प्रवास करण्यासाठी नेत्यांना ‘एअर इंडिया’ तर्फे सेवा पुरवली जाते. मात्र कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. मात्र आता सरकारने अती महत्वाच्या व्यक्ती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, परदेशी पाहुणे, पंतप्रधान यांच्या प्रवासाचा खर्च एअर इंडियाला दिलेला नसल्याची धक्कदायक माहिती समोर आलेली आहे.

साताऱ्याला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांनी आता माघार घेतली आहे – नरेंद्र मोदी

‘साताऱ्याला आपला अभेद्य किल्ला मानणाऱ्यांना आज इथून माघार घ्यावी लागली आहे,’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. साताऱ्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये भेद असल्याचे सांगत हे विकास काय करणार? अशा शब्दांत त्यांनी टीका केली. साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि विधानसभेचे महायुतीचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी प्रचार सभा घेतली यावेळी ते बोलत होते. साताऱ्यात प्राचारासाठी येणारे मोदी हे पाचवे पंतप्रधान आहेत.

परळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.

‘मोदी तर पेढेवालेसुद्धा’ असं म्हणणार्‍या उदयनराजेंच्या प्रचाराला पंतप्रधान ‘या’ दिवशी सातार्‍यात

सातारा प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंन्द्र मोदी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ राज्यात एकुण नऊ सभा घेणार आहेत. त्यातील पहिली सभा सातार्‍यात होणार असल्याचे समजत आहे. पंतप्रधान मोदी १७ सप्टेंबर रोजी सातार्‍यात येणार असून उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशानंतर सातारा लोकसभा जिंकणे भाजप साठी प्रतिष्ठेचे बनले आहे. सातारा येथील … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक मध्ये

नाशिक प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. … Read more

नवसाला पावलेल्या मारुतीला मोदींच्या चाहत्यांनी अर्पण केला सव्वा किलो सोन्याचा टोप

वाराणसी | नरेंद्र मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेत यावे असा नवस अरविंद सिंग संकटमोचक मारुतीला केला होता. मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा भाजपाचे सरकार निवडून आले. अरविंद सिंग यांचा नवस पूर्ण झाला. म्हणून आज, मोदी यांच्या वाढदिवशी अरविंद यांनी मारुतीला सव्वा किलो सोन्याचा मुकुट अर्पण करून नवस फेडला. सूरत येथेही आगळ्या रीतीने मोदी यांचा वाढदिवस साजरा … Read more