काँग्रेसच्या विजयासाठी निर्धाराने कामाला लागा : विशाल पाटील

सांगली प्रतिनिधी। निवडणुकीत दादा घराण्यातील उमेदवाराने उभे रहावेत, असे आदेश दादाप्रेमी कार्यकर्त्यांनी दिले पाहिजेत, लोकसभेच्या निवडणुकीत हीच अडचण झाली होती. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीत होणार नाही. कार्यकर्त्यांनी आता नकारात्मक विचार बंद करून सकारात्मक विचार करावा आणि कॉंग्रेसच्या प्रचारासाठी कामाला लागावे, असे वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष वसंतदादा पाटील यांनी केले. विष्णू अण्णा भवनवर दादा व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी … Read more

‘ईडी झालीय येडी!’ – सत्यजीत तांबे

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिखर बँक घोटाळाप्रकरणी कारवाई केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ईडी झालीय येडी!’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. सत्यजीत … Read more

सांगलीत तब्बल दीडशे कोटींची कामे आचारसंहितेच्या कात्रीत

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महापालिका क्षेत्रातील सुमारे १५० कोटी रुपयांची कामे आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहेत. तर सांगलीतील आयर्विन पुलाला पर्यायी पूल, हरिपूर-कोथळी पूल या कामाला आता दीड महिन्यांची वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, पदाधिकाऱ्यांची वाहने मनपा प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालर्यातील फलक व नेत्यांची छायाचित्रे देखील काढली आहेत. विधानसभा … Read more

सांगलीत एसटीवरील सरकारच्या जाहिरातीही उतरवल्या, आचारसहिंतेमुळे केली कारवाई

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. आचारसंहिता भंग करणारे सांगली शहरातील अनेक राजकीय फलक पथकाने उतरवत एसटीवरील सरकारच्या जाहिरातीही उतरवल्या. यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचाराचे शासकीय बोर्ड ही पथकाने ताब्यात घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच महापालिका नितीन कापडणीस यांच्या आदेशाने महापालिकेच्या अतिक्रमण … Read more

निवडणुका जाहीर होताच सांगलीत राजकीय हालचाली झाल्या गतिमान

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी चार जागा भाजपकडे, दोन राष्ट्रवादीकडे तर कॉंग्रेस व शिवसेनेकडे प्रत्येकी एक जागा आहे. जिल्हा कॉंग्रेसमुक्त करण्याचा विडा भाजपने उचलला आहे. तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीपुढे जागा वाढविण्याचे आव्हान असणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी भाजपचे मंत्री ना.सुरेश खाडे, … Read more

ईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम

नाशिक प्रतिनिधी| ‘देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्यात. यात देशातील निवडणूक आयोगही सहभागी असून सुप्रीम कोर्टान दिलेला निर्णय ही पाळत नाही. तेव्हा देशात हुकुमत कुणाची हे लक्षात आल पाहिजे. म्हणूनच ईव्हीएम बंद झाल्याशिवाय देशात परिवर्तन … Read more

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष वंचित सोबत जाणार?

कोल्हापूर प्रतिनिधी। काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन नव्या राजकीय घरोब्याची तयारी सुरू केली आहे. उभय नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास बंद खोलीत खलबते झाली. मात्र, चर्चेविषयी माहिती देण्यात आली नाही. इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले या तीन मतदारसंघात आवाडे गटाची लक्षणीय ताकद आहे. त्या … Read more

प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार

कोल्हापूर प्रतिनिधी। राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

एमआयएमची दुसरी यादी जाहीर, सोलापूरमधून तीन उमेदवारांची नावे

सोलापूर प्रतिनिधी। वंचित बहुजन आघाडी कडून एमआयएम पक्षाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही तसेच विधानसभेसाठी आठच जागांची ऑफर दिल्याचे सांगत एमआयएम चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी युती तुटल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर तातडीने त्याने ११ सप्टेंबर ला उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर मधील काळात पुन्हा युती होणार की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली … Read more

कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग … Read more