‘आरपीआय’चे अध्यक्ष रामदास आठवले यांनाही कोरोनाची लागण

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि  रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या आठवले यांची प्रकृती उत्तम आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून ४ दिवस मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. … Read more

अभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा झेंडा घेतला हाती

Payal Ghosh Join RPI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh)हिने आता राजकारणात उडी मारली आहे. पायलने नुकतंच रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. रामदास आठवलेंनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत पायलचा पक्ष प्रवेश पार पडला आहे. पायल घोषसह … Read more

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही तर या राज्य सरकारचा सातबारा कोरा केला जाईल ; आठवलेंचा टोला

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी आली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज असून यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्यात कलगीतुरा रंगला आहे. त्यावरुन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री होण्याआगोदर उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं सांगत होते. तुम्ही आता मुख्यमंत्री झाला आहात तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा … Read more

खडसेंना राष्ट्रवादीकडून मंत्रीपद मिळेल पण त्यांच्यासोबत आमदार जाणार नाहीत ; आठवलेंचा दावा

Athawale and Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश आता निश्चित झालाय. उद्याच खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत. मी एकटाच नसून माझ्या संपर्कात भाजपचे 15-16 आमदार असल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला. परंतु रिपाईचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खडसेंचा हा दावा फेटाळून लावला आहे. खडसे एकटेच … Read more

मित्र चालले सोडून, NDA ची अवस्था बिकट; ,फक्त आठवलेच राहिले सोबतीला

Modi Shah Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने भाजपलाही फटका बसला आहे. आधी जुने सहकारी राजकिय मतभेदामुळे दूर झाल्याने आणि त्यातच रामविलास पासवान यांच्या निधनामुळे केंद्रातील 51 मंत्र्यामध्ये फक्त रामदास आठवले हेच एकमेव बिगर भाजप मंत्री असून बाकी सर्व मंत्री हे भाजपचेच आहेत. देशात १९७७ साली पहिले आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून अशी … Read more

रामदास आठवले यांची संसदेत नवीन कायदा करण्याची मागणी; गुंडागर्दी करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्वच रद्द करावे

नवी दिल्ली, प्रतिनिधी । संसदेत गुंडागर्दी करणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा नवीन कायदा संसदेत करावा अशी माझी मागणी आहे. संसदेत सदस्यांना आपला विरोध आणि मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे.संयमाने मत प्रदर्शन करावे. मात्र माईक तोडणे ; बिल फाडणे; धक्काबुक्की करणे अशी गुंडागर्दी करणे चूक आहे. रामदास आठवले यांनी ह्या सदस्यांना पुढील अधिवेशनापर्यंत निलंबित करावे अशी … Read more

मुख्यमंत्र्यांकडे फक्त स्टेअरिंगच आहे; रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई । राज्य सरकारच्या गाडीचे फक्त स्टेरिंगच मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, मर्जी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची चालते असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री ठरले असून स्वतःच्या मना प्रमाणे तीन चाकी सरकारची गाडी ते चालवू शकत नाहीत.त्यांनी स्वतःच्या मनाने स्टीयरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना तसे करू देणार नाही असेही … Read more

महाविकास आघाडीच्या सत्तेत दलितांवरील अत्याचारात वाढ- रामदास आठवले

मुंबई । केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ झाल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला. याविरोधात रिपब्लिकन पक्षातर्फे ११ जुलै रोजी देशभरात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही आठवले यांनी केली. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी म्हटले … Read more

कोरोनामुळं मृत्यू झालेल्या कोविड योध्यांना शहिदांचा दर्जा द्या- रामदास आठवले

मुंबई । कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीच्या संकटकाळात समाजाच्या रक्षणासाठी कोरोना विरुद्ध लढणारे आणि अहोरात्र काम करणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई, कर्मचारी, रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्ड बॉय तसेच महापालिकेचे कर्मचारी हे सर्व कोरोनायोद्धे आहेत. त्यामुळं कोरोना विरुद्ध लढताना या योद्ध्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना शहिदांचा दर्जा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास … Read more

शरद पवार हे आदरणीय असून त्यांच्याबद्दलचं वक्तव्य पडळकरांनी मागे घ्यावं- रामदास आठवले

मुंबई । शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, असं आक्षेपार्ह्य विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. गोपीचंद पडळकर यांच्या पडळकरांच्या या विधानवरून राष्ट्रवादीने आंदोलन केलं, तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली. भाजपनेही पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, पडळकर यांच्या या विधानावर आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही … Read more