सरकारच्या दमनशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे – शरद पवार

मुंबई । जेएनयूमध्ये जे घडले ते योग्य नव्हते, म्हणून त्याचा सर्वत्र विरोध होत आहे. लोक सरकारवर संतप्त आहेत म्हणून देशात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. सरकारी दडपशाहीला गांधीजींच्या अहिंसेने उत्तर द्यायला हवे आहे. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. मुंबई येथे आज शरद पवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आदी … Read more

भाजपच्या आंदोलनात अभिनेत्री जुही चावला सहभागी; म्हणाली, कलाकार प्रतिक्रिया देण्याची घाई करतात

मुंबई | फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मुंबईतील सावरकर स्मारकात भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनात अभिनेत्री जुही चावला सहभागी झाली. कलाकार विषय समजून न घेता कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची घाई करतात, असं जुही माध्यमांशी बोलताना म्हणाली. मुंबई येथे जेएनयू येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात फ्री काश्मीर असे पोस्टर वापरले होते. त्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन आयोजित … Read more

CAA विरोधातील आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आसाम दौरा रद्द

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला ईशान्य भारतात होणारा तीव्र विरोध आजही कायम आहे. या विरोधाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुवाहाटी येथे खेलो इंडिया युथ गेम्सचे उदघाटन करण्यास जाणार होते मात्र मोदींचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. सध्याचे वातावरण पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी योग्य नाही, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. आसामधील … Read more

३०० फुटांचा भव्य झेंडा घेऊन परतवाड्यामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅली

जिल्ह्यातील परतवाडा येथे आज नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये परतवाड्यात नागरिकांनी ३०० फुटांचा झेंडा घेऊन परतवाड्यातून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यामध्ये नरेंद्र मोदी जिंदाबाद! अमित शहा जिंदाबाद! भारत माता की जय! अशा घोषणा देण्यात आल्या.

काँग्रेस पाकिस्तानच्या नव्हे तर शरणार्थी लोकांच्या विरोधात – नरेंद्र मोदी

नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करण्याच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा काँग्रेस आणि विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेस पाकिस्तानच्याविरोधात नव्हे तर तिथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटकातील तुमकूर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आवाज उठवा; पंतप्रधान मोदींचे आंदोलन कर्त्यांना आवाहन

तुमकुरू: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. तुमकुरु येथे श्री शिवकुमार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी भाषण केले. ते म्हणाले की, जे लोक आज भारतीय संसदेविरोधात आंदोलन करीत आहेत त्यांना मला सांगायचे आहे की, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची ही कारवाई उघडकीस आणण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंदोलन करायचे असेल तर … Read more

एनआरसी,सीएए कायद्याला विरोध करणारे देशद्रोही – संभाजी भिडे

नागरी सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागरी सुधारणा कायद्याला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत अशी टीका संभाजी भिडे यांनी यावेळी बोलताना केली.

राहुल गांधी हे फक्त मूर्खच नाहीत तर महामूर्ख आहेत; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

  चंदिगढ । भाजपचे वाचाळवीर नेते वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. या वाचाळवीर नेत्यांमध्ये आणखी एका भाजप नेत्याची भर पडली आहे. हरियाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजप खासदार नायब सिंह सैनी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी याच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख महामूर्ख असा केला आहे. जर कोणी महामूर्ख असेल तर ते राहुल … Read more

#CAA_PROTEST, हिंसक आंदोलनामुळे रेल्वेचे 80 कोटींचे नुकसान

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभर आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने जाळपोळीसारख्या घटना घडल्या आहेत. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्वात मोठा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम बंगाल, ईशान्यकडील काही राज्यात रेल्वेच्या जाळपोळीच्या घटना घडल्या. यांमुळे रेल्वेला जवळपास ८० कोटींचे नुकसान झाल्याची माहिती … Read more