कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मुस्लिमांचे मृतदेह श्रीलंकेत जाळले जातायत, मुस्लिम धार्मिक नेते म्हणाले हे तर इस्लामविरूद्ध..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । श्रीलंकेतील मुस्लिम धार्मिक नेत्यांनी कोरोना व्हायरसमुळे प्राण गमावलेल्या मुस्लिमांच्या अंत्यसंस्काराबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.या मुस्लिम धर्मगुरूंचे असे म्हणणे आहे की सुधारित नियम हा इस्लामिक परंपरेच्या विरोधात असून आम्ही सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही आहोत. विशेष म्हणजे, श्रीलंकेने देशातील मुस्लिमांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून अंत्यसंस्कारावेळी कोरोनामुळे मृत पावलेल्यांना जाळणे हे सक्तीचे … Read more

कोरोनावर लस निघणे अजून दोन वर्षे तरी शक्य नाही – WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला झाला आहे. त्यामुळे भारतात काही ठिकाणी अगदी काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देश कोरोनावर लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनावर अजून 2 वर्ष तरी लस शोधणे कठीण आहे. त्यामुळे सध्या लोकांनी परिस्थितीशी जुळवून घ्यावं … Read more

राज्यात कोरोनाचा खाकीवर हल्ला आणखी तीव्र; कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1000 पेक्षा जास्त

मुंबई । कोरोनाविरुद्ध लढाईत आघाडीवर लढणाऱ्या पोलीस योद्ध्यांवर कोरोनाने आपला हल्ला अधिक प्रखर केला आहे. मागील काही दिवसांत पोलिसांमध्ये कोरोनाच्या संसर्ग वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 1000 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 113 जण कोरोनातून बरे झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील … Read more

मुंबईत टी- सीरिज म्युझिक कंपनीची इमारत तातडीने सील; ‘हे’ आहे कारण

मुंबई । मुंबईतील टी- सीरिज कंपनीच्या इमारतीला तातडीने सील करण्यात आलं आहे. इमारतीचा केअर टेकर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. यानंतर पूर्ण परिसरच सील करण्यात आला. मुबईतील अंधेरी पश्चिममधील लिंक रोड येथे सिनेसृष्टीतील आघाडीची म्युझिक आणि सिनेप्रोडक्शन कंपनी असलेल्या टी-सीरिज कंपनीचे ऑफिस आहे. इमारत सील करण्यात आली आहे. या इमारतीत काम करणाऱ्या एका केअर … Read more

मागील २४ तासात देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ; संख्या झाली इतकी

नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. रुग्ण बरे होत असले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या २४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली … Read more

कोरोना इम्पॅक्ट | स्थानिक स्वराज्य संस्था बळकट झाल्या तरच, केंद्र आणि राज्यातील सत्ता चांगल्या चालतील – मणी शंकर अय्यर

राज्यांनी केंद्र सरकारच्या अंमलबजावणीच्या शस्त्राप्रमाणे नाही पण संघराज्यातील स्वायत्त घटक म्हणून काम केले पाहिजे. तर पंचायतींनीही स्वतःला राज्य सरकारचा विस्तार न समजता “स्वराज्य संस्थेतील” घटक समजले पाहिजे. पंचायतीला संविधानाच्या तीन स्तरीय हस्तांतरणीय  पद्धतीत आणण्याचा विचार केला पाहिजे. केंद्र-राज्य-पंचायत (आणि नगरपालिका).

टेस्ट क्रिकेटचे उदाहरण देऊन अनिल कुंबळेने कोरोना विषाणूचा पराभव करण्याचे केले आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने शनिवारी सांगितले की, आम्हाला कोरोनाव्हायरस या साथीला एखाद्या कसोटी सामन्याप्रमाणे घ्यावे लागेल आणि संपूर्ण देशाला त्याविरुद्ध एकत्रितपणे लढावे लागेल आणि जिंकूनही द्यावे लागेल. माजी लेगस्पिनर कुंबळेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. कुंबळेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “जर आपल्याला या कोरोनोव्हायरस साथीविरोधात लढायचे … Read more

मंदिरात पूजा करणार्‍या भाजप नेत्याला केरळ मध्ये अटक; लाॅकडाऊनच्या उल्लंघनाचा ठपका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे देशभरात लॉकडाउन लागू केलेला आहे तसेच सरकारने सर्व प्रकारच्या सभांनादेखील बंदी घातलेली आहे. दरम्यान, केरळमधील सार्वजनिक ठिकाणी गर्दी रोखण्यासाठी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप नेते आणि मंदिरप्रमुखांसह पाच जणांना नुकतेच अटक करण्यात आली आहे. मंदिरातील धार्मिक विधीवेळी मंदिर प्रमुखांनी जमाव गोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एरुमापट्टी पोलिसांनी … Read more

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९,०६३ वर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. त्यामुळे दरोरोज मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे आणखी १०८९ रुग्ण वाढले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९,०६३ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनाचे १६९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज वेगवेगळ्या भागात कोरोनाचे … Read more

कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाावामुळे जगातील विकसित देशांमध्ये अत्यंत वाईट परिस्थिती पाहायला मिळत आहे. भारतात तशी वेळ येणार नाही, असे तुर्तास वाटते. तरीही आपण संपूर्ण देशात कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. शनिवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, हर्षवर्धन यांनी … Read more