अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचा दावा “कोविड -१९ च्या सर्वाधिक चाचण्या घेणारा अमेरिका एकमेव देश”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की,भारतासह इतर दहा देशांच्या तुलनेत त्यांच्या देशाने कोविड -१९च्या सर्वांत जास्त चाचण्या घेतल्या आहेत. ट्रम्प यांनी रविवारी म्हटले की अमेरिका कोरोना व्हायरस रोगाविरूद्धच्या युद्धात प्रगती करीत आहे आणि देशाने आतापर्यंत ४१.८ लाख लोकांची चाचणी केली आहे. ट्रम्प म्हणाले की जगातील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत … Read more

..तर ‘त्या’ कंपन्या चीनसोडून भारतात येतील!

वृत्तसंस्था । जगावरील कोरोनाचं संकट गेल्यानंतर अनेक कंपन्या विशेषत: मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या चिनमधून आपला गाशा गुंडाळतील अशी शक्यता आता जगभर बोलून दाखवली जाते आहे. जपान सरकारने तर अलिकडेच घसघशीत रकमेची तरतूद करत आपल्या कंपन्यांना आर्थिक हात देत चिनमधून बाहेर पडा, अन्यथा जपानमध्ये परत या, नाही तर अन्य आशिया-पॅसिफिक देशांत गुंतवणूक करता येतेय का पहा. असं सांगितलं … Read more

टेन्शनमध्ये वाढ! गेल्या 24 तासांत 1 हजार 553 कोरोनाचे नवे रुग्ण, 36 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । भारतात कोरोना वेगाने पसरत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान, आज पुन्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनासंबंधी आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत1 हजार 553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 हजार 265 वर पोहोचहली … Read more

अमेरिकेत अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हिंदू संघटनांनी सुरु केला हेल्पलाईन क्रमांक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील हिंदू संघटनांच्या गटाने कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. यातील बरच असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे राहण्याची सोयदेखील नाही आहे. हिंदु युवा, भारतीय, विवेकानंद हाऊस आणि सेवा इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे ‘कोविड -१९ स्टुडंट सपोर्ट नेटवर्क’ हेल्पलाईन 802-750-YUVA (9882) सुरू केली आहे. वॉशिंग्टन … Read more

धक्कादायक! मुंबईत ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । मुंबईत कोरोनाच्या संसर्गाच्या विळख्यात आता पत्रकार सुद्धा सापडले आहेत. मुंबईमध्ये ५३ पत्रकारांना कोरोनाची लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीएमसीमधील आरोग्य विभागाचे आधिकारी अमेय घोले यांनी दिलेल्या माहितीनुसार १६७ पत्रकांराच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५३ जणांनाकरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले … Read more

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ हजार ४८३ वर

मुंबई। राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. ताज्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजार ४८३ वर जाऊन पोहोचली आहे. ही सकाळी ११ वाजेपर्यंतची आकडेवारी असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या आकडेवारीनुसार भिवंडी १,कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, … Read more

Breaking | कराडमध्ये 2 कोरोना अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

कराडमध्ये 2 नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे.

संजय दत्तने लॉकडाउनची तुलना केली तुरूंगातल्या आयुष्याशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे, आजकाल देशभरात लॉकडाउन सुरू आहे. अशा परिस्थितीत जो जिथे आहेत ते तिथेच अडकले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीसुद्धा कोरोनामुळे परदेशात अडकल्या आहेत. ज्यात बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या कुटूंबाचाही समावेश आहे. लॉकडाऊनमुळे संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त आणि त्यांची दोन मुले सध्या दुबईत अडकले आहेत. ज्यामुळे संजय दत्त खूप नाराज झाला आहे. … Read more

अजित पवार ऍक्शनमध्ये! पुणे, पिंपरी-चिंचवड ८ दिवस पूर्ण बंदचे दिले आदेश

पुणे । पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, तसेच कुठल्याही परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढता कामा नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे येथे दिले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ … Read more

चिंताजनक! देशात ‘या’ वयोगटातील कोरोनाचे सर्वाधिक बळी

नवी दिल्ली । कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वयोगटाबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने धक्कादायक माहिती आज जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण आणि त्यांचा वयोगट पाहिल्यास देशात ६० वर्षांवरील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 430 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वयोगटाचा विचार … Read more