Delhi Opinion Poll: दिल्लीवर पुन्हा ‘आप’ची सत्ता तर भाजपासाठी अजूनही दिल्ली दूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा पुढच्या ३ दिवसात थंड होणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारात जोर लावला आहे. येत्या ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत होतांना दिसत आहे. दरम्यान, टाइम्स नाऊ आणि इप्सोसने (आयपीएसओएस) संयुक्तरित्या केलेल्या मतदानपूर्व चाचणीमध्ये दिल्लीकरांनी … Read more

जामिया विद्यापीठाजवळ अज्ञात माथेफिरू युवकाकडून मोर्चेकऱ्यांवर गोळीबार; विद्यार्थी जखमी

दिल्लीत जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ अज्ञाताकडून गोळीबार करण्यात आला असून, या गोळीबारात विद्यार्थी एक जखमी झाला आहे. नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राजघाटकडे मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान एका माथेफिरू युवकाने गोळीबार केला, अशी माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असून गोळीबार करणाऱ्या संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.  

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात पोहोचले नाहीत? येथे करा तक्रार

नवी दिल्ली  | नवीन वर्षाच्या सुरूवातीला भारत सरकारने शेतकर्‍यांना एक मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा दुसरा टप्पा सरकारने सुरू केला आहे. या योजनेत सरकारने देशातील 6 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यावर 2000 रुपये पाठविले आहेत. तथापि, जर या योजनेअंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तर काळजी करण्याचे कारण नाही, कारण आपण आता केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे तक्रार करू … Read more

नागरिकत्व विधेयका विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; जामिया मिलिया विद्यापीठात पोलिसांचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

नागरिकत्व कायदा दुरूस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर लागू केल्यानंतर आसाम, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीमसह सात राज्यात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

‘त्या’ ध्येयवेड्या युवकाची दिल्ली ते कारगील तिरंगा दौड

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील कांडली येथील एका २२ वर्षीय तरुणाने भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी खांद्यावर तिरंगा घेऊन दिल्ली ते कारगील, अशी दौड लावली आहे. सुमित गौर असं या युवकाचं नाव आहे. ५ डिसेंबरला दिल्लीच्या इंडिया गेटवरून तो कारगीलच्या दिशेने निघाला. १०६८ किलोमीटरचे हे अंतर पूर्ण करून भारतीय सैन्यदलाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तो भेटणार आहे.

उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू, दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उन्नाव सामूहिक बलात्कारपीडितेचा रात्री उशिरा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. पाच जणांनी पीडितेला जिवंत पेटवून दिलं होतं. यात ती ९० टक्के भाजली होती. सफदरजंग रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी पीडितेचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांची भरती होणार

Para military force

पोटापाण्याची गोष्ट | SSC GD तसेच निमलष्करी दलांमध्ये ७६ हजार जागांपेक्षा जास्त पदावर भरती होणार असून ती प्रक्रिया चालू झाली आहे. SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा ११ फेब्रुवारी पासून ११ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) ७६,५७८ जागा भरण्यासाठी मोठे भरती अभियान चालू केले आहे. ज्यामध्ये ७,६४६ पदे महिलांसाठी राखीव आहेत. … Read more

अरविंद केजरीवाल यांनी घेतला मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू

Arvind Kejariwal

नवी दल्ली | नुकतेच महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा या व इतर मागण्यासाठी उपोषण केले. त्यातच अण्णा हजारे यांचे शिष्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकऱ्यांसाठी आज मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी ‘आम आद्मी पार्टी’ लागू करत असल्याचे केजरीवाल यांनी घोषणा केली. आजच्या काळात खूप चर्चेचा असलेला विषय … Read more

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more

जैवइंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाची चाचणी यशस्वी

biofuel

दिल्ली | भारतातील जैव इंधनावर चालणाऱ्या पहिल्या विमानाचे यशस्वी लँडिंग आज पार पडले. देहरादून ते दिल्ली असा या चाचणीचा प्रवास राहिला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम या संस्थेने यासाठी इंधन निर्मिती केली आहे. नरेंद्र मोदी यांनी अशा नविकरणक्षम इंधन निर्मितीची देशाला गरज आहे, अशी भावना मागील एका कार्यक्रमात व्यक्त केली होती. त्या धर्तीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ … Read more