लाली अन पावडर लावून बसलेल्यांनी खिडकी बंद करावी; सामनातून भाजपवर बोचरी टीका

शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिल्याची घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यामुळे ओठास लाली व तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी. तसेच शिवसेनेने भाजपचं स्वतःच्या खांद्यावरीलच नव्हे तर राज्यावर असलेलं ओझं उतरवलं, अशी बोचरी टीका ‘सामना’ने केली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात ६५ हजार कोटींचा घोळ; ‘कॅग’च्या अहवालातील माहिती

आमचं सरकार हे काही चौकशी  सरकार नाहीं. परंतु जे कॅग ने म्हटले आहे त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. कारण जे रेकॉर्डवर दिसत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

एल्गार परिषदे प्रकरणी पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य; पवारांचे सरकारसह पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

या घटनेत अनेक साहित्यिकांना विनाकारण तुरुंगात डांबण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका आक्षेपाहार्य असून, तत्कालीन पोलीस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पदाचा पूर्णपणे गैरवापर केला

आमचं स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार आहे;मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर पलटवार

उद्धव ठाकरेंनी राज्यपालांनी मराठीत केलेल्या भाषणाचा दाखल देत, राज्यपालांनाही सत्ताबदलाचे वारे समजू लागले असल्याचा चिमटा काढला आहे.

सत्ताधारी विरोधकांचा कलगीतुरा; मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांचा खरपूस समाचार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल सामनाच दाखल देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्याचा आता ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’,फडणवीसांच्या या प्रश्नाला उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

बाळासाहेबांना शब्द दिलाय, भाजपची पालखी कायम वाहणार नाही – मुख्यमंत्री ठाकरे

नागपूर प्रतिनिधी | सध्या नागपूर येथे विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. गेले तीन दिवस हे अधिवेशन शेतकरी कर्जमाफी, सावरकर आदी विषयांनी प्रचंड गाजले. आजही सभागृहात तेच चित्र पाहायला मिळाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला केला. मी काही भाजपची कायम पालखी वाहणार नाही, हा शब्द मी बाळासाहेबांना … Read more

‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; अधिवेशनात विरोधकांची घोषणाबाजी

यावेळी ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. 

पुन्हा एकदा खडसे पवारांच्या भेटीला; राष्ट्रवादी प्रवेशावर नवाब मलिक म्हणाले…

भाजपला महाराष्ट्रात उभे करण्यात खडसेंचाही वाटा आहे. मागील ४५ वर्षाहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या ५ वर्षात खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.

‘स्वतःचा गोंधळ समोर येऊ नये म्हणून विरोधकांचा गोंधळ’; खासदार सुप्रिया यांचा आरोप

दोन दिवसापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. या अधिवेशनात विधीमंडळात पहिल्याच दिवशी विरोधकांनी  सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून गोंधळ घातला होता. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीचे विधिमंडळाच्या कामकाजास मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.

सुजितसिंह ठाकूर यांना गोपीनाथ गडावरील मेळावा भोवला?

मराठवाड्यातील नेते सुजितसिंह ठाकूर यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत होते. परंतु एका रात्रीत ठाकूर यांच्या ऐवजी दरेकर यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.