हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेशाचा सावध पवित्रा ; राष्ट्रवादीवर घेतले चांगलेच तोंडसुख

इंदापूर प्रतिनिधी | भाजपच्या वाटेवर असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. त्याआधी त्यांनी अकलूज येथे जाऊन विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी इंदापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केले. जुन्नरची जागा आघाडीत काँग्रेसला सोडली. मात्र इंदापूरची जागा सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शब्द देऊन देखील त्यांनी तो शब्द पाळला नाही. … Read more

युती बाबत फडणवीसांना मोदींनी दिल्या या सूचना

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना भाजप युती होणार की नाही या बाबत उलट सुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना ज्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेचे ताणलेले संबंध चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती करा तडजोड नाही अशा शब्दात सुनावले आहे. त्यामुळे येत्या काळात युतीचे काय … Read more

सेनेशी युती करा ; तडजोड नाही – ‘मोदी’ आदेश

टीम, HELLO महाराष्ट्र | ‘महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायची आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार भाजपने तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला तर युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यताही … Read more

शरद पवारांच्या चिडण्यावर मुख्यमंत्री म्हणाले तरी काय ?

लातूर प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राष्ट्रवादी पक्षाचे दिग्गज नेते आपल्या वारसांसह भाजपा आणि शिवसेनेत सामील होत आहेत. याच संदर्भात काही दिवसा आधी अहमदनगर येथील श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार याना पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने शरद पवारांना प्रश्न … Read more

बिघाड इव्हिएम मध्ये नाही तर विरोधकांच्या खोपडीत आहे

लातूर प्रतिनिधी | मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा लातूर मध्ये पोहचली आहे. यावेळी जनतेशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, ” गेल्या पंधरा वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याना सत्तेची मुजोरी व माजोरी होती सामान्य माणसाच्या विकासाकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता हे विरोधक आपल्या अपयशाचे खापर ईव्हीएमला देत आहेत. सुप्रिया सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगले अन इकडे सुधाकर … Read more

रोहित पवारांचा पराभव घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांची नवीन रणनीती

कर्जत प्रतिनिधी | शरद पवारांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणुकीला कर्जत जामखेड मतदारसंघातून सामोरे जाणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे. या मतदारसंघात त्यांचा विजय सोपा नसणार आहे. कारण या मतदारसंघात त्यांना राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्ये कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळे ते नेमके कोणत्या शक्यतेवर विजयी होणार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना सांगणे सध्या कठीण … Read more

विरोधकांच्या सभेतील गर्दीने मंगल कार्यालय देखील भरत नाहीत – मुख्यमंत्री

जालना प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणूका जवळ आलेल्या असताना राज्यभर राजकीय पक्षांच्या यात्रांमध्ये राजकीय नेते आरोप प्रत्यारोपांच्या एकमेकांवर फैरी झाडात आहेत. दरम्यान भाजपने काढलेल्या महाजनादेश यात्रेतील आपल्या जालना जिल्ह्यातील भेटीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. ‘सध्या राज्यात निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या यात्रा काढल्या आहेत. पण या यात्रांना जनतेकडून प्रतिसाद मिळत नसून … Read more

मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत वीज चोरी – नवाब मलिक

टीम, HELLO महाराष्ट्र | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी ‘महाजनादेश’ यात्रेच्या निम्मिताने महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. सध्या त्यांचा ताफा बीड जिल्ह्यामध्ये आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या महाजनादेश यात्रेच्या सभेसाठी चोरीची वीज वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला असल्याची माहिती आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी सडकून टीका केली आहे. … Read more

ईव्हीएम नाही तर जनता विरोधकांना हरवते – फडणवीस

अहमदनगर प्रतिनिधी | आमची यात्रा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही यात्रा सुरू केल्या आहेत. परंतु त्याचा काही एक उपयोग होणार नाही. कारण १५ वर्षे सत्तेत असताना जनतेने त्यांची माजोरी अन मुजोरी पाहिली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या जवळ जात नाही. हरले तर ईव्हीएममुळे असा आरोप ते करतात. परंतु ईव्हीएम त्यांना हरवत नसून जनता त्यांना हरवत असते, असा … Read more

उद्धव ठाकरेंनी केले युतीबाबत मोठे विधान

मुंबई प्रतिनिधी | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युतीतील जागावाटपाचा जुना फॉम्युला बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्याविषयी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. ‘जागावाटपाचा फॉम्युला मी, मुख्यमंत्री आणि अमित शहा असे तिघेजण मिळवून ठरवू’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. राष्ट्रवादी सोडताना दिलीप सोपल यांनी शरद पवारांबद्दल केले हे विधान बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार विलास तरे … Read more