धनगर आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील नाही

मुंबई प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या परीक्षेत सरकार पास झाल्यानंतर धनगर आरक्षणाच्या मुद्दयांवर सरकारला घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न सुरु केला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार संवेदनशील नाही असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणावरून विरोधक सरकारची कोंडी करत राहणार असे दिसू लागले आहे. धनगर आरक्षणाबाबतचा टीसचा अहवाल सभागृहात मांडण्याऐवजी अटर्नी जनरल … Read more

सुभाष देशमुखांच्या लोकमंगलमुळे विधान परिषद तहकूब

मुंबई प्रतिनिधी | सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री  सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीमधील गैरव्यवहारप्रकरणी  राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी क्लीन चीट दिली आहे. महत्तावाचं म्हणजे  लोकमंगल सोसायटीच्या गैरव्यवहारा बाबत पोलीस फिर्याद दाखल असून चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असल्याचे विधान परिषदेत स्पष्टीकरण दिले. लोकमंगल सोसायटीने कोणताही गैरव्यवहार केला नाही,उलट सरकारकडून घेतलेले अनुदान परत देण्याचा … Read more

मुख्यमंत्र्यांच्या सहीने कर्ज माफीचे प्रमाणपत्र मिळाले ते शेतकरीच कर्जमाफिपासून वंचित

मुंबई प्रतिनिधी | मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली. या योजनेत ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले आणि कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. तसेच कर्ज माफी देखील देण्यात आली. मात्र ज्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या हाताने मुंबईत बोलवून कर्ज माफीचे प्रमाणपत्र दिले तेच शेतकरी आज … Read more

जमीन हडपल्याप्रकरणी धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश 

औरंगाबाद प्रतिनिधी ।  कागदपत्रांवरुन शासनाच्या इनामी जमिनीची परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक केल्याचे सकृदर्शनी निष्पन्न होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. ता.वि. नलावडे आणि न्या. के.के. सोनवणे यांनी सोमवारी (दि.१० ) दिले. मात्र, १९९१ साली सदर जमीन देशमुख … Read more

अजित पवारांच्या आणि धनंजय मुंडेंच्या भाषणात एकाच सभेत इव्हिएमवरून विसंगती

मुंबई प्रतिनिधी |राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा २०वा वर्धापन दिन कालमुंबई या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमानिमित्त झालेल्या भाषणात धनंजय मुंडे यांनी इव्हिएम मशीनवर शंका उपस्थित केली. तर अजित पवार यांनी इव्हिएम मशीनवर शंका घेणे गैर आहे असे म्हणून मुंडेंचे विधान खोडून काढले. राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्यांच्या भाषणावरून दोन्ही नेत्यात असलेली विसंगती भर सभेत उघडी पडली. सर्व विरोधी … Read more

धनंजय मुंडे म्हणतात ; लोकसभेच्या आम्ही एवढ्या जागा जिंकणार

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल आपला अंदाज व्यक्त आहे. एका वृत्त वहिनीसोबत साधलेल्या संवादात धनंजय मुंडे यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाआघाडी राज्यात २५ ते २९ जागा शकते असा अंदाज धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा :२०१४ पेक्षा २०१९मध्ये सेनाभाजपला जागा … Read more

धनंजय मुंडे हे तोडपाणीकरणारे नेते :पंकजा मुंडे

Untitled design

जिंतूर |प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीचा प्रचार जसा अंतिम टप्प्यात येवू लागला आहे तसे आरोप प्रत्यारोपाचे रण अधिकच वेगाने तापू लागले आहे. विरोधी पक्ष नेते  धनंजय मुंडे  हे तोडपाणी करणारे नेते आहेत असा घाणाघाती आरोप ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. त्या परभणी  लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ घेतल्या गेलेल्या … Read more

राष्ट्रवादीला धक्का : ‘हा’ बडा नेता मातोश्रीवर

Untitled design

मुंबई प्रतिनिधी  | कॉंग्रेस राष्ट्रवादीला लागलेले पक्षांतराचे  ग्रहण  थांबण्याचे नाव घेत  नाही असेच चित्र सध्या राज्यात पाहण्यास मिळते आहे. काल शनिवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जयदत्त क्षीरसागर यांनी मातोश्रीवर जावून उध्वव ठाकरे यांची भेट  घेतल्याने  राजकीय चर्चांना  उधान आले आहे. आता जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम ठोकणार का असा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. असे झाल्यास तो राष्ट्रवादीला … Read more

तर मी धनंजयसाठी राजकारण सोडलं असतं – पंकजा मुंडे

Untitled design

मुंबई प्रतिनिधी | “आमच्या घराण्याची राजकीय ताकद मोठी होती, बाबा मंत्री असल्याने त्यांचा जिल्ह्यात वचक होता. लोकांच्याआग्रहास्तव मी राजकारणात आले. मुंडे साहेबांनी धनंजयला आमदार केले. मात्र एवढं सारं करूनही धनंजय राष्ट्रवादीत गेला. जर धनंजय भाजपात राहिला असता तर मी त्याच्यासाठी राजकारणही सोडलं असतं” असं वक्तव्य ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकज मुंडे यांनी केले आहे. … Read more

भाजप सरकार एकीकडे म्हणते गाईला वाचवा आणि दुसरीकडे म्हणते बाईला नाचवा – छगन भुजबळ

Untitled design

जळगाव प्रतिनिधी | आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील डान्सबारवर बंदी घातली होती. मात्र डान्स बार बंदीवर राज्य सरकारने घालून दिलेले सर्व नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपुर्ण निर्णय दिला असून मुंबईसह राज्यात पुन्हा डान्सबार सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री … Read more