ठाकरे साहेब, आमच्या जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा ; गडचिरोलीतील ८११ गावांची मागणी

गडचिरोली | जिल्ह्यातील ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी प्रयत्न सुरु होताच ८११ गावांनी ठराव घेऊन दारूबंदीला समर्थन दर्शविला आहे. साहेब, आमच्या जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रातून केली आहे. जिल्ह्यातील अनेक कुटुंब उध्वस्त, महिलांना विधवा व भावी पिढीला व्यसनी बनविणारी दारू जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी १९८८ ते १९९२ पर्यंत चळवळ उभी राहली. … Read more

पोलीसांसोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार 

गडचिरोली प्रतिनिधी । महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर हा नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जातो. या भागात अनेकदा नक्षली कारवाया होत असतात. त्यामुळे या परिसरात नेहमीच पोलीस दक्ष असतात. आज चंद्रपूर उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र हद्दीत नक्षलवादी आणि सी-६० कमांडोंच्या मध्ये चकमक झाली. यामध्ये एका नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. आज (शुक्रवारी) संध्याकाळी साडेपाच वाजल्याच्या सुमारास … Read more

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा हैदोस; ४ वाहने पेटवली

गडचिरोली । जहाल माओवादी सृजनाक्काला चकमकीत ठार मारल्यामुळे संतापलेल्या नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत बंद पुकारला आहे. या बंद दरम्यान सर्व व्यवहार ठप्प राहावेत म्हणून नक्षलवाद्यांनी 3 वाहने पेटवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. नक्षलवाद्यांनी हा धुडगूस घातल्यामुळे येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री येथील राष्ट्रीय महामार्गावरील गजामेंढीच्या जवळ त्रिशूल पाँइटवर … Read more

अधिकार्‍यांच्या उदासिनतेमुळे धानोरा तालुक्यातील शेकडो शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित

गडचिरोली प्रतिनिधी । पंतप्रधानांनी मागील वर्षापासून संपुर्ण भारतात शेतकर्‍यासाठी शेतकरी सन्मान योजना सुरु केली.या अंतर्गत थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यात सरळ तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार प्रमाणे १२ महिन्यात सहा हजार रुपये जमा करण्याची महत्वकांक्षी योजना आणली. मात्र, अधिकारी वर्गाच्या उदासिन भुमिकेमुळे शेतकर्‍यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. धानोरा तालुक्यातील शेकडो शेतकरी या योजनेपासून वंचीत असल्याने … Read more

तब्बल ३१ लाखांचे बक्षिस नावावर असणाऱ्या जहाल माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराला कंटाळून अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मअसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आल्यामुळं माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. नुकतच एकुण ३१ लाख ५० हजार रुपये बक्षीस असलेल्या एकुण सहा जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. माओवाद्यांनी ना. पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र मा. महादेव तांबडे, मा. पोलीस अधीक्षक गडविरोली श्री शैलेश बल्कवडे सा. यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. यामध्ये १ पुरुष आणि पाच महिला माओवादयांचा समावेश आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक गडविरोली शैलेश बल्कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये संदीप उर्फ महारू चमरू वड्डे, मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनराव कुरचमामी, स्वरपा उर्फ संथिला उर्फ सरिता सुकलू आतला, अग्नी उर्फ निला मोतीराम तुलावी, ममिता उर्फ ममता जन्ना राजू पल्लो आणि तुलसी उर्फ मारे सन्नू कोटामी यांचा समावेश आहे.

सिरकोंडा येथील मतदान केंद्र कायम ठेवा; ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सिरोंचा तालुक्यातील सिरकोंडा येथील मतदान केंद्र रोमपली येथे न हलविता सिरकोंडा येथेच कायम ठेवण्याची मागणी सिरकोंडा येथील गावकऱ्यांनी केली आहे. याविषयीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

अहेरीत भाजपकडून पुन्हा अंबरीश आत्रामच; ग्रामसभेचा उमेदवार निर्णायक भूमिका बजावणार

गडचिरोली प्रतिनिधी। भाजपाच्या पहिल्याच उमेदवार यादीत गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राची उमेदवारी दोन्ही विद्यमान आमदारांना जाहिर करण्यात आली होती. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्राचा या यादीत समावेश नव्हता. यामुळे अहिरीचे विद्यमान आमदार राजे अम्ब्रीश आत्राम यांचा पत्ता कट होणार की काय अशी अशी शंका आत्राम समर्थकांना वाटत होती. शेवटी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत … Read more

गडचिरोलीतील ग्रामसभांचे लढवय्या नेते लालसू नोगोटी अपघातात गंभीर जखमी

ग्रामसभांचे सक्रिय कार्यकर्ते आणि भामरागडमधील जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी यांच्या दुचाकीला कारमपल्ली येथे अपघात झाला आहे. यामध्ये नोगोटी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोली प्रतिनिधी। भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरात मंगळवारी सायंकाळी सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. सुमारे दहा ते पंधरा मिनिटं चाललेल्या चकमकीनंतर जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य आढळून आले आहे. या चकमकीत काही नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज पोलिस विभागाने वर्तविला आहे. पोलीस दलाचे सी-60 … Read more

‘सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही संडास देते’ – आमदार बच्चू कडू

गडचिरोली प्रतिनिधी। महाराष्ट्रात साडे तीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी पण सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देत नाही. कश्मीरसारखी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची भयावह परिस्थिती झाली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाही तर देते काय? संडास! अशी जळजळीत टीका प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर केली. चिमूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. … Read more