केंद्राची गुजरातवर कृपादृष्टी; महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधून धावल्या सर्वाधिक श्रमिक ट्रेन

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून श्रमिक ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत किती श्रमिक ट्रेन धावल्या याबाबत एक माहिती समोर आली आहे. १ मे पासून देशभरात ३०२६ श्रमिक ट्रेन धावल्या असून यामधून आतापर्यंत ४० लाख स्थलांतरित मजुरांनी प्रवास केला आहे. दरम्यान स्थलांतरित मजुरांसाठी देशभरात सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून … Read more

तुम्ही राज्य सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना दम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला आवश्यक रेल्वे पुरविल्या नाहीत असा दावा केला होता. या विधानाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटर द्वारे उत्तर दिले होते. त्यांनी ट्विट द्वारे सोमवारच्या १२५ रेल्वेची आवश्यक माहिती देण्याची मागणी ट्विटर वरून केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्विटरवरून चांगलाच दम … Read more

निष्काळजीपणाचा कळस! गोरखपूरला निघालेली श्रमिक रेल्वेगाडी अचानक पोहोचली ओडिशात

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून पडलेल्या आणि नंतर पायीच घरी जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचे हाल होऊ लागल्याने अखेर त्यांना मूळ गावी जाता यावे म्हणून काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. मात्र, अशीच एक मजुरांना घेऊन जाणारी महाराष्ट्रातून निघालेली रेल्वे उत्तर प्रदेशात जाण्याऐवजी ओडिशाला पोहोचली आणि एकच गोंधळ झाला. दरम्यान आता ही रेल्वे पुन्हा … Read more

रेल्वे तिकीट बुकिंगला प्रचंड प्रतिसाद; केवळ २४ तासांत २३० ट्रेनसाठी १३ लाख तिकीट बुक

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळं देशाच्या विविध भागात अडकलेल्या नागरिकांना आणि स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी अतिरिक्त रेल्वेने मंगळवारी मोठी घोषणा केली होती. यानुसार २३० अतिरिक्त ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या रेल्वे गाड्यांमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल डबेही असतील. या ट्रेन रोज धावतील. दरम्यान, रेल्वेने १ जूनपासून सुरू होणाऱ्या २०० अतिरिक्त ट्रेनसाठी बुकींग सुरू केले आहे. … Read more

गुड न्यूज! रेल्वे स्टेशन तिकीट काऊंटर आजपासून सुरु, एजंटद्वारेही बुकिंग सुरू

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी १ जूनपासून २०० रेल्वे चालवणार आहे. यासाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबत आता रेल्वे तिकीट काऊंटर आणि एजंट द्वारेही बुकिंग करता येणार आहे. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटरला ही रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या जनरल … Read more

‘रेल्वे बुलाती हैं’ पण महाराष्ट्र सरकार म्हणतंय ‘जाने का नहीं’.. कारण ?

वृत्तसंस्था । १ जून पासून रेल्वेची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले होते. बुकिंग सुरु केल्यावर दोन तासातच दीड लाख प्रवाशांनी बुकिंग बुकिंग केल्याची माहिती रेल्वेने दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली आहे. तसे आदेश त्यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिले आहेत. रेल्वेकडून १०० विशेष रेल्वेची यादी … Read more

१ जून पासून धावणाऱ्या ‘या’ २०० रेल्वेगाड्यांचे उद्यापासून बुकिंग सुरु – भारत सरकार

Indian Railway

नवी दिल्ली । लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात रेल्वेसेवा सुरळीत सुरु करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. १ जून पासून धावणाऱ्या २०० रेल्वे गाड्यांची यादी आज भारत सरकार कडून जाहीर करण्यात अली असून त्याचे बुकिंग उद्या २१ मे पासून सुरु होणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. Indian Railways has released the list of the 200 … Read more

भारतीय रेल्वेने जाहीर केल्या ‘या’ २० सूचना; तिकीट बुक करण्याआधी वाचायलाच हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोनाच्या संक्रमणास आळा घालण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन आता आणखी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यामध्ये सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून भारतीय रेल्वेने काही विशेष गाड्या सुरु केल्या आहेत. मात्र, आत्तापर्यंत या गाड्यांची सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे चालू केलेली नाही. रेल्वेने १२ मेपासून दिल्ली ते देशातील वेगवेगळ्या राज्यात १५ जोड्गाडय़ा चालू … Read more

लॉकडाउनमध्ये ट्रेन तिकीट बुक करताना रेल्वे मागणार ‘ही’ माहिती

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ट्रेन तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये थोडा बदल केला आहे. जर तुम्ही लॉकडाउनदरम्यान विशेष ट्रेनने प्रवास करणार असाल तर आता तुम्हाला तिकीट बुक करताना अजून एक महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना ते ज्या ठिकाणी चाललेत तेथील पूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे. जर भविष्यात गरज पडली … Read more

रेल्वेकडून प्रवासी तिकिटांचं बुकिंग ३० जूनपर्यंत रद्द

नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच व्यवहार बंद आहेत. रेल्वे सेवाही बंद आहे. दरम्यान, अडकलेल्या मजूर, कामगारांसाठी श्रमिक रेल्वे गाड्या सुरु ठेवण्यात आल्या आहेत. मालवाहतूकही सुरु आहे. मात्र, रेल्वेने प्रवासी वाहतूक अद्याप सुरु केलेली नाही. दरम्यान, पुन्हा एकदा रेल्वेने आरक्षित … Read more