कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफ

टीम, HELLO महाराष्ट्र | गणेशोत्सवासाठी मुंबई-कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना ३०ऑगस्ट ते १२ सप्टेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. त्यामुळे यंदाचा गणेशउत्सव कोकणात आपल्या घरी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर घेऊन आला आहे. गणेशोत्सवानिमित्त रस्ते वाहतुकीचा आढावा पाटील यांनी एका बैठकीत घेतला. विनोद तावडे, आशिष शेलार, रवींद्र वायकर, दीपक केसरकर हे … Read more

सुनील तटकरे करणार शिवसेनेत प्रवेश? दिली हि प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी सोडून शिवसेनत जाणार असल्याच्या चर्चेला आता ऊत आला आहे. मात्र सुनील तटकरे यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नाही. आपल्या पक्षांतरच्या बातम्या या खोट्या बातम्या आहेत असे म्हणले आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट ; थायलँडवरून केल्या जात होत्या मुली आयात सुनील … Read more

खासदार सुनील तटकरेच्या कट्टर समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारेही वाहू लागले आहे . आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक रघुवीर देशमुख यांनीही आपल्या कुटुंबासोबत शिवसेनेत प्रवेश केल्याने तटकरे यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. रघुवीर देशमुख यांचेसोबत त्यांच्या … Read more

आमदार संजय कदम यांना एक वर्षाचा सक्षम कारावासाची शिक्षा

दापोली प्रतिनिधी | २००५ मधील तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचे प्रकरण खेड-दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कदम यांना चांगलेच भोवले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खेड दिवाणी न्यायालयाने आमदार कदम यांना एक वर्ष सश्रम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. हा निर्णय अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवल्याने आमदारा कदमांना आज … Read more

कोकण किनारपट्टीवर सापडला हा दुर्मिळ मासा, नागरिंकाकडून जीवदान

श्रीवर्धन प्रतिनिधी | कोकण किनारपट्टीलगत श्रीवर्धन येथील समुद्रकिनारी अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा केंड प्रजातीचा मासा आढळला आहे. सदर माशाला इंग्रजी भाषेत पफरफिश असे म्हणतात. किनारपट्टीवरील पर्यटकांनी तातडीने या माशाला समुद्रात सोडून जीवदान दिले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार श्रीवर्धन येथील किनारपट्टीवर पर्यटकांचा नेहमीच वावर असतो. बर्‍याचदा समुद्रातील दुर्मिळ जलचर समुद्राच्या लाटेबरोबर किनारपट्टीवर वाहुन येतात. मात्र त्यातील … Read more

हॅलो, चंद्रकांतदादा ! मी नारायण राणे बोलतोय ; माझ्या मुलाला वाचवा

मुंबई प्रतिनिधी | नितेश राणेंनी केलेला फिल्मी स्टंट त्यांच्या चांगलाच अंगलट येऊ लागला आहे. त्यांना त्या प्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर नारायण राणे यांनी चंद्रकांत पाटील यांना फोन करून या प्रकरणात माझ्या मुलाला वाचवा अशी याचना केली. त्याबद्दल स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गौप्यस्फोट केला आहे. माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर! चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग … Read more

मी नितेश राणेंवर खूनाचा प्रयत्न करण्याचे कलम लावायला सांगितले

मुंबई प्रतिनिधी |नितेश राणे यांनी मुंबई गोवा महामार्गाची झालेली दुरावस्था बघून महामार्ग उपाभियंता प्रकाश शेडकर यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर चिखल फेकल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली. त्यानंतर नितेश राणे यांना अटक झाली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर नोकरशाहीचा रोष नको म्हणून त्यांच्या कुटुंबाची चंद्रकांत पाटील यांनी भेट देखील घेतली. त्यावेळीची त्यांची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने … Read more

नितेश राणेंचा फिल्मी राडा ; अधिकाऱ्याला घातली चिखलाने अंघोळ

कणकवली प्रतिनिधी | आज तळ कोकणातील कणकवली शहरात फिल्मी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला आहे. आमदार नितेश राणे यांनी महामार्गाच्या रस्तांची झालेली दुरवस्था बघून येथील महामार्ग उपभियांता प्रकाश शेडकर यांना चिखलाने अंघोळ घालण्याचा प्रताप केला आहे. महामार्गाची झालीली दुरवस्थेला येथील अधिकारीच जबाबदार आहेत असे राणेंना वाटते म्हणून त्यांनी अशा प्रकारे अधिकाऱ्यांना समज देण्याचा प्रकार केला आहे. … Read more

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले

रत्नागिरी प्रतिनिधी | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नादुरुस्त तिवरे धरण काल रात्री फुटल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री 8 ते 9च्या सुमारास ही घटना घडली असून यात 23 ते 25 जण वाहून गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. यामुळे काठावरील 5 घरांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी … Read more

कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे

Thumbnail

मुंबई | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत काही महत्वाचे बदल करण्यात येत आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कोकण भागातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. याआधी कोकणातल्या सर्व मतदारसंघांची जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती. शिवसेना नेते एकनाथ शिंदे … Read more