‘या’ तारखेला मुंबईत मान्सून होणार दाखल

मुंबई । नुकत्याच होऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मान्सून उशिरा येईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु १ जूनला मान्सून केरळ मध्ये अगदी नियोजित वेळेत पोहोचला होता. तसेच तो तामिळनाडू आणि कर्नाटकच्या काही भागांपर्यंतही सहज पोहोचला होता. त्यामुळे आधी अंदाज वर्तविण्यात आलेल्या वेळेत अर्थात पुढील दोन तीन दिवसात मान्सून मुंबई मध्ये दाखल होईल असे … Read more

महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत मान्सुन येणार

मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली … Read more

खुशखबर! मान्सून ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होणार

पुणे । यंदा उन्हाच्या प्रकोपामुळे रेकॉर्ड ब्रेक तापमान महाराष्ट्रातील काही भागात नोंदवले गेले आहे. विशेषकरून विदर्भांत पारा ४७ अंशांच्या पार पोहोचला आहे. अशा वेळी लोकांना लवकरच या उष्ण वातावरणापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने IMD वर्तवला आहे. त्यापूर्वी ३० मेपासून राज्यातील विविध भागांत … Read more

पुढील २-३ दिवस तापमानात होणार वाढ ; २९ मे पासून पाऊस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या २ ते ३ दिवसांत हवेतील उष्णता प्रचंड वाढणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात तर पॅरा आणखीनच वाढेल. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार २९ मेनंतरच उन्हापासून आराम मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक विशेष मेट्रोलॉजिकल सेंटरचे प्रमुख … Read more

विदर्भात मान्सून वेळेवरच दाखल होणार ; हवामान खात्याचा अंदाज

अमरावती प्रतिनिधी l बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वाटचालीकरिता पोषक आहे. आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून … Read more

केरळमध्ये मान्सून यायला ४ दिवस उशीर; ‘या’ कारणामुळे यंदा पाऊस होणार लेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनला केरळमध्ये यायला चार दिवस उशीर होऊ शकेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. याबाबत माहिती देताना हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरूवात यंदाच्या १ जूनच्या तारखेपासून थोड्या वेळानंतर होण्याची शक्यता आहे. यावर्षी ५ जूनपासून केरळमध्ये मान्सूनला … Read more

मान्सून केरळमध्ये २८ मे रोजी पोहोचणार तर महाराष्ट्रात कधी ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात यावर्षी मान्सून कदाचित वेळेआधीच दाखल होऊ शकेल. स्कायमेट या खासगी कंपनीने मान्सून आणि हवामानाबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी मान्सून हा १ जूनऐवजी २८ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. या एजन्सीच्या म्हणण्यानुसार यावेळी मान्सून त्याच्या निर्धारित वेळेच्या ४ ते ५ दिवस आधीच अंदमानच्या समुद्रात येऊ शकेल. देशाच्या अधिकृत हवामान कार्यालयाच्या … Read more

बळीराजासाठी खुशखबर! यंदा १०० टक्के पाऊस पडणार- हवामान विभाग

नवी दिल्ली । शेतकऱ्यांसोबत संपूर्ण देशासाठी आनंदाची बातमी भारताच्या हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडणार असल्याचं  हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावर्षी  मान्सून सामान्य राहणार असून ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशात ९६ ते १०० टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. This year we … Read more

गाळ उपासनारा पोकलँड चक्क तलावामध्ये बुडाला 

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे   कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज व रायेवाडी या भागात आज दुपारी अचानक जोरदार पाऊस पडल्याने गाळ उपसणारा पोकलॅड चक्क बुडला. या परिसराला पाऊसाने आज दुपारी एकच्या सुमारास सुमारे दीड तास पावसाने झोडपले. त्यामुळे शेतकर्यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नागज व रायेवाडी येथे दुपारी एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा पाऊस संततधार सुरू … Read more

चार लाख लोकांची तहान २१५ टँकर कशी भागवणार!

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जून महिन्याचा पंधरावडा संपला तरी जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची टंचाई कमी झालेली नाही. सध्या टंचाई वाढतच असून सध्या १८३ गावे आणि एक हजार ३७४ वाड्यावस्त्यांमधील चार लाख १८ हजार २५५ लोकांना तब्बल २१५ टँकरने पाणीपरवठा केला जात आहे. गेल्या पावसाळयात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये सध्या चारा आणि पाण्याचा प्रश्‍न … Read more