मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातून 2 जणांना संधी, दोघांना डच्चू?

नवी दिल्ली वृत्तसंस्था: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यामधून महाराष्ट्र मधून प्रीतम मुंडे आणि नारायण राणे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर दोन मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता … Read more

“ताई, टेस्ट निगेटिव्ह असली तरी…!” प्रीतम मुंडेंच्या व्हिडिओवर धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया

Pritam Mundhe and Dhananjay Mundhe

बीड : हॅलो महाराष्ट्र – धनंजय मुंडे आणि मुंडे बहिणींमधला वाद सगळ्यांना माहित आहे. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळतात. पण राजकारणापलीकडे जाऊन या बहीण भावांमधले नातेसुद्धा लोकांनी पहिले आहे. भाजपा खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता. त्या … Read more

‘उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशानं शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा! प्रितम मुंडेंचा टोमणा

जालना । काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर “अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या (Urmila Matondkar) प्रवेशामुळे शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं म्हणत भाजप खासदार प्रीतम मुंडेंनी (Pritam Munde) शिवसेनेला टोमणा मारला. राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त प्रितम मुंडे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत … Read more

‘दानवे प्रीतमचा फॉर्म भरायला आले, ती जिंकली, माझ्यावेळी आलेचं नाहीत, मी हरले’; पंकजा मुंडेंचा सॉल्लिड टोला

औरंगाबाद । औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या शिरीष बोराळकरांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर पंकजांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजांची बहीण प्रीतम मुंडे या दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर बीड मतदारसंघातून खासदार आहेत. दानवेंचा दौरा हा शुभशकुन असल्याचे सांगत पंकजांनी एकप्रकारे शिरीष बोराळकरांना विजयाची हमी … Read more

एकनाथ खडसेंच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशावर बहीण प्रीतमनंतर पंकजा मुंडेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाल्या..

मुंबई । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. खडसे हे राष्ट्रवादीत जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील असं खडसे यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच खडसे यांच्या भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चेवर आपली … Read more

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर दोन्ही पक्षातील नेत्यांची टोलवाटोलवी; प्रीतम मुंडेंनंतर आता सुप्रिया सुळे म्हणाल्या..

पुणे । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल दोन्ही पक्षातील नेत्यांची अळीमिळी गुपचिळी सुरुच आहे. आधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी खडसेकाकांच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसेंकडे टोलवला होता, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आहे. (NCP MP Supriya Sule says ask Jayant Patil … Read more

‘खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत त्यांच्या सूनबाईंनाचं विचारा; प्रीतम मुंडेंचा स्ट्रेट ड्राईव्ह

बीड । ‘खडसे काकांचा निर्णय योग्य वेळ आल्यावरच कळेल, राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारा, असे म्हणत बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी गुगली टाकली. त्या बीड येथे बोलत होत्या. एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला राज्यात उधाण आले आहे. खडसे येत्या घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं भाकितही राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात … Read more

प्रितमताईंना शोधा १ हजार रुपये मिळवा, खासदार प्रितम मुंडेंना बीडच्या तरुणाचे खूलेपत्र

बीड प्रतिनिधी । भाजप खासदार प्रीतम मुंडे मतदार संघातील समस्यांकडे लक्ष देत नाहीत अशी तक्रार करत एका तरुणाने मुंडे यांना खुले पत्र लिहिले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावित खासदार प्रीतम मुंडे मतदार संघात नसल्याने निदान आता तरी प्रीतमताईंनी बीडला यावे असे आवाहन सदर युवकाने केले आहे. अक्षय मुंडे नावाच्या युवकाने फेसबुकवर हे पत्र पोस्ट केले … Read more

लोकसभेतील हसाहाशी त्या महिला खासदारांना महागात पडणार

नवी दिल्ली | डॉ. भारती पवार यांच्या भाषणाच्या वेळी बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि रावेतच्या खासदार रक्षा खडसे यांच्यात झालेल्या हसाहाशीची दखल पक्ष नेतृत्वाने घेतली असल्याचे बोलले जाते आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पक्ष नेतृत्वांनी भरती पवार यांच्याकडे या बाबत विचारना केली. त्यांनी देखील हा प्रकार आपल्याला व्हिडीओ बघितल्यावरच समजला असे म्हणले आहे. भरती पवार … Read more

लोकसभेत कर्जमाफीची चर्चा सुरु असताना मुंडे, खडसेंना आले हसू ; सोशल मीडियात झाल्या ट्रोल

नवी दिल्ली | दिंडोरीच्या भाजप खासदार डॉ.भारती पवार एका भाषणातून कर्जमाफीच्या योजनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत होत्या. त्यावेळी त्यांच्या भाषणावर हसण्याचे दुष्कृत्य बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि रावेतच्या खासदार रक्षा खडसे यांनी केले आहे. या दोघी शेतकरी कर्जमाफीवर हसत असल्याचे दिसल्याने त्यांची सोशल मीडियाने चांगलीच खरडपट्टी काढली आहे. भरती पवार यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी … Read more