पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग 

पुणे । पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाला बोलावण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे. हे अद्याप समजलेले नाही. तसेच किती हानी झाली आहे याचीही माहिती मिळू शकलेली नाही. Pune: Fire broke out at a chemical factory in Kurkumbh MIDC area. Five fire tenders have … Read more

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना

पुणे । राज्यातील विविध भागातून आता हळूहळू लोक परतत आहेत. पुण्यातही गेल्या काही दिवसात परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून लोक आले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाकडून विविध उपाय राबविले जात आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सद्यस्थिती लक्षात घेऊन बाहेरून पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आलेल्या प्रत्येक नागरिकाला घरातच विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. १४ दिवस या नागरिकांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे असे आदेश … Read more

पुणेकरांसाठी गुडन्युज! ससूनमधील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी 

पुणे । Covid -१९ च्या उपचारासाठी कोणतेच खात्रीशीर औषध अद्याप सापडलेले नाही. शास्त्रज्ञ ते शोधण्यात व्यस्त आहेत. विविध उपचार पद्धती प्रायोगिक पातळीवर केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून Convalescent plasma (kon-vuh-LES-unt PLAZ-muh)  थेरपी वापरून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या चर्चा सुरु आहेत. पुण्यात ससून रुग्णालयात १० व ११ मे या दिवशी उच्च रक्तदाब असलेल्या अतिस्थूल व्यक्तीवर ही … Read more

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्हयात आज एकूण १७३३ स्वॅब संकलित करण्यात आले होते. यापैकी २०८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत आणि याबरोबरच पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१०७ इतकी झाली आहे. पैकी १६९८ प्रकरणे सध्या कार्यान्वित आहेत. यापैकी ४४ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १२५ रुग्ण आयसीयू मध्ये आहेत. आज पुण्यातील १५९ रुग्ण बरे … Read more

लक्ष्मी रोडवर वर्दळ सुरु झाली आता तुळशीबाग केव्हा उघडणार ? 

पुणे । पुणे शहर म्हंटल्यावर डोळ्यासमोर काही ठिकाणे येतात. सारसबाग, लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग ही सर्वप्रथम नजरेसमोर येणारी ठिकाणे आहेत. कुठूनही आलेला मनुष्य एकदातरी या ठिकाणांना भेट देतोच. ही ठिकाणे प्रसिद्ध आहेतच पण नेहमीच वर्दळीखाली असणारी आहेत. मात्र संचारबंदीमुळे ही गर्दीची ठिकाणे शांत झाली होती. नेहमी लोकांनी गजबजलेले हे रस्ते सुमसान भासत होते. मात्र दोन … Read more

पुण्याचा गणेशोत्सव यावर्षी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा होणार

पुणे । गणेशोत्सव तसा महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरा होणारा उत्सव आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. गणेशोत्सवातील पुण्याचा झगमगाट न्याराच असतो. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशभरात प्रसिद्ध असणारा पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव पारंपरिक आणि साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव मंडळांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात … Read more

कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य … Read more

पुण्यातील ‘हि’ महाविद्यालये १ जून पासूनच होणार सुरु

पुणे प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी २ महिन्यापासून संचारबंदी सुरु आहे. विषाणूचा वाढत संसर्ग पाहता यंदा शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ ऑगस्ट पासून करण्याचे नियोजन होते. मात्र डेक्कन एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या संस्थेची सर्व महाविद्यालये १ जून पासून सुरु करण्याचे ठरविले आहे. महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरु करणार असून नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाची सुरुवात बुधवारपासून झाली असल्याची  माहिती सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे यांनी … Read more

कौतुकास्पद! मस्जिदीची जागा दिली कोरोना संशयित रुग्णांच्या अलगाव साठी

पुणे | दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. पुणे, मुंबई या शहरांमध्ये अधिकाधिक रुग्ण सापडत आहेत. प्रशासन आपल्यापरीने संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या धर्तीवर भारतभर असंतोष वाढला होता. एक विशिष्ट जमात जाणीवपूर्वक हा आजार पसरवण्यासाठी कार्यरत असल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या. पण पुणे शहरात या सगळ्याच्या विरुद्ध … Read more

दमलेल्या आईला उचलून घेत त्याने चालायला सुरुवात केली आणि..

भर उन्हात आपल्या वृद्ध आईसोबत आपल्या गावी पायपीट करत निघालेल्या एका मुलाचे हे चित्र कामगारांच्या भयाण स्थितीचे वर्णन करते आहे. चालून चालून दमलेल्या आपल्या आईला उचलून हा मुलगा प्रवास करताना दिसतो आहे.