एड्स दिनानिमित्त एड्सबाधित मुलांसाठी ऊर्जापूर्ण योग कार्यशाळा

‘जागतिक एड्स दिना निमित्त’ कैवल्यधाम आरोग्य व योग संशोधन केंद्राच्या वतीने, ममता फाऊंडेशन संस्थेतील एड्सबाधित मुला-मुलींसाठीसाठी एका मनोरंजनात्मक तसेच उर्जापूर्ण योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला सात वर्षे सक्तमजुरी

हैद्राबाद मध्ये घडलेल्या अत्याचाराने तर संपूर्ण देशच हादरला आहे. अशीच एक अत्याचाराची घटना पुण्यात घडली होती. या घटनेतील आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने सात वर्षे मजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

पुणे : महापौरपदी मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदी सरस्वती शेंडगे यांची वर्णी

महाशिआघाडीच्या प्रकाश कदम यांचा पराभव करून भाजपचे मुरलीधर किसनराव मोहोळ हे पुणे मनपाच्या महापौरपदी विराजमान झाले आहेत . तर भाजपच्या सरस्वती शेंडगे यांच्या गळ्यात उपमहापौर पदाची माळ पडली आहे . पुण्याचे महापौर पद हे खुल्या गटासाठी आरक्षित होते . पुणे महानगरपालिकेत भाजपचे संख्याबळ पाहता महापौर भाजपचाच होणार हे निश्चितच होते . निवडणुकीत शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत केली .

हिंदुस्थानातं चमच्यांची सुद्धा कमतरता पडली आहे का?- नितीन गडकरी

‘देशभरातील उद्योग व्यवसायसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जात आहे. ही माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलो की, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?’ असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

पुण्यातील हॉटेल ड्रीमलँडला भीषण आग; बघ्यांची एकच गर्दी

पुणे स्टेशन परिसरातील ड्रीमलँड हॉटेल आगीच्या विळख्यात सापडलं आहे. हॉटेलच्या तिन्ही मजल्यांवर आग पसरली आहे.

नवख्या उमेदवाराला स्वीकारलं, यातच मतदारांचे मोठेपण – चंद्रकांत मोकाटे

एवढं मोठं व्यक्तिमत्व असूनही सर्वसामान्य लोकांमध्ये दादा खूप आत्मीयतेने मिसळतात हेच दादांचे वेगळेपण आहे. माझ्या आजवरच्या सगळ्याच वाटचालीत मतदारांचा,शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा खूप मोलाचा वाटा आहे.

येरवडयाची हवा खाऊन या, कसं वाटतंय बघा – ईडी प्रकरणावरून सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारसभेत खोत बोलत होते. मंगळवेढा येथे बोलत असताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्यावर टीकास्त्र सोडले.

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये त्रुटी असणे या मूलभूत अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांना याप्रश्नी न्याय मिळाला नाही.

ऐसा कैसा चलेगा रे राजू ? सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह..!!

भाजपा समर्थकांनी हे फेसबुक पेज सुरु केले आहे. यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांची खिल्ली उडवण्यात आली आहे.