मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय? – रूपालीताई चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेले पेट्रोल – डिझेलचे दर 5 राज्यातील निवडणूकांच्या निकालानंतर अचानक वाढले. यावरून आता मोदी सरकारला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदीजी, बंगाल मधील पराभवाचा राग पेट्रोल डिझेलवर का काढताय?,” असं म्हणत … Read more

तुमच्या ‘त्या’ देदीप्यमान कामगिरी मुळेच कोल्हापूर सोडून पुण्यात निवडणूक लढावी लागली- रुपालीताई चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. कोल्हापूर महापुरातील तुमच्या देदीप्यमान कामगिरी मुळेच तुम्हांला पुण्यातील एका महिलेचा सुरक्षित मतदारसंघ निवडावा लागला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांनी केली. चंद्रकांत पाटील यांना कोरोनाच्या संकटाशी … Read more

फडणवीसांना अटक करणे म्हणजे अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?’ चित्रा वाघ यांनी उडवली चाकणकरांची खिल्ली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरुन राज्यात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार राजकारण रंगलंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप करत फडणवीसांना अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलीय. त्यावरुन आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांची जोरदार खिल्ली उडवली आहे. फडणवीसांना अटक करणं म्हणजे अटक मटक … Read more

“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना अटक करा” : रुपाली चाकणकरांची गृहमंत्र्यांकडे मागणी !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर रात्रीच्या ११.३० च्या सुमारास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस थेट पोलीस स्टेशनला पोहचले. त्याठिकाणी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी … Read more

ताईचा नवरा स्वतः भ्रष्टचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी : रुपाली चाकणकर यांचे चित्र वाघ यांना जोरदार प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात हायकोर्टानं आज सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ताईचा नवरा … Read more

अभिनय चांगला होता मात्र वेळ अन् ठिकाण चुकलं; रुपाली चाकणकर यांचा नवनीत राणा यांना टोला

rupali chakankar and navneet rana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचा अभिनय चांगला होता पण मात्र वेळ अन जागा चुकलीय असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. वरिष्ठ डीएफओ विनोद शिवकुमार … Read more

प्रतिष्ठीत व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना ब्लॅक मेल करण्याचा काही लोकांचा व्यवसाय : रुपाली चाकणकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : प्रतिष्ठीत व्यक्तींवर शिंतोडे उडवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा काही लोकांचा व्यवसाय असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तृप्ती देसाई यांचे नाव न घेता त्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकरांवरील आरोंपवर बोलताना ही राष्ट्रवादी काँग्रेसची बदनामी करण्याच्या व्यापक कटाचा भाग असल्याचं चाकणकर म्हणाल्या आहेत. भूमाता ब्रिगेडच्या … Read more

रुपाली चाकणकरांच्या घरावर रिपाइं महिला आघाडीने काढला मोर्चा; आठवलेंवरील ‘ती’ टीका झोंबली

पुणे । ‘आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’ अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी रिपाइं अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यावर केली होती. या टीकेनंतर चाकणकरांविरोधात आरपीआयची महिला आघाडी (RPI women wing) आक्रमक झाली आहे. त्यामुळं नाराज … Read more

‘खबरदार! नाहीतर.. तुमचं कार्यालय जाळून टाकू!’ रुपाली चाकणकरांना धमकीचा फोन

पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर (upali chakankar) यांना त्यांचे कार्यालय तोडून आणि जाळून टाकण्याचा धमकीचा फोन आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. चाकणकर यांनी याप्रकरणी तात्काळ सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रुपाली चाकणकर यांचे सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे जनसंपर्क कार्यालय आहे. शुक्रवारी सांयकाळी 5 वाजेच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने … Read more

चित्रा वाघ पडणार रुपाली चाकणकर यांचे दात?

पुणे प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आणि भाजपच्या महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ यांच्यात आज सोशल मीडियावर चांगलीच खडाजंगी झाली. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्याची बातमी एका वृत्तसंस्थेने दिल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस आता पक्षाच्या नेत्यावर कारवाई करणार का? की क्लिनचिटच देणार असा सवाल सवाल राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी केला. … Read more