..तर शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल- संजय राऊत

‘आमच्या पक्षाध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास शिवसेना नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत राज्यसभेत वेगळी भूमिका घेईल’ असं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी माध्यमांशी बोलताना केलं. ‘या विधेयकासंबंधी आमच्या मनात काही शंका आहेत, त्या दूर कारण्यासंदर्भांत समाधानकारक ऊत्तरे नाही मिळाल्यास आम्ही राज्यसभेत थेट लोकसभेत घेतलेल्या भूमिके विरुद्ध भूमिका घेऊ’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी माध्यमांसमोर दिले.

हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न करू नका; राऊतांचा भाजपवर निशाणा

व्होट बँक राजकारणाला आमचा विरोध आहे. व्होट बँकेचे राजकारण होऊ नये, हे अयोग्य आहे. पुन्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका.

‘मी स्वप्नात बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार’; राऊतांच्या दिलखुलास गप्पा

पवारांना भेटायला जायचो तेव्हा टोपी लागेल की टोपी लावतील अशी चर्चा लोकांमध्ये होती. या सर्वामध्ये ३०-३२ दिवस गेले, कोणाचा विश्वास नव्हता काय होईल, मी स्वप्नात पण बडबडायचो मुख्यमंत्री आमचाच होणार. घरातले बोलायचे बाबा तुम्हाला वेड लागलंय का?

‘या’ खट्याळ ट्विटवरून संजय राऊत यांनी फडवीसांना काढला चिमटा

‘मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की….’ हा खणखणीत आवाज शिवाजी पार्कच्या आसमंतात घुमला आणि जमलेल्या लाखो लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी समारंभ डोळ्यात साठवला. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, त्याच ठिकाणी त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

संजय राऊत यांचे ‘हे’ ट्विट सध्या चांगलंच गाजत आहे

गेला महिनाभर चालू असलेल्या राजकीय नाट्यावर काल अखेर पडदा पडला. अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर भाजपा सरकार कोसळले. याचा परिणाम म्हणून बहुमत सिद्ध करू न शकल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि राज्यामध्ये ‘महाविकासआघाडी’ चे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले. आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे. या सर्व घडामोडींवर शिवेसना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं असून एक शेर पोस्ट केला आहे.

अजित पवार देखील परत येतील – संजय राऊत

शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . गेले २८ दिवस शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस यांनी अनेक बैठका घेतल्या. एकीकडे अवकाळी पाऊस आणि शेतकरी प्रचंड संकटात असताना सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना . शुक्रवारी हा तिढा अखेर सुटेल आणि शनिवारी शिवसेनेची तोफ धडाडेल असं महाराष्ट्राला पटवून देण्यात आले होते . आणि शनिवारी जे घडले ते पाहून महाराष्ट्र हादरला . राजकारणात काहीही होऊ शकत हे महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिल …

अजित पवार हे पुन्हा परत येतील, त्यांना भाजपने ब्लॅकमेल केलं आहे- संजय राऊत

आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेत महाराष्ट्रातील राजकारणाला चांगलाच हादरा दिला. राज्यातील राजकीय भूकंपानंतर आता संजय पवार यांनी आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत असा दावा केला आहे. अजित पवार याना ब्लॅकमेल केलं गेलं आहे. याबाबत उद्या सामानात आम्ही त्याचा खुलासा करू. तसेच धनंजय मुंडे आमच्या संपर्कात असून ते सुद्धा परत येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?

विशेष प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीआधी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या कुटुंबात सगळं आलबेल असल्याचं बोललं जात होतं. यानंतर निवडणुका झाल्या आणि सहानुभूतीच्या लाटेवर का होईना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने भाजपला सरकार स्थापण्यापासून रोखलं. शनिवारी सकाळी मात्र महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला असून अजित … Read more

संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली – चंद्रकांत पाटील

मुंबई प्रतिनिधी | संजय राऊतांनी शिवसेनेची वाट लावली असून उद्धव ठाकरेंना त्यांच्यामुळे मान खाली घालावी लागली असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सत्तास्थापनेचा खेळ अनेक दिवस रंगल्यामुळे अजित पवार त्रस्त असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. आवश्यक असेल तर गनिमी कावा करा पण जनतेचं हित बघा ही शिकवण आम्हाला शिवाजी महाराजांनी दिला असून आम्हीही त्याप्रमाणेच … Read more

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या आणि शरद पवारांच्या पाठीत खंजिर खूपसला – संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर आपले मत स्पष्ट केलंय. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर … Read more