मी एक शिवसैनिक म्हणतं अरविंद सावंतांनी दिला केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा  

राज्यातील भाजप-सेना यांच्यातील वादाचे पडसाद आता दिल्लीत पाहायला मिळाले. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे, असे ट्विट अरविंद सावंत यांनी केले होते. त्यांनतर  सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार हे स्पष्ट झाले आहे.

राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न- संजय राऊत

राज्यात निवडणुकांचे निकाल लागून तीन आठवडे उलटले तरी सत्तेसाठीचा दावा कोणत्याही पक्षाने केलेला नाही आहे. दरम्यान निवडणूक निकालाप्रमाणे सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपाला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले होते मात्र भाजप असमर्थ ठरले. त्यामुळे आता शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी आमंत्रित केला आहे. मात्र महत्वाची बाबा म्हणजे आता सत्तास्थापनेसाठी दिलेल्या अवधीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

राज्यातील सत्तास्थापनेवरची ‘साडेसाती’ संध्याकाळी संपेल?

राज्यातील सत्ताकोंडी संध्याकाळी फुटण्याचे संकेत आता मिळत आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संध्याकाळी ७.३० वाजता महत्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत भाजप सत्तास्थापनेसाठीचीआपली भूमिका स्पष्ट करू अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सरकार शिवसेनेचचं येणार! उद्धव ठाकरेंनी दिला चिंताग्रस्त आमदारांना विश्वास

उद्धव ठाकरे यांनी आज मालाड येथील हॉटेल ‘रीट्रीट’मध्ये वास्तव्यास असलेल्या आपल्या आमदारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. ‘आमदारांनी कसलीही चिंता करू नये. महाराष्ट्रात आपलंच सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्रीही आपलाच होणार आहे,’ अशी ग्वाही उद्धव यांनी दिली.

महाशिवआघाडीच्या सरकारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? | स्पेशल रिपोर्ट

विशेष प्रतिनिधी | सातारा मुख्यमंत्रीपद – केंद्रातील सत्ताधारी पाशवी बहुमतात नसतील तर राज्याची मांड समर्थपणे हाताळू शकणारं स्वावलंबी व्यक्तिमत्व. अनेक राजकीय नेत्यांची संपूर्ण कारकीर्द गेली तरी या पदाचं स्वप्न पूर्ण होत नाही. घराणेशाही असेल तर मार्ग तुलनेनं सोपा असतो. दुसरा मार्ग म्हणाल तर पक्षश्रेष्ठींच्या मनात तुम्ही घर केलेलं असलं पाहिजे. आणि तिसरा मार्ग म्हणजे तुमचं … Read more

तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे..!!

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न संपूर्ण राज्याला सध्या पडला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात आपला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने युती ही पद आणि जबाबदाऱ्यांच्या समसमान वाट्यावरच झाली होती असे सांगत मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चाच झाली नसल्याचा खुलासा करत भाजपने सेनेचा दावा खोडून काढला.

बहुमत नसताना आमचंच सरकार येणार हे ‘बीजेपी’ कसकाय ठामपणे सांगू शकते ? मग आम्ही आमचे पर्याय बघायचे नाहीत का ? – उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बीजेपीला चांगलेच धारेवर धरले. बहुमत नसताना तु्म्ही म्हणता ‘आमचंच सरकार येणार’, मग आम्ही आमचे पर्याय बघायचे नाहीत, हे सांगणारे तुम्ही कोण? अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बीजेपीचे चांगलेच कान पिळले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमधील पुढील मुद्दे- मला शिवसेनाप्रमुखांनी जे शिकवलं आहे की शब्द … Read more

शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेबांना दिलेलं वचन – उद्धव ठाकरे

 मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंना दिलेले वचन आहे असे मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेसोबत काही बोलणेच झाले नाही असे म्हणल्यानंतर ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत फडणवीस घोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. … Read more

मला खोटं पाडल्याबद्दल फडणवीसांचं आभार; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

शिवसेनाप्रमुखांना मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसैनिक बसवेनच असं वचन दिलं होतं. आता ते वचन पाळण्याची जबाबदारी माझी आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी माझी भूमिका ऐकली होती आणि त्यावर त्या दोघांचं एकमत होत नव्हतं. स्वतःला पक्षात अडचण येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी मलाच खोटं ठरवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण मला त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असंही ठाकरे पुढे म्हणाले. पद आणि जबाबदऱ्यांचं सम-समान वाटप हे ठरलं होतं, आणि आता हेच ते नाकारत असतील तर मी काय बोलणार असं म्हणत गोड बोलून आम्हाला नेहमी फरफटायला लावणाऱ्या भाजपचा खरा चेहरा आज उघडकीस आला असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली.

उद्धव ठाकरेंनी माझे फोनच घेतले नाहीत; त्यांचे नेते मात्र खालच्या पातळीवरचे आरोप करतच राहिले

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.