महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भातील तर्क वितर्क; शासकीय बैठकांमधील अंदाज

maharastra lockdown

मुंबई| महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम लॉकडाऊन झाले त्याला वर्ष उलटून गेले. त्यानंतर हळूहळू लॉकडाऊन कमी करण्यात आले होते. पण आता करोनाच्या वाढत्या केसेस मुळे आणि पेशंटच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल की काय अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे यावर अनेक तर्कवितर्क केले जात आहेत. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रात्री आठ पासून सकाळी सात पर्यंत … Read more

मुंबईसाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने एकत्र यावं ; काँग्रेस नेत्याचं आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मोठया प्रमाणात कोरोनाचा उद्रेक होत असून कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपासून मुंबईला वाचवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्र यायला हवे, असे मत काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले. मिलिंद देवरा यांनी ट्विट केलं असून, देशातील एकूण रुग्णांपैकी मुंबईतील रुग्णसंख्या आणि देशाच्या जीडीपीमध्ये मुंबईचा वाटा हे दोन्ही मुद्दे लक्षात … Read more

‘दूध का दूध, पानी का पानी करावे’ ; अनिल देशमुख यांनी केली चौकशीची मागणी

deshmukh thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉंब नंतर राज्यात खळबळ उडाली आहे. अनिल देशमुख यांनी 100 कोटींचा हप्ता मागितला असा आरोप परमबीर सिंग यांनी केला. दरम्यान बुधवारी रात्री अखेर राज्य सरकार या प्रकरणात एक पाऊल मागे गेल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी … Read more

उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे ; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अन्वय नाईक कुटुंबाला पुढे करून उद्धव ठाकरे आणि रशमी ठाकरे पैशांची अफरातफर करत आहेत. उद्धव ठाकरे तुमची गाठ माझ्याशी आहे, तुम्हाला सगळे हिशोब द्यावेच लागतील असा थेट इशारा भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे. रश्मी ठाकरे यांनी आठ वर्षे कर भरलेला नाही. … Read more

राज्य सरकारने वीज ग्राहकांचा विश्वासघात केला ; राजू शेट्टी कडाडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. लॉकडाऊनच्या काळातील एप्रिल, मे, जून महिन्याचे बील माफ करावे म्हणून आम्ही सातत्याने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे झाले, वीज बिल जाळून झाली, महावितरण कार्यालयाला कुलुपे लावली. सरकारने सुरवातीला सकारत्मक प्रतिसाद दिला. ऊर्जामंत्र्यांनी गोड बातमी देतो म्हणून सांगितले. सरकारने जाहीर केले होते, आम्ही … Read more

मनसुख हिरेन प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल का?? ; चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला सवाल

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदल परिसरात आढळून आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. विरोधकांकडून या प्रकाराबद्दल शंका व्यक्त करण्यात आली असून भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला सवाल केला … Read more

मुस्लीम नेत्यांनी राजीनामा द्यावा ; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानावरून अबू आझमी संतापले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत दमदार भाषण करताना भाजप आणि विरोधकांचा आपल्या ठाकरे शैलीत समाचार घेतला. बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले आणि बाळासाहेब राहिले होते हे लक्षात असू द्या. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे सपा नेते … Read more

“Too little too late” राठोड यांच्या राजीनाम्यावर भातखळकर यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “Too little too late” अशा शब्दात संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे वर्णन मुंबई भाजपा प्रभारी,आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणाचा बुरखा इतक्या उशिरा आणि जनमताच्या दबावामुळे घेतलेल्या राजीनाम्यामुळे अखेर गळून पडल्याची टीका त्यांनी याप्रसंगी बोलताना केली. संजय राठोड यांचा राजीनामा यापूर्वीच घेऊन एफ आय आर दाखल करून या प्रकरणाच्या चौकशीला … Read more

मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा ; अभिजीत बिचुकलेंचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिग बॉस फेम अभिजित बिचुकले नेहमी आपल्या काही बेताल विधानासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान आता अभिजित बिचुकले यांनी उद्धव ठाकरेंकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय. तशा आशयाचं पत्रच अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा. तुमचे सर्व मंत्री निष्क्रिय आहेत. मला 8 … Read more

छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकला असता का? ; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर तुम्ही दिल्लीच्या तख्तावर टेकू शकत आहात, ते टेकू शकला असता? बसू शकत आहात, ते बसू शकला असतात? एवढं जरी कळलं, तरी अभिजातच काय, सर्वोत्तम सर्वोच्च दर्जा देण्यासाठी एवढी एकच गोष्ट पुरे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more