तुमच्या अंगावर एक तरी केसेस आहे का?; राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा तर पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. “माझ्या अयोध्या दौऱ्याला महाराष्ट्रातूनच पहिल्यांदा विरोध झाला. मी अयोध्येला गेलो असतो तर माझ्यासह अनेकांवर गुन्हे दाखल झाले असते. म्हणून मी गेलो नाही. आमच्या मनसे सैनिकांनी आंदोलने केली. मात्र, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगावे की, … Read more

होय… बाळासाहेबांमुळेच महाराष्ट्र सरकार चालते ; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

chandrakant patil sanjay raut 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरे यांचेच शिल्लक आहे म्हणून आज महाराष्ट्र सरकार चालत आहे. एकेकाळी आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचेही ऐकत होतो. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठेच नव्हते. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत. … Read more

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे की पवारांशी प्रेरित…; चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात असणारे नवाब मलिक यांचे दाऊदच्या सहकाऱ्यांसोबत व्यावहारिक संबंध असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “हा देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दाऊदशी ज्यांचा संबंध असल्याचे न्यायालयाने म्हंटले आहे. तरीही त्यांचा राजीनामा घेतिला जात नाही. मग ही बाळासाहेब ठाकरेंची … Read more

मलिकांसाठी अट्टहास केला तेवढा ओबीसीसाठी करायला हवा होता, मात्र… ; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतरही त्यांना मंत्रीपदी ठेवण्यात आले आहे. यावरून महा विकास अगदी सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आघाडी सरकारवर टीका केली. मलिक यांना मंत्रिमंडळावर ठेवण्यासाठी जेवढा अट्टहास केला तेवढा ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी करायला हवा … Read more

मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊदशी संबंध? ; किरीट सोमय्यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Kirit Somaiya Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असून अध्यापही त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यावरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे. आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून नवाब मलिक यांचे मंत्रिपद वाचवण्यासाठी ठाकरेंची भागीदारी आहे. मलिकांचे दाऊद गँगशी संबंध … Read more

आता मास्क काढलाय, तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता काय?; सदाभाऊंची मुख्यमंत्र्यांवर टीका

Sadabhau Khot Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारवर भाजप व भाजपमधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “दोन वर्षानंतर तुम्ही मास्क काढून बोलत आहात. त्याच्या बातम्याही आल्या. तुमचा चेहरा काय चंद्राचा मुखडा होता … Read more

काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी, ठिगळे तरी कुठे लावायचे?; पक्षातील गळतीबाबत शिवसेनेचा सवाल

Sanjay Raut Rahul Gandhi Sonia Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून मागील निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव केला असल्यामुळे काँग्रेसला गळती लागली आहे. उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल आणि सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यावरुनच शिवसेनेने आपल्या सामनातील अग्रलेखातून काँग्रेसच्या या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. “सध्या मित्रपक्ष म्हणून सोबत असलेल्या काँग्रेसची … Read more

…तर मग मी राजकारणच सोडेन; संदीप देशपांडेंचे ठाकरे सरकारला आव्हान

Sandeep Deshpande

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदींवरील भोंग्यावरोधात मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्यभर आंदोलन केले. यात मनसे नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी याचाही समावेश होता. त्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला. “आमच्यावरील गुन्हा खोटा होता. खोट्या गुन्ह्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस आम्हाला शोधत होते. आम्ही सरकारविरोधात बोलू नये म्हणून सरकारने दबाव बनण्यासाठी … Read more

आरोपावेळी स्वतःच्या बायकोचीही मुख्यमंत्र्यांनी बाजू घेतली नाही, नवरदेव आहात ना…; किरीट सोमय्यांची टीका

Kirit Somaiya Uddhav Thackeray Rashmi Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे या लबाडी करू शकत नाहीत. पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी लबाडी करत आहेत, असा आरोप भाजपचे माझी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर आता पुन्हा सोमय्या यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर व शिवसेना, संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ‘आपल्या बायकोवर आरोप झाले कि तिची आपण बाजू … Read more

राज्यसभा उमेदवारीसाठी संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेने घातली ‘ही’ अट

Shiv Sena Sambhaji Raje Chhatrapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत राज्यसभेच्या खासदारकीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार असून अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे म्हंटले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल वर्षा बंगल्यावर भेट घेतली. मुख्यमंत्री आणि संभाजीराजे या दोघांमध्ये जवळपास 35 मिनिटे चर्चा झाली. यावेळी शिवसेनेत प्रवेश … Read more