निवडणूक लागली : माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 7 ऑगस्टला मतदान

सातारा | माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नव्या कारभारांच्या निवडीसाठी 7 ऑगस्टला मतदान, तर 8 ऑगस्टला निकाल लागणार आहे. बाजार समितीच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात झाली असताना आज अधिकृतरित्या कार्यक्रम जाहीर करण्यात आला. बाजार समितीसाठी 6 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. इच्छुकांना 12 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत … Read more

काय चाललंय काय? आता TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हीपॅट

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने देशभरात एकच खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नक्की चाललंय काय? हा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडतो आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान हावडा येथील उलुबेरिया … Read more

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी आज मतदान

Nanded Jilha Bank

नांदेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ संचालक पदासाठी आज जिल्ह्यातील १५ केंद्रांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीत ४३ उमेदवार रिंगणात असून २१ संचालकांपैकी ३ संचालक हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे . विशेष म्हणजे भाजपच्या उमेदवाराने प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदानाच्या दोन दिवस आगोदर पाठिंबा … Read more

Breaking News : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी या गावात घडला आहे. या घटनेमुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हरिसिंग गुशिंगे असं हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्याच नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी गावात भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याचे समोर आले आहे. ही हत्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून झाल्याचे बोलले जात … Read more

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज, निकाल 3 डिसेंबरला

मुंबई । राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत … Read more

उमेदवारी दिली तर कोणाला नकोय? मात्र भाजप कि काँग्रेस हे अद्याप गुलदस्त्यात – आनंदराव पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आनंदराव पाटील (नाना) यांची उद्या ७ जून रोजी विधानपरिषदेची मुदत संपत आहे. आमदारकीची मुदत संपल्यानंतर नाना काय भूमिका घेणार याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांनी पृथ्वीराजबाबांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार डॉ. […]

साताऱ्यातील ईव्हीएम घोटाळ्याची तक्रारच बोगस; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा खुलासा

४५ सातारा लोकसभेसाठी आणि २५७ कोरेगाव विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावेळी कोणतंही बटण दाबलं तरी मत कमळाला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. दीपक रघुनाथ पवार या व्यक्तीने ही तक्रार दिली होती. मात्र सदर व्यक्तीला याच तक्रारीसाठी लेखी जोडपत्र क्रमांक १५ भरून देण्यास सांगितलं असता या उमेदवाराने टाळाटाळ केली. माध्यमातून ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर जिल्हा व केंद्र निवडणूक प्रमुखांनी या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन याचा खुलासा केला.

बुलडाणा जिल्ह्यात मतदान गोपनीयतेचा भंग; मतदान करतानाचे व्हिडीओ व्हायरल

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. परंतु या निवडणुकी दरम्यान मतदान प्रकियेच्या गोपनीयतेचा भंग झाला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मतदान प्रक्रियेनंतर काही मतदानकर्त्यांनी मतदान करतानाचे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. या व्हायरल व्हिडीओमुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली असून याकडे निवडणूक विभागाचं किती दुर्लक्ष आहे हे यावरून दिसून येत आहे.

‘पांगरा ढोणे’ गावात मतदारांना मनस्ताप; अपुऱ्या व्हीव्हीपॅटमुळे रात्री उशिरा पर्यंत चालले मतदान

जिल्ह्यात काल विधानसभेचे मतदान शांततेत मतदान पार पडले असून कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथील मतदारांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे समोर आले आहे. काल सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदान करण्याची वेळ होती. या गावात ८.३० पर्यंत मतदान चालू होते. या मतदान केंद्रामध्ये तब्बल ३००० मतदार असताना सुद्धा केवळ दोन व्हीव्हीपॅट वर काम चालू होते.

कमी मतदानामुळे प्रमुख उमेदवारांच्या चिंतेत वाढ !

नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली या दोन मतदार संघात पन्नास टक्यापेक्षा कमी मतदान झाल्याने प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांची चिंता वाढली आहे. पावसाची रिपरिप आणि त्यानंतर कडाक्याचे उन्ह, तीन दिवसाच्या सुट्टीचा बेत, मतदानातील उदासीनता, नोकरदारांचे स्थलांतर आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवरील संशय यामुळे मतदानाची टक्केवारी गेल्या निवडणूकीपेक्षा घसरली असल्याची चर्चा सुरू होती.