कोरोना प्रतिबंधासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी

Don’t worry…! कोणताही मेडिक्लेम असला तरी ‘कोरोना फ्री’ होणारचं

कोरोना  व्हायरसने देशासहित आता पुण्यात ही धुमाकूळ घातला आहे.  पुण्यातील पाच जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता पुण्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. 

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ पुस्तकावर उदयनराजे सडेतोड भुमिका घेणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी भाजप नेते जयभगवान गोयल यांनी रविवारी नरेंन्द्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करणारे पुस्तक प्रकाशित केले. यानंतर देशभरात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटले. अनेकांनी भाजपच्या सदर कृत्याचा निषेध केला आहे. आता शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी याबाबत आपण सडेतोड भुमिका घेणार असल्याचे जाहिर केले आहे. ‘आज के … Read more

लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही … Read more

पुण्यात ‘महाराष्ट्र केसरी’चा थरार

पुणे प्रतिनिधी | यंदाची महाराष्ट्र केसरी विद्येचे माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्यात भरली आहे. म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शुक्रवार पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगला आहे. पुणे शहरातील निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा दावेदार अभिजित कटके तर जिल्हा निवड चाचणी स्पर्धेत आदर्श गुंडची निवड झाली आहे. गतविजेता बाला रफिक शेखने निवड चाचणी पूर्ण केली … Read more

महाविकासआघाडीचा हनिमून पिरीयड संपू द्या, मग बघू – राज ठाकरे

पुणे प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीला धारेवर धरले. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या सत्ता नात्यानंतर राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली. यावर राज ठाकरे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीचा हनिमून पिरीयड संपूद्या असं म्हणत खोचक टोला लगावला. यावेळी राज ठाकरे यांनी महाविकासआघाडी फार काळ टिकणार नसल्याचंही सुतोवाच … Read more

पुणे मेट्रोला मिळाला मुहूर्त; येत्या जून पासून ‘हा’ टप्पा होणार प्रवाशांसाठी सुरु

पुणे प्रतिनिधी | आनंदनगर ते गरवारे महाविद्यालय आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय ते येरवडा या मेट्रो टप्प्यांवरील प्रवाशांना येत्या जूनपासून मेट्रोतून प्रवास करता येईल, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या टप्प्यांतील प्रत्येकी पाच किलोमीटरचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. यापूर्वी पुण्यात डिसेंबरमध्ये मेट्रो धावेल, असा दावा करण्यात … Read more

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज लोहगाव विमानतळावर आगमन झाले. वायुसेनेच्या विशेष विमानाने शहा आज पुण्यात पोहचले. देशातील पोलीस महासंचालक यांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषद पुणे येथे होणार आहे. या परिषदेला देशाचे गृहमंत्री यानात्याने शहा हजेरी लावणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात तरुणांचा दारू पिऊन धुडगूस

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाच क्रमांकाच्या वसतिगृहात मंगळवारी काही तरूण गोंधळ घालत असल्याचे सुरक्षा रक्षकांना समजले. त्यांनी पाहणी केली असता एका खोलीत काही जण दारू पीत असल्याचे आढळले. सुरक्षारक्षकांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.