‘विरोधकांची टीका म्हणजे, उचलली जीभ लावली कि टाळ्याला’; अशोक चव्हाणांचा पलटवार

मुंबई । मराठा आरक्षणासारख्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्यावर विरोधी पक्षातले अनेक नेते बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. या मुद्यावर त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. त्यांच्या हाताला सध्या काहीच काम नाही. त्यामुळे उचलली जीभ लावली टाळ्याला हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना राज्याचे सार्वजनिक … Read more

वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेतील मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार- अशोक चव्हाण

मुंबई । मराठा आरक्षणावर आज (15 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात सरकारनं नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महत्वाची माहिती दिली. “पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील मराठा आरक्षणा संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिला असून, मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. पदव्युत्तर वैद्यकीय … Read more

कमराबंद चर्चेनंतर बंटी पाटील, अमित देशमुख पृथ्वीराज बाबांना घेऊन मुंबईकडे रवाना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी मंत्री अमित विलासराव देशमुख व मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची कमरबंद चर्चा झाली. मात्र या राजकीय कमराबंद चर्चेची राज्यभर मोठी चर्चा सुरू आहे. यानंतर आता तिनही नेते मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या … Read more

अशोक चव्हाण झाले कोरोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई । राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी आपल्या नांदेडम मतदारसंघात कोरोनाच्या उपाययोजनांची परिस्थितीची पाहणी करत होते. यावेळी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. त्यात ते … Read more

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण; उपचारांना तात्काळ सुरुवात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी २० हजार कोटी द्या; अशोक चव्हाणांची नितिन गडकरिंना मागणी

नांदेड | राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी अनेक अडचणी येत आहेत, काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात यावी व त्यासोबतच राज्यातील राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने होण्यासाठी २० हजार कोटी रूपयांचा निधी केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गास द्यावा अशी … Read more

भाजपचं ‘ऑपरेशन लोटस’ हे ‘कोरोना व्हायरस’पेक्षा घातक – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यप्रदेशातील कमलनाथ यांच्या नैतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरु आहे. काँग्रेसचे ८ आमदार दिल्लीत पोहोचले असून हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यप्रदेशातील ही राजकीय खेळी भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’ चा भाग असल्याचे बोलले जात असताना काँग्रेसने भाजपवर जोरदार … Read more

.. तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. मात्र, सरकार स्थापन करत असताना आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मराठवाड्याच्या वाट्याला आली ६ मंत्रिपद, मंत्रीपदी यांची लागली वर्णी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला सहा मंत्रिपद आली आहेत. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यातील काँग्रेसकडून मोठं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच असून, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून मराठवाड्यातून अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे याना संधी देत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केलं. तसेच राष्ट्रवाडीकडून राजेश टोपे हे मंत्रिपदाची शपथ घेतलेले मराठवाड्यातील दुसरे मंत्री ठरले.

अशोक चव्हाण यांनी तावडेंच्या सल्ल्याचा काढला वचपा; तिकीट कापण्यावर केले मिश्किल ट्विट

नांदेड प्रतिनिधी। राजकारणात कोणाचे दिवस कसे फिरतील काही सांगत येत नाही. भाजपने विनोद तावडे यांचे तिकीट कापले जाणे हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. त्यातच तावडेंनी नांदेड दौऱ्यावर असताना अशोक चव्हाण यांना निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला होता. विधानसभा निवडणुकीत जनता आम्हालाच बहुमत देणार आहे तेव्हा अशोक चव्हाण यांनी झाकली मूठ सवा लाखाची, यानुसार निवडणूक … Read more